नवीन लेखन...

प्रेषित (कथा)

 

अनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त कथा


धर्मेन्द्रला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणल्यावर नर्स साफसफाई, औषध देण्यासाठी रूममध्ये आल्या. धर्मेन्द्रची कॉट खिडकीजवळच होती. त्यामुळे बसल्या बसल्या तो बाहेरचे पाहू शकत होता. मधूनच विमान धूर सोडत आवाज करत गेल्याचेही दिसू शकत होते.आवाज ऐकताच त्याला आठवले त्याने राधिकाला हाक मारली.

“अगं तू मोझिम अहमदला व्हॉट्स अॅप मेसेज पाठवून कळवलेस का मी सुखरूप पोहोचल्याचे?”

“नाही. अजून कुठे वेळ मिळाला? ते एवढे महत्त्वाचे आहे का? माझीही धावपळ चालू आहे. पाठवू सावकाशीने. “अरे तुला वेळेची, माणसांची किंमत कळत नाही? प्रवासात त्याने मला किती आधार दिला? कोण कुठला? ना ओळख ना पाळख. शिकागो ते अबुधाबीपर्यंत माझ्याबरोबर सावलीसारखा होता. मोबाईल दे इकडे.”मी बोलतो.” “धर्मेन्द्र मी एकदा सांगितलं ना कळवते म्हणून? तुम्हाला जास्त बोलायचं नाही, फिरायचे नाही. शांत पडून राहा, नर्स, डॉक्टर सांगतील तसंच वागायचं. तुमची बायपास झाली आहे. पथ्यपाणी काही महिने पाळावे लागेल.’

“काय? तू तर म्हणालीस साधी सर्जरी आहे! हे काय?”?

“होय. तुम्हाला तसंच सांगायला त्यावेळी हवे होते. म्हणून तर बरे झालात.

“अंकल, जादा बात मत कर… अभी सब ठीक है.’ नर्सही जोरात पण प्रेमळ भावनेनं म्हणाली. धर्मेन्द्रचा आवाज ऑपरेशननंतर अगदी हळू झाला होता. तापट स्वभाव, अरे ला कारे करणारा स्वभाव. तो असा गोगलगाय झालेला पाहिल्यानंतर सर्वांनाही बरं तर वाटलंच पण आश्चर्य वाटलं. एक आजार माणसाला किती बदलून टाकतो. धर्मेन्द्र मध्यमवर्गीय कुटुंबात पण कष्टमय जीवन जगलेला. उंच, काळासावळा, कष्टाने त्याने संगणकीय कौशल्य मिळवून कंपनीत आपले स्थान मिळविले होते. कधी त्याने पैसे नको तिथे खर्च केले नाहीत. कुणाबरोबर बाहेर गेला तरी आधी समोरचा माणूस पैसे काढतो की नाही याचा अंदाज घेणे किंवा त्याला प्रत्येक व्यक्तीकडून पुढे मागे काय फायदा होऊ शकेल असा स्वभाव. त्याचा व्यापारी दृष्टिकोन रक्तामध्ये होता. सर्व सुख घरी होते. प्रत्येक वेळी पैसे खर्च करायचा प्रश्न आला की तो मुलाला व पत्नीला टोके. पत्नी नोकरी करायची. लोकांच्या मदतीला धावणारी होती, खर्चिक स्वभावाची ती स्वत:हून निर्णय घेऊन घरात काही करायचे किंवा आणायचे झाल्यास धर्मेन्द्रला न विचारता काम करून मोकळी व्हायची. मुलगा शैलेन्द्रही उंच, धिप्पाड, नाकीडोळी चांगला, सावळा, हुशार. काही ध्येय डोळ्यासमोर धरून चालणारा. पण जे हवे असेल ते न सांगता घेऊन यायचा. तसे हवे असल्याचे सांगायचा. कॉलेजला, क्लासेसला आईवडिलांनी काही कमी पडू दिले नाही. धर्मेन्द्र आज ६० नंतरही आपल्या छंदात वेळ घालवत घरात जमेल तसे काम करायचा. मुलगा अमेरिकेत एमएस करण्यासाठी गेला. यशस्वीरित्या त्याने शिक्षण पूर्ण केले. आईवडिलांच्या खर्चाचे, कष्टाचे सार्थक केले. आई मुलाचे कौतुक बघण्यास पदवीदान समारंभासाठी अमेरिकेत दोन महिने राहून आली. शैलेन्द्र बाबांना नंतर बोलवणार होता.

