नवीन लेखन...

प्रितीची नवी ओळख 

रिमझिम पाऊस आला
सृष्टी रोमांचित झाली
प्रेमाच्या वर्षावात
दोघं होती नहाली

थोडावेळ एकाच छत्रीत
दोघं होती चालली
स्पर्शाला टाळत नंतर
आडोशाला स्थिरावली

मी हलकेच नजर
तिच्याकडे वळवली
ओल्या गालावरून
लाज होती घसरली

सोसाट्याचा वारा तरी
ती नाही घाबरली
नकळत थोडीशी
माझ्या बाजूला सरकली

थंड वाऱ्याच्या स्पर्शाने
जरी ती शहारली
संयमाला टेकून
हलकेच कुडकुडली

मध्येच विज कडाडली
ती नाही बिचकली
थोडीशी हलली अन्
कोवळ्या लाजेला बिलगली

मी हलकेच मनाने
तिला माझ्याजवळ ओढली
माझी चलबिचल बघून
ती नाजुक होती हसली

कळल नव्हतं दोघांना
ओढ ही कसली
पण प्रितीला प्रितीची
नव्याने ओळख पटली

  • डॉ.सुभाष कटकदौंड

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..