नवीन लेखन...

नात्यांची दुरुस्ती

सकाळी १० ला अश्विनी घरी आली. आणि तिने घराचा दरवाजा दुसऱ्या चावीने उघडला. ती आत आली पाणी पिऊन सोफ्यावर बसली. समोर पाहते तर काय एका ताटात वितळलेला केक त्याला लागलेल्या मुंग्या, त्याच्या बाजूला चाकू, मेणबत्ती, एक छोटीशी भेटवस्तू आणि माझं एक पत्र. ते पत्र घेऊन तिने वाचायला सुरवात केली.

पत्र

प्रिय बायको अश्विनी,

पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच माझी मनोभावे प्रार्थना. पहाटे ५ पर्यंत मी तुला आश्चर्यचकित करण्यासाठी तुझी वाट पाहत होतो पण नंतर कळलं कि तू तुझा वाढदिवस तुझ्या मैत्रिणीसोबत साजरा करत असशील. म्हणून फोन केला नाही. मी जरा आपल्या जवळच्या चोपट्टीवर फिरून येतोय. आल्यावर बोलू. आपल्या निरर्थक नात्याप्रमाणे हा केक वितळला असल्यास खाऊ नये. छोटीशी भेट आणलीय बघ तुला नक्की आवडेलच.
दररोज बोलताना आपली फक्त भांडणच मला दिसत असतात. आणि या भांडणामुळे मनात जे असत ते सोडून दुसरच गुणगान मी गात असतो. म्हणून बोललो तुला माझं तोंड न दाखवता, माझा आवाज न ऐकवता मनातल्या गोष्टी या पत्रातून सांगाव्यात. काल पर्वा मी मोबाईलवर फोटो पाहत असताना चुकून कॅमेरा सुरु राहून विडिओ रेकॉर्डिंग सुरु झालं त्या नंतर आपली भांडण सुरु झाली होती. ती मोबाईलमध्ये कैद झाली. मी किती अतिशहाणा आहे ते मला ती विडिओ बघून चांगलंच कळून चुकलंय. माणसाचं तोंड हे या जगातलं सर्वात मोठं आणि घाण गटार असत आणि ते रागात उघडल्यावर किती घाण वास मारत ते पण कळलं.
आज थोडं वाईट वाटतंय का तर तू काल मला घटस्फोटाचे कागदपत्र दिलेस. ते पाहून आज आपले मागचे दिवस आठवले. माझ्या आई बाबांचं सर्व कुटुंबाच्या परवानगीप्रमाणे लग्न झालं. पण मी जन्माला आल्यापासून फक्त त्यांची भांडणच पहिली आहेत. त्या भांडणात ते दोघे एकमेकांना वाईट बोलायचे, जखमी करून घ्याचे. हळू हळू मी मोठा झालो, मला कळायला लागलं कि ते निरर्थक गोष्टीवरून फक्त वाद घालत असतात. माझे बाबा व्यसनी वाईट मुळीच नव्हते. पण शिस्तप्रिय कडक स्वभावामुळे त्यांचा कुणावर विश्वास नव्हता. समाजांच्या जुन्या रितीरिवाजांमध्ये त्यांनी स्वतःला बांधून घेतलं होत. मला त्यांच्यासारखं मुळीच बनायचं नव्हतं म्हणून मी तेव्हाच ठरवलं होत कि मी प्रेम विवाहच करणार. मला योग्य वाटेल त्या मुलीशी मी लग्न करणार. आता माझे आईबाबा एका प्रेमविवाह झालेल्या जोडी सारखे राहतात, त्याच्यात हा बदल कसा झाला तेच कळत नाही.
तीन वर्षांपूर्वी आपली भेट झाली. पहिल्यांदा मैत्री झाली, परत प्रेमात कधी पडलो ते कळलंच नाही. आज आपल्या लग्नाला बरोबर एक वर्ष, एक महिना, एक दिवस झालाय. पण लग्नाआधीच आपलं वागणं आणि लग्नानंतरच आपलं वागणं किती बदलत गेलय. आपण दोघांना आपल्या घरातल्या लोकांनी पूर्णपणे नकार दिला तरी आपण पळून लग्न केलं. आज आपल्यातल्या भयानक बदलामुळे आपण किती दूर फेकले गेलोय. आज आपल्या घरातले, नातेवाईक, मित्रवर्ग, शेजारी आपल्यामागून आपल्याकडे बोट दाखवून बोलतात कि प्रेमविवाह केला कि असं होत. खरचं लग्नाआधी आपलं असं होत का ग ? किती आपण एकमेकांची काळजी घायचो. एकमेकांची मन दुखावली जाऊ नये म्हणून किती स्वतःला त्रास करून घायचो. कितीही वाद झाले तरी चुकी नसताना एकमेकांची माफी मागायचो. आणि आज आपण आपल्या भांडणामुळे एक मोठा तमाशाचा फड उभा केलाय. जो तो येतो सल्ला देऊन जातो. मला असं नकोय अश्विनी. आपण किती दूर झालोय नोकरीला लागल्यापासून. पहिल्यांदा वेळ काढून भेटायचो भरपूर बोलायचो. पण आता एका बेड वर असून बोलायचा कंटाळा येतो आपल्याला. मी म्हणत नाही तू एकटी चुकीची मी शहाणा. मी पण खूप चुका केल्यात. पण माझ्यामते भांडणाचं उत्तर घटस्फोट करून मिळणार नाही. आपल्या प्रेमाचा शेवट असा शेवट मला करायचा नाही. म्हणून छोटीशी युक्ती तुला सांगावीशी वाटतेय.
