नवीन लेखन...

माहितीच्या सुरक्षेसाठी मेक इन इंडिया अंतर्गत साधने बनवा

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 11 आणि 12 ऑक्टोबरला भारताला भेट दिली होती. त्यावेळी एक दृश्य माध्यमांतून सातत्याने पहायला मिळाले, त्यामध्ये असे दिसून आले की चीनचे राष्ट्राध्यक्ष ज्या गाडीमधून आले ती गाडी रणगाड्यासारखी दिसत होती. त्या गाडीविषयी कोणाकडेही फारशी माहिती उपलब्ध नव्हती. नंतर असे कळाले की ती गाडी चीनच्या राष्ट्रध्यक्षांच्या भेटीकरता खास चीनमधून विमानातून आणली होती. काहींना वाटले की ही बुलेटप्रुफ गाडी असावी.

अर्थात इतक्या लांब चीन मधून बुलेटप्रुफ गाडी आणणे, हे काही फारसे हुशारीचे लक्षण खचितच नाही. त्यानंतर असे कळाले की या गाडीमध्ये प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साधने लावली होती,ज्यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे इतर सहकारी हे काय बोलतात यावर कोणालाही लक्ष ऐकता आले नसते, त्यांची बोलणे इंटरसेप्ट करता आले नसते. त्यांचे सहकार्यांशी कुठल्याही प्रकारचे संभाषण हे कोणत्याही प्रकारच्या सर्व्हिलन्स सिस्टिममधून टेहाळता आले नसते.

जेव्हा राष्ट्राध्यक्षांसारखी महत्त्वाची व्यक्ती काही बोलते तेव्हा त्यात गोपनियता पाळण्याची नितांत आवश्यकता असल्याची जाण चीन प्रशासनाला आहे. त्यामुळेच भारताने देऊ केलेली गाडी वापरण्यास नकार दर्शवत चीन च्या राष्ट्राध्यक्षांसाठी थेट चीनमधूनच गाडी मागवण्यात आली होती. म्हणजे राष्ट्रपतींकडे असलेली माहिती इतरांपासून लपवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू होते.

माहितीची सुरक्षा

चीनला माहितीच्या सुरक्षेचे किती महत्त्व वाटते, हे यावरून लक्षात येते. आज चीनमध्ये त्यांचे स्वतःचे सर्च इंजिन आहे. कारण सोशल मिडीयामुळे किंवा कॉम्प्युटरमधील सर्च इंजिन मुळे वापरकर्त्याची माहिती चोरण्याचा प्रयत्न होतो.भारतात मात्र गुगल आणि इतर सर्च इंजिने वापरतात, त्यामुळे वापरकर्त्यांची माहिती परदेशात जाते. आपल्या कॉम्प्युटरवरही इतर देशातील ऑपरेटिंग सिस्टिम असल्याने आपली माहिती सररास परदेशात जाते. अनेक सॉफ्टवेअर परदेशातून आल्याची शक्यता असल्याने देशातील माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतीन यांनी असे म्हटले होते की प्रत्यक्ष युद्धाला सुरूवात होण्यापुर्वी माहिती हे सर्वात मोठे हत्यार असेल. त्यामुळे कुठलाही देश, कुठलीही महत्त्वाची व्यक्ती, महत्त्वाची संस्था नेमके काय कऱणार आहे याचा माहिती काढून त्यांनी काही करण्याआधीच आपण त्यांच्या विरुध्द मानसिक युध्द किंवा माहीती युद्ध पुकारू शकतो.

आज चीनमध्ये कुठलाही सोशल मिडीया हँडल ला परवानगी नाही. आपल्याकडे उपलब्ध असणार्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर किंवा युट्युब या कोणत्याही चीनमध्ये नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या सोशल मिडीया साधने तयार केली आहेत.

माहितीच्या सुरक्षेसाठी मेक इन इंडिया अंतर्गत सगळे काही

त्यामुळे एक सावध देश म्हणून माहितीच्या सुरक्षेसाठी मेक इन इंडिया अंतर्गत माहिती व्यवस्था किंवा सर्च इंजिन बनवावी लागेल. कॉम्प्युटर करताही आपण स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टिम बनवली पाहिजे आणि मायक्रोसॉफ्टचा वापर टाळला पाहिजे. सोशल मिडीयावर वापरली जाणारी सर्च इंजिनही भारतीय बनावटीची असली पाहिजे. सोशल मिडीयावर असलेली माहिती आणि त्यांचे सर्व्हर हे भारतात असले पाहिजे. सरकारी माहिती जिथे वापरली जाते त्या सर्व ठिकाणचे सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टिम, तिथे असलेली अॅप्स, सर्व्हर ह्या सर्व गोष्टी भारतीय बनावटीची असली पाहिजे. तरच आपली माहिती देशामध्ये राहिल आणि माहितीची सुरक्षितता जपता येईल. आपल्या देशाने असे नियोजन केले पाहिजे की पुढील काही वर्षात भारताची स्वतःची भारत ऑपरेटिंग सिस्टिम तयार केली पाहिजे.  सगळ्या क्षेत्रात आर्थिक, संरक्षण आणि इतर असो त्यामध्ये आपली ऑपरेटिंग सिस्टिम वापरली तर आपली माहिती सुरक्षित ठेवू शकतो.

याशिवाय आपण कॉम्प्टर, मोबाईल मध्ये वापरले जाणारे स्विचेस किंवा हार्डवेअरही भारतात बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून माहितीची चोरी थांबवणे शक्य होईल.

माहिती चोरण्याकरिता विविध पद्धती व लक्ष ठेवा

काही दिवसांपुर्वी एक चीनी मासेमारी करणारा ट्रॉलर भारताच्या समुद्र हद्दीत अलिबाग जवळ आढळला होता. अर्थात हा ट्रॉलर काही मासेमारीकरीता आला नव्हता, पण तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर काही माहिती गोळा करण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळेच आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या टेहेळणी कऱणार्या बोटी, विमाने किंवा उपग्रह यांच्यावर काय कारवाई करता येईल याचा विचार करावा लागेल.

कोणत्याही देशाची महत्त्वाची माहिती चोरण्याकरिता विविध पद्धतीने प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी नव्या नव्या पद्धती वापरल्या जातात, त्या कोणत्या नव्या पद्धती आहेत, त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्यावर आपले प्रत्युत्तर एका निश्चित कालावधीमध्येच आपण द्यायला पाहिजे, तर आपल्या देशातील महत्त्वाच्या माहितीचे संरक्षण करू शकतो. नाहीतर आपली माहिती शत्रुदेशांकडे पोहोचायला वेळ लागणार नाही. त्या माहितीच्या उपयोगातून शत्रु देश सायबर वॉर करून आपल्याला प्रत्यक्ष युद्धाआधी पराभूत करतील. देशातील सर्वच विद्वानांना एकत्र करून मग ते आयआयटी असो किंवा इतर तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने देशाची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सुद्धा भारतात बनवण्याचे लक्ष्य  ठेवून, ते जितक्या लवकर साध्य करता येईल तितका प्रयत्न करावा. अन्यथा नव्या युगातील माहिती युद्धात किंवा इन्फॉर्मेशन वॉरमध़्ये भारत नक्कीच मागे पडू शकतो.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..