धर्मेन्द्रचा नाईलाज झाला. तो खिडकीतून क्षितिजाकडे पाहत बसला. सूर्याची किरणे हॉस्पिटलच्या खोलीत पडत होती. टॉर्च जसा प्रकाशझोत टाकतो तसा सूर्यप्रकाश येताना दिसत होता. एकीकडे नर्स त्याला ओल्या कपड्याने पुसत होती. दुसरी नर्स बीपी चेक करीत, औषध, इंजेक्शन्स, रिपोर्ट पाहून देत होती. धर्मेन्द्रचे तिथे लक्षच नव्हते. तो आपला आकाश बघण्यात गुंग झाला. ग्लानीत हळूहळू डोळे मिटू लागले. संवाद सुप्त मनात सुरू झाले. काय गूढ आकाश आहे, कुठे सुरू होते कुठे अंत कळत नाही. कुठली गूढ शक्ती हे नियमन करीत आहे? आपले शरीरही आतून पोकळ आहे. आपल्या हृदयातील स्पंदने कोण ठरवतो? न बोलता न सांगता ही दुसऱ्या न ओळखणाऱ्या व्यक्तीला कसे कळते? उन्हें पडल्याने ढग पांढरे दिसत होते ते म्हाताऱ्या वयातील पुरुषाच्या केसांसारखे विस्कटलेले भासत होते. धर्मेन्द्रने आपले केससुद्धा पांढरे होते, आपण काळे करतो, त्यात विशेष काय? किरणांची चादर कुणीतरी अगत्याने दोन्ही खांद्यांवर पांघरली.

शैलेन्द्र नोकरीला लागला म्हणून धर्मेन्द्रला घर बघण्यासाठी कौतुकाने अमेरिकेला बोलावले म्हणून गेला. कुठलेही काम बाहेर करावयाचे झाल्यास डॉलर मोजावे लागत. अमेरिकन पॅकबंद जेवण आवडत नसे. व्यावसायिक मन डॉलरची तुलना रुपयात करू लागले. त्यामुळे खर्च जास्त वाटत होता. त्याच्या मनाला ते पटेना म्हणून घरीच सर्व करू लागला. शैलेन्द्रचा वाढदिवस जवळ आला होता. त्याने त्या आधी सेलिब्रिशन केले. थंडी वाढू लागली. दिवसभर घरात बाहेर एकट्याला फिरता येत नसे. कुठे जायचे म्हटले की डॉलरचा खर्च. ठिकाणे माहीत नाहीत. कुणाला बरोबर घ्यायचे म्हटले तर शैलेन्द्रशिवाय कोणी नाही. त्याची नोकरी नवी. आजूबाजूला भारतीय होते पण भारतात जसा मोकळेपणा असतो तसा तिथे दिसत नव्हता. त्यामुळे तो बाहेर जाण्याचे टाळत असे. होमसिक झाल्याने त्याला अॅसिडिटीचा त्रास झाला. आधुनिक जगात मोबाईलमध्ये व्हॉट्स ॲ‍प, व्हिडिओ सोय केल्याने पत्नीशी घरी बोलता येत असे. तो बोलत असताना दाढी वाढलेला, हळू आवाज पाहून राधिकाच्या मनात धस्स झाले. तिला वेगळेच वाटले. तिने धर्मेन्द्रला काय होत आहे विचारले. त्याने फोनवर “अगं पोटात दुखतं, जळजळतं आहे.”

“तुमचा आवाज का असा खोल गेला आहे?” काळजीने तिने विचारले.

“दुखत आहे. मोठ्याने बोललो तर त्रास होतो.” चेहऱ्यावर वेगळेच भाव जाणवल्याने तिच्या काळजात धस्स झाले. तिने शैलेन्द्रला ताबडतोब तिकीट काढून भारतात पाठवायला सांगितले.

