नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ४ – पांथस्थांना विसावा देणारा करंज वृक्ष

करंज – (करं जनयती इति करंज):
करंज (शास्त्रीय नाव: Pongamia pinnata (L.) Pierre Fabaceae). ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या मध्यम उंचीच्या झाडास करंजीच्या आकाराची फळे लागतात म्हणून याचे नाव करंज पडले. या फळांपासून निघणारे तेल हे आयुर्वेदात औषधी म्हणून वापरतात. त्यास ‘करंजीचे तेल’ असे म्हणतात.

विविध भाषेतील नावे :

मराठी: करंज,
संस्कृत – करंज; गौरा; चिरबिल्वक; नक्तमाल; पूतिक; प्रकीर्य; स्निग्धपत्र इंग्रजी : Pongam; Indian Beach
लॅटिन : Pongamia pinnata
गुजराथी : कनझी; कानजी
हिंदी : करंज; कांजा; किरमल; पपर
कानडी : हुलीगिली; होंगे

करंज हा सदाहरित वृक्ष भारतात सर्वत्र आढळून येतो. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पोंगॅमिया पिन्नाटा’ असे आहे. सर्व प्रकारच्या हवामानात याची वाढ होते. काळी चिकणमाती अथवा जांभ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. हा पश्चिम घाटातील मूळ रहिवासी असून ब्रह्मदेश, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे.

करंज साधारण १५ ते २० मीटर उंचीपर्यंत वाढतो, पण काही ठिकाणी ३० मीटर उंचीपर्यंत वाढला आहे. खोड काहीसे पसरट असते. खोडाची साल मऊ, गुळगुळीत किंवा गाठीयुक्त असून रंगांनी हिरवी-राखाडी असते. झाडाचा पर्णसंभार पसरणारा असतो. पाने एकांतरित, संयुक्त व विषमपर्णी असतात. ६ इंच ते १२ इंच लांब असणाऱ्या पानामध्ये पाच, सात किंवा नऊ लंबगोलाकार, टोकदार पर्णिका असतात. ती अत्यंत तुकतुकीत, मऊ, मुलायम, चमकदार, पोपटी-हिरव्या, तजेलदार वर्णाची असतात, म्हणूनच या झाडाच्या चमकत्या पालवीवरून त्याच्या ‘स्निग्धपत्र’ नावाची सार्थता पटते.

करंज ही वनस्पती लेग्युमिनोजी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पाँगॅमिया पिनॅटा आहे. मूळची आशिया खंडातील ही वनस्पती फिलिपीन्स, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व मध्य अमेरिकेतील उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात वाढते. कमाल २७०-३८० से. व किमान १०-१६० से. तापमान आणि ५०० – २,००० मिमी. पाऊस मानवणारी ही वनस्पती पडीत, रेताड, खडकाळ व निचर्‍याच्या तसेच क्षारयुक्त जमिनीतही चांगली वाढते. पूर्ण वाढ झालेले करंजाचे झाड पूर व हिमपातही सहन करू शकते. करंज झाड अतिशय कमी पाण्यात येणारे झाड आहे. या झाडाला कोणतेही जनावर खात नाही. त्यामुळे या झाडांची शेती दुष्काळी भागाला वरदान ठरणारी आहे.

तिचे खोड खुजे असते. फांद्या जाडजूड असून झाडाचा आकार छत्रीसारखा असतो. पाने, संयुक्त, पिसासारखी, लांब व टोकदार असतात. झाडाची सावली दाट असल्याने बाष्पीभवनाने जमिनीतील पाणी कमी होण्याची प्रक्रिया मंदावण्यास मदत होते. फुलोरे पानांच्या बगलेत असून गुलाबी किंवा जांभळट छटा असलेली पांढरी फुले एप्रिल ते जूनमध्ये येतात. फुलांत भरपूर मकरंद असतो. शेंगा ३-६ सेंमी. लांब तर २-३ सेंमी. रुंद असतात. शेंगेत १-२ बिया असतात. बी साधारण १-२ सेंमी. लांब, चपटी व लाल-करड्या रंगाची असते. याचे मुख्य मूळ सोटमूळ असून त्याला अनेक उपमुळे असतात. मुख्य मूळ जमिनीत खूप खोलवर जाते, तर उपमुळे लांबपर्यंत पसरलेली असतात. मुळांच्या अशा रचनेमुळे जमिनीची धूप थांबण्यास मदत होते.

