नवीन लेखन...

राष्ट्रीयकृत बँकांची मुजोरी

पूर्वी मला खाजगी बँकांचा खूप राग यायचा. अरे खात उघडणे म्हणजे डोक्याला ताप वाटायचा कारण एकच कमीत कमी आपल्या सेविंग खात्यावर १०००० हजार रुपये असणे आवश्यक.  पण व्याज किती देणार तर ३%.

आता तिचं परिस्तिती राष्ट्रीयकृत बँकांची झालेली दिसून येते, आपण भारतातील सर्वात मोठी बँक जिच्याकडे आपण सगळे आशेने बघतो तीच एस बी आय बँक. आता काय तर कमीत कमी मासिक सरासरी रुपये ५००० आपल्या खात्यावर असणे आवश्यक.
आज आपण बघतो लोंकाचे पगार साधारणतः ५०००-१०००० दरम्यान आहेत जर या बँकेत अधिक अधिक सामान्य लोंकाचे खाते दिसून येतात कारण अति श्रीमंत लोक खाजगी बँका निवडतात. जर ५००० रुपये जर या बँकेत ठेवले तर मासिकं खर्चासाठी लोंकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आताच दोन दिवाणसापुर्वी १ वृद्ध व्यक्ती मला भेटली ती थोडी अस्वस्थ होती मग सहज त्यांना विचारले कि काय झाले, ते म्हणाले काय सांगू माझे वय ७२ वर्षे आहे आणि एस बी आय बँकेत माझे खाते आहे पण ते पेन्शन साठी आहे तिथे मला मासिक सरासरी रुपये ५००० ठेवण्यास सांगितले आहे नाहीतर मला १००-१५० रुपये दंड पडत आहे, तसेच माझे दुसरे खाते इथेच आहे कारण गॅसची अनुदान पेन्शन खात्यावर जमा होत नाही म्हणून परत दुसरे खाते याच बँकेत आहे. आणि दोन्ही खाते मिळून मला १०००० रुपये ठेवायचे आहे, कुठून आणू मी पैसे. माझी परिस्थी नाही, मला खात्याची गरजच नाही जर मला माझी पेन्शन रोकड मिळाली तर.

आता सांगा काय करायला पाहिजे अश्या या वृद्धांनी????

आज सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे, पण का कोणीच बोलत नाही. अरे जर मला सरासरी बॅलन्स ठेवायचाच आहे तर त्यावर मुदत ठेवी एवढे व्याज का दिले जात नाही. पण असो जर मी त्या बँकेत मुदत ठेव ठेवली असेल तर काय गरज आहे मला सरासरी बॅलन्स मेटेन करायचा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..