नवीन लेखन...

मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम

Marathi Actor and Director Master Dattaram

मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. त्यांचा जन्म १० जून १९१६ रोजी वळवई (गोवा) येथे झाला.

विष्णूपंत बोरकर त्या काळी वळवई येथे नाटके करीत. त्यांनी दत्तारामांना नट म्हणून व माणूस म्हणून घडवले. दत्तारामांचे ते मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक होते आणि दत्तारामबापूंनीही त्यांना अखेरपर्यंत पित्याचा मान दिला.

वयाच्या ९व्या वर्षी मास्टर दत्ताराम यांनी नाटकांच्या ओढीने घर सोडले, आणि ’कुंजविहारी’ नाटकात पेंद्याची विनोदी भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. ते गोव्यामधील प्रभात संगीत मंडळी’मध्ये पोहोचले. तेव्हा तिथे जुन्या मराठी संगीत नाटकांचा जमाना चालू होता. पण म्हणावी तशी नाटके चालत नव्हती.

या स्थित्यंतरातून दत्ताराम यांचे अभिनयकौशल्य कसाला लागून मान्यता पावले. अभिनयामध्ये व दिग्दर्शनामध्ये नव्या-जुन्या दोन्ही शैलींचा सुयोग्य वापर ते करू लागले. मास्टर गंगाराम व दत्ताराम हे दोन वळवई येथील अभिनेते रंगभूमी गाजवू लागले.जुन्या तालीममास्तरांचा पगडा दत्तारामांवर अधिक असला तरी, नव्या अभिनयशैली त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. जुन्या नव्यांचा एक अपूर्व संगम त्यांच्या रंगशैलीत होता. प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रक्त नको मज प्रेम हवे’ या नाटकात अभिनय करताना त्यांनी आपला जुन्या नाटकातील अभिनय किंचितसा बाजूला ठेवून, ते नव्या अभिनयाला सामोरे गेले.

तर ‘कौन्तेय’ आणि ‘वैजयंती’ या नाटकाच्या दिग्दर्शिका दुर्गा खोटे यांच्या दिग्दर्शनाखालीही त्यांनी तितकाच समर्थ अभिनय करून दाखवला. सखारामपंत बर्व्यांपासून ते पुरुषोत्तम दारव्हेकर आणि केशवराव दातेपासून ते चिंतामणराव कोल्हटकरांपर्यंतच्या दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली काम करून तेवढ्याच ताकदीचा अभिनय त्यांनी करून दाखवला. उमेदीच्या काळात गोव्यातील नाटकांत अभिनय करून वयाच्या २२ व्या वर्षी मास्टर दत्ताराम मुंबईत लालबागला वास्तव्यास आले. लालबागमधील गणेशगल्लीतील हरदास मथुरादास चाळ नं. ४२, खोली नं. २२ हा त्यांचा पत्ता. तेव्हा दत्तारामच ख‍ऱ्या अर्थाने’लालबागचा राजा’ होते. त्यांच्या अभिनयामुळे सर्व लालबाग त्यांच्या प्रेमात होते. सकाळी उठून लालबाग मार्केटमधून पिश‍वीतून मटण, मासे, भाजीपाला इ. आणायचे काम ते स्वतःच करीत. वर्षाचे बारा महिने ते थंड पाण्याने आंघोळ करायचे. त्यांची आंघोळ अर्धा ते पाऊण तास चालायची. आंघोळ करताना त्या रात्री होणाऱ्या नाटकांचे संवाद जोरजोरात बोलणे चालू असायचे. लालबाग गणेशगल्ली येथील ‘महाराष्ट्र सेवा मंडळा’ चा नळसुद्धा दुपारी दत्तारामबापूंसाठी रिझर्व्ह असायचा. ते आंघोळ करून जाईपर्यंत दुसरा कुणीही आंघोळ करण्यासाठी तिथे येत नसे.लालबागमध्ये आल्यावर परळच्या’दामोदर हॉल’ मध्ये त्यांची नाटके व्हायची. तिथे दत्तारामांच्या भूमिका पाहून गिरगांवातील साहित्यसंघाच्या नाटकांसाठी त्यांना बोलवणे आले.

साहित्यसंघाच्या ’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. मास्टर दत्ताराम यांनी तर नव्या दमाचे अभिनेते/अभिनेत्री डॉ. काशिनाथ घाणेकर, कृष्णकांत दळवी, रमेश देव, सीमा, श्रीकांत मोघे आणि पुढे सुप्रसिद्ध झालेल्या दिग्दर्शिका व अभिनेत्री विजया मेहता यांना नाट्यदिग्दर्शन केले.

मास्टर दत्ताराम यांनी’मत्स्यगंधा’ या नाटकात केलेली देवव्रताची भूमिका विशेष गाजली. त्या नाटकातील एका प्रयोगात, नाटक एका विशिष्ट उंचीवर जाऊन स्तब्ध होते. गंगापुत्र देवव्रताच्या भीष्मप्रतिज्ञेने प्रेक्षागृह अवाक् होत असे. रंगभूमीकडे त्यांनी एक व्रत म्हणून पाहिले आणि व्रताचा सांभाळ देवव्रताच्या निःस्पृह प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आयुष्यभर केला. त्या अर्थाने मास्टर दत्ताराम म्हणजे मराठी रंगभूमीवरचे देवव्रतच. शंभराहून अधिक नाटकातून अडीचशेपेक्षा जास्त भूमिका वठवणाऱ्या मास्टर दत्तारामांनी १५ हजाराहून जास्त प्रयोगाचा टप्पा ओलांडला होता,ही जेवढी अविश्वसनीय, अचंबित करणारी बाब वाटावी. त्यापेक्षा अजून मोठे आश्चर्य म्हणजे पहिल्या प्रयोगापासून ते सातशेवा प्रयोग असो;अभिनयातील राखलेले सातत्य,ज्याचे खुद्द कुसुमाग्रजांनाही आश्चर्य वाटले होते.

रंगभूमी पवित्र आहे व तिचे पावित्र्य आपणाकडून राखले पाहिजे असे ते म्हणायचे. आणि म्हणूनच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकातील एक प्रमुख नट दारू पिऊन रंगमंचावर अभिनय करायला लागला, तेव्हा दत्तारामांनी नाटकाच्या निर्मात्याला सांगून त्या प्रमुख नटाला काढून दुसऱ्या नटाला त्याच्या जागी उभे केले, पण दत्तारामांना नाटकातून सोडले नाही. दत्तारामांसारख्या व्रतस्थ माणसांच्या शब्दांना तेव्हाच्या रंगभूमीवर मान होता.

दत्ताराम यांचे १२ जून १९८४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विकीपीडीया

नाटय़वीर, मास्टर दत्ताराम
–संपादक : डॉ. अजय वैद्य, कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार,

पृष्ठे – २४४
मूल्य –६५० रुपये.

या पुस्तकात कमलाकर नाडकर्णी, भिकू पै आंगले, मोहनदास सुखठणकर, माधव वझे, रामदास कामत, कीर्ती शिलेदार,सुरेश खरे, विद्याधर गोखले, मामा पेंडसे यांसारख्या दिग्गजांनी आपल्या सरस लेखांनी मास्टर दत्ताराम अतीव आत्मीयतेने उलगडले आहेत.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम

  1. sir, was master dattaram from vasai taluka…? now in palghar dist ..?
    when and how was he associated with vasai…his son santosh is in vasai? please confirm..thanks

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..