नवीन लेखन...

माणसांसारखी मळताना दिसत नाहीत झाडं..!

झाडांच्या विश्वात…

माथ्यावर उन्हं आलेली… सूर्याकडे पहावं तर… डोळ्यावरची झापडं मिटू लागतात…रस्त्यावर सुद्धा फारशी वर्दळ नाही…एखादे-दुसरे वाहन अधून मधून जाते.झाडे मात्र अगदी स्तब्ध उभी….

#संतोष सेलूकर #झाडांच्या विश्वात…

झाडाच्या बाबतीत एक गोष्ट मला फार चांगली वाटते ती म्हणजे स्वतःहून हलायचं नाही.. काहीच करायचं नाही…. वारा आला तर आपल्या कक्षेत जेवढं हलता येतं तेवढंच हलत राहायचं …वारा गेला …पुन्हा जशास तसे स्तब्ध राहतात झाडं…. झाडाचं सुद्धा काही खरं राहिलेलं नाही आता…. माणसासारखं… ! काटकसरीचं जीवन त्यांना जगावे लागत आहे…. काय पण दिवस आलेत ! थोडं थोडं पाणी पिऊन दिवस काढावे लागत आहेत….

काही झाडांना तर स्वतःला कितीही मुळा पसरल्या तरी आसपास पाण्याचा थेंबही मिळत नाही. जगात असे अनेक विरोधाभास दिसून येतात. झाडांना लेकरांसारखी जपणारी जशी माणसं आहेत. तशी.. लेकरांना सुद्धा झाडासारखं तोडणारी माणसं या जगात आहेत.. मरणासन्न असलेल्या माणसाला आपल्या औषधाच्या जोरावर उठवण्याची ताकद जशी झाडात आहे, तशीच चालत्याबोलत्या जिवंत मनुष्याला जागीच गार करण्याची ताकद सुद्धा झाडातंच आहे…

मागे एक दूरदर्शनवर मालिका होती तिचं शीर्षक गीत कवी ग्रेस यांनी लिहिलेलं होतं ….. ‘झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया भय इथले संपत नाही…..’ खरं तर झाडं म्हणजे म्हणजे निर्मितीचे प्रतीक…. झाडांना नसतात कुठल्याही प्रकारचे हेवेदावे… माणसांसारखे ..! झाडांना नसते कधी कुणाचा बदला घ्यायची इच्छा किंवा लागत ही नाही त्यांना कुठलाच शब्द घावासारखा… झाडं ही फक्त आणि फक्त झाडंच असतात…. जे की माणसाचं हक्काचं ठिकाण असतं झाडे… नेहमीच.. कधी तर असा विचार मनात येतो की झाडं जर माणसासारखी बोलू चालू लागली तर मात्र काही खरं राहणार नाही माणसांचं … एकाच्या शेतातलं खत-पाणी खाऊन बरोबर दुसऱ्याच्या शेतात जाऊन बसतील झाडं तेव्हा माणसांना मात्र मारामारी करण्याशिवाय पर्याय उरणार नाही पण अशी माणसासारखी बेइमानी झाडांना थोडी जमणार आहे म्हणा ? कारण तो माणसांचा गुण आहे झाडं बिचारी मुकी असतात… निरागस असतात..लहान लेकरांसारखी..! खरंतर झाड जेवढी मुकी वाटतात.. आत डोकावून ऐकले तर तेवढीच ती बोलकी असतात…. झाडं वेळ घालवतात माणसांचा… कधी मेळ ही घालतात…. माणसांचा.. कधी कधी झाडं माणसांचे आधार होतात … कधी निरोपासाठी
फांद्यांचे हातही हलवतात… असं म्हणतात झाडं आतल्या आत रडतात कधी… रडवतात ही कधी… माणसांसाठी मूल असतात झाडं …. उन्हात पांघरण्याची झूल असतात झाडं.. झाडं तशी नुसती झाडं कधीच नसतात …त्यांच्या फांदी फांदीतून माणसांची हाडं सळसळत असतात.. उपकाराची परतफेड करण्यासाठी सदैव जागरूक असतात झाडं…

झाड म्हणजे… पाखरांची वसाहत! झाडं म्हणजे हिरवळ! जीवन प्रसन्न करणारा निसर्गातील एक अविभाज्य घटक…! रेल्वेत बसल्यावर झाडं पळताना दिसतात… मुलांसोबत खेळताना दिसतात… माणसांसोबत जळतांना दिसतात जसे वळविले तसे वळतानाही दिसतात…झाडं! पानांसोबत गळतांना दिसतात कधी झाडं.. सर्वांसोबत रुळताना दिसतात झाडं पण माणसांसारखी मळतांना दिसत नाही कधीच झाडं …पण माणसांसारखी मळतांना दिसत नाहीत कधी झाडं…..!!

— संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 25 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..