माझ्या मनात कधीच नव्हतं कि आपलं आयूष्य असं भांडणात जावं. पण आता असं वाटतंय कि मी तुझ्या आयुष्याची वाट लावली. पण ठीक आहे. जे झालं ते झालं. जर तुझ्या आयुष्यात कोणी चांगला मुलगा असेल किंवा तुला माझ्या आयुष्यात राहायचच नसेल तर मी तुला घटस्फोट द्याला तयार आहे.
पण जर तस नसेल तर आपण आपली संकट घटस्फोट घेऊन आजून वाढवू असं मला वाटत. घटस्फोट घेऊन पाहिलं आपण आपल्या आईवडिलांना दुखवू असं मला वाटत. त्यानंतर नातेवाईकांना आपल्या आईबाबांना टोमणे मारायची अजून एक संधी मिळेल. आपल्या मुर्खपणामुळे नातेवाईकांना चांगली संधी भेटेल आईबाबांना बोलायची. नंतर दुसरं लग्न आपलं करण्यासाठी घरातून दबाव सुरु होईल. आणि दुसरं लग्न करून पण चांगला जोडीदार मिळेल कि नाही याची बिलकुल खात्री नाही.
त्यामुळे आपण आपसात एक समंजस असा मैत्री करार करू यामध्ये कुणालाच त्रास होणार नाही.
तुला पण माझा हा निर्णय नक्की आवडेल.
आपल्या घराच्या बाहेरील लोक आपल्याला बघून जळले पाहिजेत असं काही तरी करू.
आपण एक चांगलं मैत्रीचं नातं ठेवून पण या घरात सुखी राहू शकतो.
घरातली सर्व काम आपण वाटायची.
तुझा पगारच तू काय करतेस माझ्या पगारच मी काय करतो हे एकमेकांना विचारायचं नाही.
घराचा सर्व खरचं अर्धा अर्धा करायचा.
मोबाईल बिल तुझं तू माझं मी भरेन.
घरात साफ सफाई दोघांनी करायची.
तू बेड रूम मध्ये झोप मी हॉल मध्ये झोपेन.
दोघांच्या घरातले कार्यक्रम आपण आवडीने एकत्र पार पाडायचे.
माझ्या ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्या तू एका कागदावर लिहून दे, जर मी त्या घरात केल्या तर मला ५०० रुपये दंड.
तुझ्या अशा कोणत्या गोष्टी नाहीच ज्या मला आवडत नाही. एक आहे ते म्हणजे तुझी शॉपिंग करणे. पण त्याच आता काय टेन्शन नाही कारण तूच तुझे पैसे शॉपिंगला वापरशील ना.
प्रत्येक रविवारी घरातली सर्व साफसफाई मिळून करायची. घर स्वच्छ राहील तर आनंदी वातावरण राहील घरात.
आपल्यात वादच कारण म्हणजे आपली भांडण सुरु झाली कि आपल्यातलं कोणी समजूतदारपणे माघार घेत नाही. त्यामुळे आपण पूर्ण घरात cctv कॅमेरा बसवायचं म्हणजे कोण चुकतंय कोण बरोबर आहे हे आपोआप कळेल. जेव्हा दोघात भांडणाला सुरवात होईल तेव्हा कॅमेराचा विडिओ रेकॉर्डिंग पाहायचं. वादामुळे फक्त आपली मन कलुशित होतील त्यातून पर्याय निघणार नाही.
मला मरतेवेळी पश्चताप करत मरायचं नाही कि मी तुझ्यासोबत का लग्न केलं. आपलं नातं या पद्धतीने एवढं सुंदर बनेल कि प्रत्येकाला प्रेमविवाहच करावा वाटेल. मला समजला, नातेवाईकांना, मित्रमंडळींना हसण्यासाठी तमाशा मंडळ खोलायचं नाही. एका मैत्रीच्या नात्याने पण आपण एक चांगलं नातं टिकवू शकतो. त्या चांगल्या नात्याच्या झाडाला घटस्फोटाची कीड नकोय. का आपण आपले पैसे वकिलांसाठी घालवायचे. ते आपल्यावर चित्रपट काढून कोर्टात प्रदर्शित करतील आणि प्रसिद्ध होतील. आपला फक्त तोटाच होईल. विचार कर आणि सांग.