साधारण एप्रिल ते जूनमध्ये झाड फुलांनी बहरून जाते. पान आणि खोडाच्या खोबणीमधून मंजिऱ्या बाहेर पडतात. त्यावर अतिशय लहान देठाच्या, तपकिरी कळ्या बाहेर पडतात. कळ्या उमलून त्याचे फिक्या गुलाबी, जांभळट फुलांत रूपांतर होते. या फुलांच्या तुऱ्यांना मंद वास असतो. काही ठिकाणी ही फुले रंगाने हिरवट पांढरी किंवा दुधी पांढरीही आढळतात. फुलोरे पानांच्या बगलेत असून गुलाबी किंवा जांभळट छटा असलेली पांढरी फुले एप्रिल ते जूनमध्ये येतात. फुलांत भरपूर मकरंद असतो. फुलात पाच पाकळ्या असतात, त्यापकी चार गुलाबी रंगाच्या असतात तर पाचवी पाकळी हिरव्या रेषांनी मढलेली असते. फुले कोमेजण्यापूर्वीच खाली गळतात. याचे मुख्य मूळ सोटमूळ असून त्याला अनेक उपमुळे असतात. मुख्य मूळ जमिनीत खूप खोलवर जाते, तर उपमुळे लांबपर्यंत पसरलेली असतात. मुळांच्या अशा रचनेमुळे जमिनीची धूप थांबण्यास मदत होते.

फुले ओसरल्यावर पाठोपाठ येतात पिवळसर, टणक, चपटय़ा करंजीच्या आकारासारख्या शेंगा. बियांपासूनच तेल काढतात. ‘करंजतेल’ म्हणून हे प्रसिद्ध आहे. करंज हा रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी एक वृक्ष आहे.

मूळ भारतीय रहिवाशी असलेल्या करंज वृक्षाचा तसा आसेतुहिमाचल अधिवास असला तरी तो प्रामुख्याने पश्चिम घाटांतील नदीनाल्यांच्या काठी तसेच समुद्रकिनाऱ्यालगतच्या जंगलातील दमट हवामानात सुखाने वाढतो. अर्थात पाणी किंवा क्षारयुक्त जमिनीत तसेच समुद्रसपाटीपासून ४००० हजार फुट उंचीवरील जंगलात देखील चांगला वाढताना दिसतो. भारतात सर्वत्र या डेरेदार वृक्षाची लागवड सावलीसाठी रस्त्यांच्या कडेला केलेली दिसते. या झाडाच्या सावलीत गवताची वाढ चांगली होत असल्याने गवताळ प्रदेशात लागवडीसाठी हे झाड उपयुक्त आहे. भारतातून या झाडाचा प्रसार दक्षिण पूर्व आशिया तसेच ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात झालेला आढळतो. करंज हे मध्यम स्वरूपाचे आकारचे, मध्यम बांध्याचे झाड असून त्याच्या पानांचा डोलारा पसरलेला दिसतो. याची उंची जवळपास ५०-५५ फुट किंवा त्यापेक्षा जास्त आढळते. बुंध्याचा घेर २ ते ३ फुटांचा असतो. याची संयुक्त पाने पाच-सात अंडाकृती पर्णिकांची असतात. वृक्षाचा प्रसार आशिया व ऑस्ट्रेलिया खंडात भरपूर असून भारतात तो समुद्रकिनाऱ्यावर व नद्यांच्या काठी सामान्यपणे आढळतो. दाट सावली देणारे अशी याची ओळख आहे. जंगलवृद्धीसाठी झाड साधारणपणे ४-६ वर्षात फळावर येते. फळांची तोडणी सर्वसाधारणपणे नोव्हेंबर – डिसेंबर ते मे-जून या काळामध्ये केली जाते. शेंगा हाताने सोलून बिया वेगळ्या केल्या जातात प्रत्येक झाडामागे अंदाजे ९ ते ९० किलो बियांची उपज होते. उपजेच्या अंदाजे ७५% संपादन एकटया कर्नाटकात होते. भारतात एकूण बियांच्या उत्पादनापैकी फक्त १०% बियांचे संपादन होते. झाडाच्या हिरव्या पानांवरील सफेद नक्षीकाम हे नेमॅटोड या सूक्ष्म प्राण्याच्या चलनवलामुळे झालेले आहे.

