नवीन लेखन...

परमपुज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराजांची प्रवचने – भाग १

Pravachan by Sadguru Swami Maharaj - Part 1

जया अंगी नाही द्वैत, अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जानितसे ………भाग १

द्वैत म्हणजे हेतू—अद्वैत म्हणजे हेतुरहित, अशी जी ज्योत असेल, ती आत्म स्थितीचा अनुभव घेउ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टी ज्या मानवाच्या मनाजवळ आहे तोच अशा आत्मस्थितीचा अनुभव घेउ शकतो. अशी स्थिती जाणून घेउ शकतो.

मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे पण हेतुरहित केव्हा होईल? हेतुरहित झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव घेउ शकणार नाही. पण मानव हेतुरहित केव्हा होउ शकतो? अहंकार रहित झाल्यानंतर मानव हेतुरहित होउ शकेल.

अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे. शत्रू आहे. रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरिता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्वपरीने सद्-गुरु चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही. मानवावर अनेक प्रसंग येत असतात. परमेश्वराने,अनंतानी मानवाला शक्ती दिलेली आहे. ही शक्ती सर्वत्र भरून उरलेली आहे. ते नाहीत असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर सद्गुरु चरणात, सत् चरणात लय असेल तर् सद्गुरू त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवितात. सद्गुगुरून्च्या ठिकाणी ज्योतीने सर्वस्व वाहने आवश्यक आहे. मन बाकी ठेउन जर सद्गुरु चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल तर त्याचा काय उपयोग आहे. एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंमध्ये तादाम्य पावलेली असेल तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो, “सता ! आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे. माझ्याकडे अर्पण करण्यासारखे आत्ता काहीच उरले नाही. अनंत जर काही शिल्लक असेल तर ते तुम्हालाच माहित असेल.”

मी रहित जे आहे ते अनंत.

— मयुर तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..