तुझाच नावडता नवरा

मी मस्त समुद्र किनाऱ्यावरची हवा घेऊन घरी आलो. माझ्याकडे चावी होती तरी मी बेल वाजवली. अश्विनीने दरवाजा उघडून डायरेक्ट मिठीच मारली.

मी: अग काय झालं ? आत तरी येऊ दे ? लोक बघतील.

अश्विनी: लोकांना दुसऱ्यांची घर बघायची सवय असते. बघू दे. मला माफ कर. मी न विचार करता हा चुकीचा निर्णय घेत होते. माझी सर्वात मोठी चुकी ही होती कि आपल्यात होणाऱ्या भांडणाच्या गोष्टी मी माझ्या एका मित्राला आणि आईला सांगत होती. आणि दोघांनी पण मला असं काय काय सांगितलं आणि मी हे घटस्फोटाचे कागदपत्र तुला दिले. खरचं मी किती स्वार्थी झाली होती. जेव्हा आनंद होता तेव्हा तुझ्यासोबत होते आणि संकट आली कि पळ काढत होते. तुझा मैत्रीचा करार मला खूप खूप आवडला. खरचं नातं कमवणे किती सोपं असत. ते निभावनच खूप अवघड असत. रागात आपण फक्त स्वतःला बरोबर समजतो आणि समोरच्याला चुकीचं. आणि मुर्खासारखे निर्णय घेतो.

अचानक बाजूने आवाज आला.

उठा उठा

डोळे उघडले तेव्हा समजलं मी स्वप्न पाहत होतो. ज्या बाकड्यावर मी बसलो होतो त्याच बाकड्यावर मला झोप लागली होती.
समोर एक पैलवान माणूस उभा होता.

माणूस : उठा साहेब.
मी: काय झालं आपण कोण ?

माणूस: आम्ही पोलीस.
मी दचकलो

मी: काय झालं साहेब ?
पोलीस: मी तुम्हाला बायकोला विष देऊन त्यांचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करतोय.

मी: अहो साहेब मी असं काही नाही केलं.

पोलीस: तुमच्या शेजारच्यांनी, मुलीच्या आईबाबांनी, सर्वानी सांगितलं कि तुमचं त्यांचं पटत नाही. दोन तीन वेळा तुम्ही त्यांना भांडणात मारण्याची पण धमकी दिली होती.

मी: अहो मी फक्त बोललो होतो. मी असं काही करणार नाही.
पोलीस: तुम्ही कृपया आमच्यासोबत चला नाही तर आम्हाला जबरदस्ती करावी लागेल.