“अगं, दोन दिवसांनी माझा वाढदिवस आहे नंतर पाठवतो.”

“नाही. आजच तिकीट काढून बसव.” आईपुढे शैलेन्द्रचे काही चालले नाही. त्याने तिकीट काढून वडिलांना काळजीपूर्वक भारतात पाठवण्याची व्यवस्था केली. शिकागो विमानतळावर व्हीलचेअर देऊन सुपरवायझरच्या मदतीने विमानात नीट जातील असे बघितले. तो चिंतेत होता. उदासपणे धर्मेन्द्र गेटच्या बाहेर चेक इनपर्यंत जाईस्तोवर दूरवर बघत होता. विमानात येऊन बसल्यावर शेजारी एकेकटेच प्रवासी आल्याबरोबर मोबाईल बघत बसले होते. धर्मेन्द्र कसाबसा सीटवर येऊन हळूच बसला. थंडी वाजू नये म्हणून गरम कपडे होतेच.

विमानाने आकाशात झेप घेऊन एका विशिष्ट टप्प्यावर समांतर रेषेत आले. स्थिर झाल्यावर विमानातील स्वागतिकेने सर्वांसाठी चहा, पेय, फ्रूट्स वाटण्याला सुरुवात केली. ती धर्मेन्द्रजवळ आली “येस प्लीज!” त्याला काही इच्छा नव्हती. पोटात जळजळत, दुखत होतं. तो शांत डोळे मिटून सीटवर झोपला होता.

“ओ भाईजी, मैं तुमको देती वोईच खावा और ये थोडा पानी पि लो. जस्ट डू इट वॉट आय सक.” धर्मेन्द्रच्या जवळ कुणीतरी आल्याचे त्याला जाणवले. असा अनपेक्षित आवाज कुणाचा? काय संबंध? कुतूहल निर्माण झाले. धर्मेन्द्रला मदतीची आवश्यकता होती. पण अमेरिकेत कोणी येईल ही कल्पना नव्हती. त्याने डोळे उघडून पाहिले. गौरवर्णी, धिप्पाड, टपोरे नाक, घारे निळे डोळे, अंजन घातलेले, अंगात लाल रंगाचा स्पोर्ट्समन सूट, स्पोर्ट्स शूज, गळ्याभोवती गाठ मारलेला पांढरा निळा रुमाल, असा वेष परिधान केलेला, पठाणी, प्रसन्न चेहरा, आश्वासक धीर देणारा वाटला. त्याच्या बोलण्याचा स्वर काळजी, जिव्हाळ्याचा. त्यातून प्रेम जाणवत होते. भाषा थोडी इंग्रजी तर उर्दू हिन्दी अशी होती. उच्चार वेगळे होते. समजण्यास कठीण जात होते. त्यामुळे राहून राहून आश्चर्य वाटले की मला काही होतं आहे हे याला कसे कळले? त्याने जवळ येऊन खाली वाकून दोन्ही खांद्यावर हात ठेवले. त्याचे अस्तित्व मनाला उभारी, आनंद, चैतन्यमय देणारे वाटत होते.

“खुदाकी मर्जी. उसकी मर्जीसे दुनिया चलती है कोई फिकीर ना करो. सब ठीक होगा. अल्ला मेहेरबान है.”

“साहेब, आपका परिचय?”

त्याला नाव कळल्यावर त्याने ‘धर्मेन्द्रभाई’ असे म्हणत संवाद चालू केला. “मेरा नाम मोझिम अहमद.

“नमस्ते मोझिम अहमदसाब,” असे म्हणताच थोडा चेहरा रागावल्यागत वाटला. चूक सुधारून ताबडतोब “नमस्ते मोझिमभाई,” म्हणताच तो थोडा सुखावल्यागत मोकळा झाला. त्याने मान डोलावून संमती दिली. त्याने खिशातून अंगठी एवढी लहान डबी काढून त्यातील गुलाबी गोळी व पाणी देत “ये तुम खातो तो पेटमे आराम मिल्तो.” त्याला वाईट वाटू नये म्हणून घेतली. तो बिझनेस क्लासमध्ये गेला, येताना धर्मेन्द्रसाठी गोळी व सफरचंदाचा रस घेऊन आला.त्याने रसाबरोबर गोळी घेण्याची विनंती केली. ज्यूस पीत असताना त्याने स्वत:विषयी सांगण्यास सुरुवात केली..

