नवीन लेखन...

भ्रम, अनुभूती की संमोहन ? (नशायात्रा – भाग ४)

बारावीला असतानाच, एकदा रस्त्यात ‘इस्कॉन’ ची गाडी दिसली, मोठी व्हॅन होती, सगळीकडे भगवान श्रीकृष्णाचे फोटो वगैरे लावलेले होते न गाडीचे मग दर उघडून आत गाडीत सगळीकडे देव देवतांचे फोटो असलेली पुस्तके विकायला ठेवली होती, कुतूहल म्हणून तेथे थांबलो, भगवे कपडे परिधान केलेले आणि डोक्याचा तुळतुळीत गोटा कलेले तरुण कार्यकर्ते जमलेल्या लोकांना ‘भगवदगीतेची’ पुस्तके विकत होते , मला जरा नवलच वाटले त्या लोकांचे तरुण वयात हे लोक असे देव धर्माच्या नावाखाली आपले घर दार सोडून कसे काय गावोगावी फिरतात ? यांच्या व्यक्तिगत इच्छा -आकांक्षा नसतील का काही ? म्हणजेच घर , संसार वैगरे . तेथे एक पुस्तक दिसले ‘ श्रीमद्भगवद्गीतागीता जशी आहे तशी ” नावाचे , अत्यंत आकर्षक मुखपृष्ठ होते पुस्तकाचे शंख, चक्र धारण केलेली श्रीकृष्णाचा सुंदर फोटो , मला वाचनाची आवड लहानपणापासूनच होती व वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके मी वाचत असे , ते पुस्तक म्हणजे श्री .प्रभूपाद्स्वामी यांनी केलेला गीतेचा मराठी अनुवाद होता , आवाक्यातील किंम्मत होती म्हणून ते विकत घेतले .
पुस्तकात सुरवातीला अत्यंत आकर्षक अशी महाभारताचे वर्णन करणारी चित्रे होती व कृष्णाच्या अर्जुनाला दिलेल्या ‘ विराट विश्वरूप दर्शनाचा देखावा ‘ असलेले एक मोठे चित्र होते . गीतेचे संस्कृत मधील श्लोक आणि त्याचा सुलभ मराठीत विस्तारीत अर्थ त्या पुस्तकात होता , सगळे पुस्तक ऐका बैठकीत वाचणे शक्यच नव्हते म्हणून अधून मधून ते पुस्तक वाचत असे ,आमची एकून तीन मित्रांची तिकडी होती व त्याच काळात आमची विलास गोवर्धने ( पाटील ) नावाच्या , आमच्या पेक्षा वयाने मोठा असलेला म्हणजे नोकरी करणारा आणि लग्न झालेला व्यक्तीशी ओळख झाली , आकर्षक व्यक्तिमत्व , राजकारण , काव्य , इतिहास , समाजकारण वैगरे वेगवेगळे विषय त्याच्या बोलण्यात असत त्यामुळे तो आमचा आवडता आणि आमचा जवळचा मित्र बनला होता , विलास बद्दल सविस्तर नंतर कधीतरी सांगेन , हा विलास आम्हाला नेहमी व्यसने बंद करा असा आग्रह करत असे अर्थात आम्ही त्याला तेव्हढ्या पुरते हो म्हणत असू , एकदा त्याने निर्वाणीने सांगितले जर तुम्हा तिघांना मी मित्र म्हणून हवा असेन तर तर तुम्ही गांजा पिणे बंद करा व त्यासाठी तुम्ही आधी एकमेकांना भेटणे काही दिवस बंद करा , पाहू तुम्हाला जमते का ते !

आम्हालाही मनातून व्यसन बंद करावे असे वाटत असे कधी कधी पण जमत नव्हते व तिघांची तिकडी इतकी पक्की होती की एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नसे , शेवटी आम्ही निर्णय घेतला की आपण किमान ५ दिवस एकमेकांना भेटायचे नाही म्हणजे गांजा पिण्याधी आठवण होणार नाही व आपले व्यसन सुटेल झाले ठरले .

पहिल्या दिवशी मी कॉलेज ला गेलो तेव्हा कुठेही न पाहता वर्गात जाऊन बसलो ते दोन मित्र वेगवेगळ्या वर्गात होते , त्यांना न भेटताच कॉलेज मधून सरळ घरी आलो , मात्र वेळ कसा घालवावा हे समजत नव्हते इतकी मित्रांची सवय झालेली , मग गीतेचे ते विकत घेतलेले पुस्तक काढून वाचत बसलो मात्र घरात एकाग्रता वाटेना म्हणून आम्ही मित्र रोज भेटत असू त्या ‘ नाशिक रोड ‘ मधील दुर्गा बागेत जाऊन बसलो दुपारची साधारण १ ची वेळ होती हिवाळ्याचे दिवस असल्याने उबदार उन पडले होते , बागेत एकदोन रिकामटेकडे होते फक्त माझ्यासारखे , मी छान हिरवळीवर पसरलो आणि पुस्तक वाचू लागलो , गीतेतील एकेक प्रसंग वाचत होतो ,

त्याच वेळी कशी कोण जाणे मला खूप झोप आल्या सारखे वाटले म्हणून उताणा पडून ते उघडलेले पुस्तक तोंडावर ठेवून काही वेळ डोळे मिटून पडलो , साधारणतः ५ मिनिटे झाली असावीत अचानक मला कोठून तरी एक वेगळाच मंद सुगंध जाणवला , आधी तो दूर होता नंतर अगदी माझ्या जवळ आल्यासारखा वाटला , हा सुगंध या पूर्वी मी कधीच अनुभवलेला नव्हता कोणते फुल , उदबत्ती अथवा माझ्या स्मृतीत असलेल्या सुगंधांपेक्षा एकदम वेगळा , अगदी राहवेना म्हणून डोळे उघडले आणि सुगंध गायब … आसपास पाहिले पण कोणीच नव्हते , काय झाले असावे नेमके , कोठून येत होता तो सुगंध ? या प्रश्नांची उत्तरे मला अजून मिळाली नाहीत . भ्रम होता, कसली अनुभूती होती की आत्मसंमोहन ?

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..