मी: नको. येतो मी. का मी माझ्या बायकोला शेवटचं पाहू शकतो ?
पोलीस: ठीक आहे आपण घरी आधी जाऊ.

मी : खूप खूप धन्यवाद.

मी विचार करत होतो
केकमध्ये विष आलंच कस. असं कस झालं. सगळं कुठे नीट होईल असं वाटलं होत. अचानक असं काय झालं.
पोलिसाना कस कळलं मी इथे बसलोय ?
पोलीस साध्या कपड्यांवर कसे ?
पोलिसाची गाडी वेगळी कशी ?
माझ्याकडे फक्त प्रश्न होते. काहीच कळायला मार्ग नव्हता. मन एकदम उदास झालं होत. मी बायकोचा खून केला आणि मला आता फाशी होणार का?

मी: अहो साहेब माझं घर मागे राहील.

पोलीस: आम्हाला शिकवू नका. गाडी बाजूला लाव रे. ( बंदूक दाखवून) चुपचाप खिशात जेवढे पैसे आहेत ते मला दे. मोबाईल दे.

मी: माझ्याकडे २००० रुपयेच आहेत. मोबाईल घरी आहे.
गुंड: चल निघ.

मला गाडीतून बाहेर ढकललं. तेव्हा कळलं कि ते पोलिसाच्या नाव पुढे करणारे चोर होते. पहिल्यांदा मी चोरांना भेटून खुश झालो होतो. म्हणजे माझी बायको जिवंत आहे आणि मी तिचा खून केला नाही.
पळत पळत घरी गेलो. बेल वाजवली.
अश्विनीने दरवाजा उघडला. ती काही न बोलता सोफ्यावर शांत बसली.

मी: काय झालं ?

अश्विनी: केक छान होता. मी उगाच विचार करत होती कि मी नवरा निवडताना चुकी केलीय.
ती माझ्या जवळ येऊन हातात हात घेऊन बोलली.
अश्विनी: असं का बोललास नावडता नवरा म्हणून. माझ्यासाठी तुझ्यासारखा परफेक्ट नवरा कोणीच शोधून दिला नसता. मला ही मैत्री कराराची कल्पना आवडली. किती वेळ आपला भांडणात वाया गेला.

मी : मला माफ कर.

तीने माझ्या ओठावर बोट ठेवून बोलली.

अश्विनी: मी पण चूक केली तू पण चूक केली. दोघांनी एकमेकांची माफी मागायची काही गरज नाही. कारण माफी मागून आपण परत तीच चुकी परत करायची परवानगी मिळवतो. मला आता परत चुका करायच्या नाहीत. एक हसत हसत नवीन सुरवात करूया. मला मैत्रीचा करार नकोय. मला फक्त मैत्री हवी जशी आपली लग्नाआधी होती तशीच. बेड आणि हॉल वाटून घेतले तर आपल्या जीवनाला अर्थ राहणार नाही. आपण माणूस आहोत रोबोट नाही. आपल्या आईबाबांशी मी फोन वरून बोलत होते. आपण लागण करून डायरेक्ट वेगळं राहायला लागलो. मला खर्च या घरात कर्मात नाही. आज आईबाबांकडे जेवायला जाऊया. आपण आपल्या भांडणात किती एकटे पडलोय. आई बाबांची माफी मागून आपल्या घरी एकत्र राहू. त्यांना पण आधार भेटेल. आपला वायफळ खर्च वाचेल. वहिनींना आणि आईंना माझी कामात मदत होईल. कालपर्यंत जे झालं ते झालं. नवीन मोठं घर घेऊ जिथे सर्व मजेत राहू शकू. परत एकदा नात्याची दुरुस्ती करूया आपल्या कुटूंबासोबत. तू खरच समजूतदार माणूस नक्की आहेस. ज्याला नातं तोडण्यापेक्षा नातं दुरुस्त करण्याची आवड आहे.

मी: घटस्फोटच काय मग ?

अश्विनी: पेपर कधीच फाडून टाकलेत. आता कितीही भांडण झाली तर तुझा पिच्छा सोडणार नाही

मी: मी सुद्धा.

लेखकाचे नाव :
अक्षय सुर्यकांत कुंभार
लेखकाचा ई-मेल :
maneklekhak@gmail.com

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..