‘यह जूस में बनाती मेरी फॅक्टरी,”मध्येच उर्दूमिश्रित हिंदी इंग्रजीत “It is supplied at International level even in International flights.”यह तुमको एनर्जी देती. पेट की बर्निंग और दुखना बंद हो जाती. आमी आराम देतो.” मी त्याच्याकडे पाहत राहिलो. त्याने दिलेलं ज्यूस घेतलं. याला माझे दुखणं कसं कळलं? काहींना अतिंद्रिय शक्ती असते त्यामुळे समजते असे हिंदू धर्मात सांगितले आहे. अशी माणसे चेहरेपट्टीने वेगळीच दिसतात. हा तर उच्चभ्रू दिसत होता. या विचारात ग्लानीने झोप कधी लागून गेली ते कळले नाही. हालचाल झाल्याच्या स्पर्शाने जाग आली. अंगावर पांघरूण टाकलेलं दिसलं. मोझिभाई शेजारी बसून तिरक्या नजरेने पाहत गालात हसत होता.

“अभी कैसा लगता धर्मेन्द्रभाई? आराम मिल गई?” त्याने विचारले.

“मी जरा वॉश घेऊन येतो.” मी उठतोय तो माझ्या मागे मागे माझी काळजी घेण्यासाठी आला. येताना त्याने ‘बिझनेस क्लासमध्ये कोणाला तरी हात केला. पुन्हा जागेवर येऊन बसल्यानंतर तो पुन्हा शेजारी बसला. न राहवून मी विचारले, “तुला कसे कळले मला बरे वाटत नाही?” हसून तो म्हणाला, “धर्मेन्द्रभाई, मुझे वोई बीमारी,” त्याने माझ्याशेजारील

व्यक्तीला त्याच्या बिझनेस क्लासमधील जागेवर बसण्याची पुन्हा विनंती केली.

“अभी अच्छा लगता है पहिलेसे,” त्याला कसे कळले हा प्रश्न काही पिच्छा सोडत नव्हता. जाणून घेण्यासाठी काहीतरी सुरुवात केली. त्याने इंग्रजीत सुरुवात केली.

“धर्मेन्द्रभाई, तुम जिंदगीमे अच्छा काम करी. दुसरोंकी मदत करी. उसका मीठा फल… उपरवाले खुदा मालिक बक्ष. उसने आपकी सेवा करने मुझे मौका दिया. इन वर्ल्ड, देअर इज ऑलवेज अॅन ओरा अराऊंड एर्वी लाईव्हज्. ईट इज लाईट ऑफ ब्लीर. वेव्हज आर रिसीव्ह टु पासिग नियर बाय. अवर्स मॅच अँड क्लिक्ड्, अॅण्ड धिस हॅज वॉट हॅपन्स नाऊ विथ यू अँड मी, धर्मेन्द्रभाई, इन्सान के जनम में इन्सान अगर अच्छा करम करती तो उपरवाला खयाल करती. मालिक रिटर्न विथ गिफ्ट अँड यू रिसिव्ह इटइन सेफ लाईफ.” तो काय बोलत आहे हे कळत होते पण त्याला मला बरे नाही हे कसे जाणवले? या गोष्टीने मी खरोखरच हबकून गेलो. त्याच्याकडे अशी कुठली शक्ती आहे की त्याला कळले? हा प्रश्न काही पिच्छा सोडत नव्हता.

त्याने स्वत:विषयी सांगायला सुरुवात केली. ‘आय ॲ‍म इन अमेरिका सेटल्ड. मेरी बीबी इज मेक्सिकन, टू चिल्ड्रेन. दे आर इन बिझनेस क्लास सिटींग.”

“आपको मेरी मदत करने की इच्छा क्यों हो गयी?”

