पंचांग आणि कॅलेंडर

मित्रांनो, एक जानेवारी दोन हजार पंधराअशी तारीख सांगणारे कॅलेंडर आपल्या खूप अंगवळणी पडला आहे. इंग्रजांच्या एकशे पन्नास वर्षाच्या अधिपत्या मुळे ते इथे आलं. आपल्या जुन्या पिढीतील माणसं चैत्र, पावसाच्या भाषेत बोलायचे, पितृपंधरवडा म्हटला की, भाद्रपद आठवतो आणि होळी फाल्गुनाची आठवण करून देते.

तिथी पक्ष असा पेहराव असलेल्या कॅलेंडरला एक सुटसुटीत पर्याय, लाभला तो इंग्रजी कॅलेंडरचा. इंग्रजी कॅलेंडरचा व्यवहारातील वापर हा इंग्रजांचे राज्य कारभारामुळे आला, पण खरे तर सुटसुटीतपणा मुळे सोपेपणामुळे विदेशी कॅलेंडर आपण स्वदेशी केले. सर्व व्यवहारात त्याचा मुक्त वापर सुरू झाला, परंतु सणवार, उत्सवही चंद्रावर आधारित तिथी, पक्ष या चंद्र कालगणनेवर चालतात. चंद्राच्या बारा महिन्यातील दिवस हा तिथीने दर्शविला जातो. तारखेने नव्हे. तिथे म्हटले की, तिची सुरुवात आणि शेवट यांचा संबंध दिवस, रात्रीची, राहत नाही. सारी जशी रात्री बारा वाजता सुरू होते, तशी तिची विशिष्ट वेळी सुरू होत नाही आणि ठराविक घड्याळीवेळी संपतही नाही. शिवाय तिथीची वृद्धी आणि होय हा एक वेगळाच कुतूहलाचा मामला आहे.

त्यामुळे सण उत्सवासाठी पंचांग म्हणजे चंद्रावर आधारित कालगणना आणि रोजच्या व्यवहारात सूर्यावर आधारित इंग्रजी कालगणना. धर्म आणि व्यवहार यांचा समन्वय साधणारा असा आपला साधा हिशोब आहे. त्यात गैर काहीच नाही.

इंग्रजी कॅलेंडर आपल्या हाडीमासी इतका खेळला आहे की. आपण दसरा केव्हा आहे असे विचारतो. खरंतर जत्रा केव्हा आहे. याचे उत्तर आपल्याला माहीत असतं दसरा म्हणजे अश्विन महिन्यातील शुद्ध केवळ फुटला पक्षातील दशमी तिथी हे त्याचे उत्तर. पण आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जे कॅलेंडर रोज वापरतो त्या कॅलेंडरच्या भाषेत हवं असतं. ३ ऑक्‍टोबरला दसरा आहे असं म्हटलं की आपली पेटते !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…