“अल्ला!” वर बोट करीत तो म्हणाला, “उसिने कहा मेरे दिलमें मैं बैठा.” त्याने मुले आणि बायकोला क्रू तर्फे बोलाविले. माझा परिचय करून दिला. तिघेही माझ्या पाया पडली. हिंदुस्थानी रितीप्रमाणे मला अतिशय आश्चर्य वाटले तिघांनी नमस्कार केल्यावर. बायको मेक्सिकन. मुलेही गोरी. मुले अतिशय लाघवीपणे माझ्याशी बोलू लागली. नाव सांगून परिचय देऊ लागली. मोझिमने बायकोशी ओळख करून देताना “यह बहोत अच्छा खाना बनाती हई. हमे सब साथमें गरम गरम खाना बनाकर लाये है. वेज पुलाव बनाया है. आप को खिलाती.” मला हवे नको हे न विचारता त्याने क्रूला बायकोबरोबर बिझनेस क्लासमधून आणायची विनंती केली.

“मैं बस कॉफी पिऊंगा. कुछ खाना नही.’

“हां हां वोभी होगा बादमें. पहला खाना खा लेना. आप भाई कुछ खाया नही होगा. ज्यूस तो मेरी दो फलोंकी. फार्म हाऊस और फलका ज्यूस का कारखाना है उसमें बना हुआ है.’

‘आप का?” “मला आश्चर्य वाटले. माझा आवाज “हळूच होता.

“मेरा ५ स्टार हॉटेल्स का चेन है. पुरी फॅमिली माँ, पिताजी, भाई, बहन सबको अमेरिका ले गया. ३५ साल हो गये. सब ग्रीनकार्ड होल्डर है. बिझनेस में व्यस्त है.

“उसके पहले कहाँ थे आप?”

“मैं पाकिस्तान का हूँ. अभी औरत, बच्चों को लेके पाकिस्तानमें धार्मिक यात्रा करने जा रहा हूँ. उसके बाद मक्का मदिना! वहा बच्चे और बीबी के हाथसे दानधर्म करूंगा. हरसाल अकेला नही तो पिताजी के साथ, तो कभी अकेला जाता हूँ. बच्चों को स्कूलमे छुटी नही मिल रही थी. स्कूलको आठ दिन की चिठ्ठी देकर ले आया।

“इतना आप अल्लाको मानते हो.” मी काहीतरी विचारायचे म्हणून विचारले.

“अरे धर्मेन्द्रभाई, दुनिया में क्या है? उसने तो दिया सब. मैं अल्ला को नही मगर हिंदू धर्मको भी उपासना करता हूँ.” मोझिभाई.

“ओऽऽ! बहोत अच्छे. क्या हिंदुधर्म भी अच्छा लगता है?” मी त्याचे बोलणे ऐकून सर्दच झालो.

“मेरे पिताजी और माँ सब धर्म को आदर करती है. मेरे बच्चे अमेरिका में पैदा हुए. तो भी उनको दिनमें ५ बार नमाज पडना बोलता हूँ. उसके साथ हिंदू धर्म की गीता, मानव धर्म, मानवता. कुछ भारत का इतिहास सिखाने के लिए घरमें शिक्षक रखा है। हफ्ते में तीन दिन आता है सिखानेको । मेरे माता और पिता को हिंदू धर्म, मानवता का बहुत आदर करते है. मुझे ये सब बच्चोंको अनुभव दिलाना है. हम सबको यह संस्कार माता पिता ने दिये । वह ही मैं बच्चों को दे रहा हूँ. पैसा तो है। मगर जीवन का अनुभव, गरीब लोग कैसे रहते है, उनकी हाथों से सेवा अदा करने पाकिस्तान जा रहा हूँ। मेरे माता पिता को जब भारत, पाकिस्तान का, बटवारा हुआ तब की परिस्थिती की याद है।”

इतक्यात विमानातील क्रू व बायको बिझनेस क्लासमधून आली. मुले तिकडेच बसलेली होती. क्रूला बायकोने केलेला पुलाव गरम करून आणायला सांगितला. तिने होकार दिला. पुलाव घेताघेता म्हणाली, ‘आज आप इनके स्पेशल गेस्ट है. आपके जो बाजूमें बैठे थे उनको अपनी बिझनेस क्लासकी सीट देकर यहाँ आपका खयाल रखने बैठे । मेरे फ्लाईट के अनुभव में ऐसा पहिली बार देखी हूँ.” ती डिश, चमचा आणायला गेली.

“धर्मेन्द्रभाई, तुम पडे हिंदू और वो भी बामण! आप खाओगे वेज बिर्याणी? मुस्लिमने बनाई हुई?” मी सर्दच झालो. मी भारतीय आहे ही गोष्ट खरी. तो ओळखता येते. पण मी ब्राह्मण आहे हे याला कसे कळले? ओळख तर नाहीच. कुठेही बोलणे नाही. मला राहून राहून आश्चर्य वाटले. याच्याकडे कुठली शक्ती आहे की तो इतर कुठे न जाता माझ्याकडेच येऊन आपुलकीने करीत होता. पाकिस्तानी असूनही भारतीयाचा द्वेष नाही की कुठलेही अपशब्द नाहीत. मुलांना हिंदू धर्म इतिहास शिकवतो. धर्मेन्द्रला त्याच्या

मोठ्या भावाने सांगितलेला किस्सा आठवला. डेन्मार्कमध्ये हॉटेलला असताना शेजारी कोहिनूर हॉटेल पाहिले. कोहिनूर हॉटेल म्हणजे भारतीय श्री. मनोहर जोशींचे तर नाही? चला, भारतीय जेवण मिळेल या आशेवर तो आत शिरला. हॉटेलमध्ये कुणी नव्हते. अर्धा तास बसवून ठेवले. मालकाने फक्त “आर यू इंडियन?’ असे विचारले. वाटलं आपुलकीने चौकशी करत असेल. “Yes, I am from India.’ त्याला तुम्ही कुठचे विचारले तेव्हा “I am from Pakistan ” एवढे बोलून त्याने “No Dinner. You are Indian ”धर्मेन्द्रला याचे वागणे, बोलणे व ओळख नसताना काळजी घेणे याचे वेगळे वाटले. माणूस देशभक्ती, जात, धर्म मानवी संवादात का आणतो? धर्म तर कुठलेच अधर्म , अमानवी कृत्य करा असे सांगत नाही. मग तेढ का? का हा अमेरिकेत राहिला म्हणून विशाल मनाचा झाला? तरी मूळ तो पाकिस्तानीच ना? गुंता काही सुटत नव्हता.

“धर्मेन्द्रभाई, कहा खो गये?”

“नही, ऐसा कुछ नही । मैं मानव धर्म मानता हूँ । मैं ज्यूस नही कॉफी पिऊंगा.”

“हां. हां. वो भी मिलेगा बादमें.” त्याने स्वत:च्या हाताने पुलाव डिशमध्ये घालून दिला. खाण्याचा आग्रह इतका केला की भरवण्याचे फक्त बाकी राहिले होते. मी हळूहळू खाऊ लागलो. ज्यूस पिऊन झाले. त्याने स्वत: माझी डिश फ्लाईटमध्ये कोपऱ्यात क्रूकडे जाऊन

दिली. मला डोळ्यावर ग्लानी चढू लागल्याचे सांगताच त्याने अंगावर शाल टाकली. तो शेजारीच बसला. वेळ किती निघून गेला ते कळले नाही. काही वेळाने जाग आली तेव्हा तो म्हणाला, “धर्मेन्द्रभाई, चलो अबुधाबी आया. हम सबको उतरना है। हम पाकिस्तान जाएंगे आप हिंदुस्तान. अमेरिका फिर आव वहां फिर मिलेंगे.” डोळे ग्लानीमध्ये होते. त्याने आयुर्वेदिक गोळ्या व ज्यूसचा कॅन बरोबर देऊन विमानात औषध घेण्यास सांगितले. शैलेन्द्रचा फोन, माझा फोन लिहून घेतला. एवढेच काय शैलेन्द्रला पुन्हा गेला की संपर्क करून त्याला काही हवे नको ते हक्काने कळवायला सांगा. भारतात पोहोचल्यावर फोन करा किंवा व्हॉट्स अॅप मेसेज टाका. विमान अबुधाबी विमानतळावर उतरले. त्याने व्हील चेअर मागविली. माझे सामान घेऊन तो त्याचे कुटुंबाबरोबर चालू लागला. खाली उतरताच मोझिभाईने सामान बाजूला ठेवून सर्वांनी नमस्कार केला. मी आशीर्वाद दिलेच. पण संपर्कात राहण्याचे आश्वासन दिले. ट्रॉली घेऊन हळूहळू पुढे चालू लागलो. मोझिभाईने पोलिसाजवळ जाऊन माझ्याविषयी सांगितले. तो पोलिस जवळ येऊन त्याने माझ्या ट्रॉली व खुर्चीचा ताबा घेऊन मला मुंबईला जाणाऱ्या विमानात बसवून

देण्याची जबाबदारी घेतली. तो अगदी सुरक्षा तपासणीमधून विमानात बसेपर्यंत माझ्याबरोबर होता. फ्लाईट क्रूनेही “बाय अंकल, टेक केअर’ बाहेर खाली उतरल्यावर जवळून जाताना म्हटले. माझी व्हीलचेअर पुढे जात असताना मोझिमभाई आणि त्याचा पूर्ण परिवार रांगेत असल्यासारखे उभे होते. त्यांनी सर्वांनी उजवा हात स्वत:च्या छातीवर उजवीकडे ठेवून ‘अल्ला मेहेरबान, खुदा हाफिज, सुभानअल्ला!” असे माझ्याकडे बघून म्हणाले. मीही त्यांना “शुक्रीया, बँक यू ऑल डियर! फिर मिलेंगे! भगवान आप सबका भला करे. आप का खयाल रखो, मोझिमभाई सचमुच आप भगवान है । मैं जिंदगी में एक अद्भुत अनुभव पाया.” मला सुरक्षारक्षक मुंबईच्या दिशेने निघालेल्या “विमानात नेत होता. मी त्याला हात हलविला. “बाय मोझिमभाई, बाय भाभी.”

“अहो, काय झाले. तुम्ही जागे झालात का? तुम्ही रात्रीच परवा घरी आलात.” राधिका जवळ आली. माझा आवाज बहुतेक मोठा होता की काय माहित नाही. पाठोपाठ नर्स धावत आली. “क्या हो गया अंकल?”

टॉवेलला हात, तोंड पुसत ‘कुछ नही. इन्सान में भगवान का रूप देखा. चिकागो से अबुधाबी फ्लाईट में पाकिस्तान के मुसलमान भाईने मेरा खयाल किया. मेरे बारे में कुछ मालूम न होते हुए भी उसे मेरे बिमारी की जानकारी इसे कैसी हुई यह पता नहीं. उसी वजहसे मैं बंबई पहुँच सका. सच भगवान कैसा होता है ये पता चला.

“आपका कोई पुण्यकर्म होगा. माता पिता के आशीर्वाद.” नर्स.

“ए राधिका, तू त्याला पोहोचल्याचा मेसेज पाठविलास का?’ सूर्याची किरणे कधीच रूममधून गेली होती. “मोझिभाई मैं बंबई पहुँच गया हूँ. सॉरी, मैं और मेरी पत्नी आपको संपर्क ना कर पाए. मेरी बायपास हो गई. बोल नही सकता जादा इसलिए मेसेज डाल रहा क्षमा कर.” धर्मेन्द्रने राधिकाची वाट न पाहता मेसेज पाठवून दिला.

पलिकडून मेसेज आला “खयाल करे आपका. अल्ला आपको दीर्घ उमर दे. मैं मक्का मदिना जाकर आपके बारेमें दुआ मागूंगा. जरूर मिलेंगे.’ मोझिभाई.

हा अद्भुत अनुभव मनात खोल करून राहिला आहे. भारतीय विमानात किंवा विमानतळावर कुणालाच काही चेहरेपट्टी किंवा चालण्यातून जाणवले नाही याचे नवल वाटले.

-अरविंद बुधकर

ए ३/१०२, विशाळगड संस्था मर्यादित,
श्री कॉम्प्लेक्स ।।।, आधारवाडी, कल्याण (पश्चिम)
मो. ९८२०४०८५५३

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..