याच्या वंशातील ही एकच जाती असून ती फक्त उष्णकटिबंधातच सापडते. साल मऊ व काळसर हिरवी; पाने संयुक्त, पिसासारखी, १२ – २३ सेंमी. लांब; दले समोरासमोर पाच ते नऊ. चकचकीत; पानांच्या कुशीत फुलणारी फुले इवलीशी पण उदंड, सुगंधी, शुभ्र रंगापासून गुलाबी, जांभळ्या रंगापर्यंत विविध रंगाची उधळण करणारी. फुलांत मध भरपूर असून परागण (परागसिंचन) कीटकांद्वारे होते. फुलांची संरचना पतंगरूप [ अगस्ता]असते. फुले बारीक व गुलाबी गुच्छांनी येतात. त्यावेळेस झाड बघण्यासारखे असते. याचे कारण म्हणजे या फुलांतील मध गोळा करण्यासाठी अनेक किटक, भुंगे या झाडाभोवती पिंगा घालत असतात. याची फळे म्हणजे शेंगा, चपट करंजीच्या आकाराच्या किंवा पापडीसारख्या, कडक, पिकल्यावर पिवळट उदी रंगाच्या. संपूर्ण वृक्ष जेव्हा पानगळीने निष्पर्ण होतो तेव्हा सर्व फांद्यांवर शेंगा लटकलेल्या असतात. प्रत्येक शेंगेत बी मात्र एकच, क्वचित प्रसंगी दोन असतात. या बिया लाल-तांबडया रंगाच्या, कडू चवीच्या आणि तेलयुक्त असतात. जंगलवृद्धीसाठी झाड साधारणपणे ४-६ वर्षात फळावर येते. फळांची तोडणी सर्वसाधारणपणे नोव्हेंबर – डिसेंबर ते मे-जून या काळामध्ये केली जाते. शेंगा हाताने सोलून बिया वेगळ्या केल्या जातात प्रत्येक झाडामागे अंदाजे ९ ते ९० किलो बियांची उपज होते. उपजेच्या अंदाजे ७५% संपादन एकटया कर्नाटकात होते. भारतात एकूण बियांच्या उत्पादनापैकी फक्त १०% बियांचे संपादन होते. झाडाच्या हिरव्या पानांवरील सफेद नक्षीकाम हे नेमॅटोड या सूक्ष्म प्राण्याच्या चलनवलामुळे झालेले आहे. करंजाच्या बिया त्यातील तेलासाठी उपयुक्त आहे. विविध उद्योगधंद्यात व औषधात त्याचा उपयोग होतो. करंजाच्या बियांमध्ये अपचनकारक तत्त्वे असून त्यांचा विषारी परिणाम अन्नातून बियांचे चूर्ण किंवा पेंड दिल्यास प्राण्यांवर दिसून येतो. करंजाचे तेल कातडे कमाविण्यासाठी, वंगणासाठी व मेणबत्या बनविण्यासाठी वापरतात. या तेलाचा औषधी उपयोग आयुर्वेदात विशद केला आहे. करंज तेल पिवळट रंगाचे असून दीर्घकाल साठवणीनंतर ते अधिक गडद रंगाचे होते. तेलाचा उग्र गंध असून ते कडू असते. अतिशयोक्ती अलंकाराचा सर्रास वापर आयुर्वेदात आढळतो त्यानुसार ‘करं जनयति इति करंज’ असे नाव या वृक्षास प्राप्त झाले आहे. या तेलाच्या वापरामुळे महारोगाने जडलेली हाताची बोटे पुन्हा निर्माण होतात अशी कल्पना त्यात गर्भित आहे.

या झाडाचे सर्व भाग औषधी आहेत. मुळांचा रस जखमा धुण्यास, ताज्या सालीचा रस रक्ती मूळव्याधीवर पोटात घेण्यास व पानांचे पोटीस कृमियुक्त जखमांवर लावण्यास उपयुक्त असते; बियांची पूड ज्वरनाश व अशक्तता नाहीशी करणारी, कफोत्सारक व माकड खोकल्यावर (डांग्या खोकल्यावर) गुणकारी; फुले अग्निमांद्यावर; बियांचे तेल (करंजेल) संधिवातावर, कातडीच्या रोगांवर (खरूज, नायटे, पुरळ इत्यादींवर), खोकल्यावर वगैरे उपयोगांत असून साबण बनविण्यास व दिव्यात जाळण्यासाठीही वापरतात.

करंजमध्ये कटु, उष्ण, कफ, वात, योनीरोग, मूळव्याध, व्रण, कुष्ठ, गुल्म, कृमी नाशक इ. गुणधर्म असतात.

औषधी उपयोग:-

  • सांधे सूजले असता याची पाने पाण्यात वाटून लेप करावा व याचे तेलाने चोळावे.
  • उंदिर चावल्यास करंजाची साल व बी उगाळून लेप करावा.
  • खरजेवर करंजाचे तेल व कापूर एकत्र खलून लावावे.
  • अंडवृध्दी आणि गंडमालेवर याचे मूळ तांदळाचे धुवणात उगाळून लेप द्यावा.
  • मुंग्या येतात तेव्हा करंज तेलात कडू सूरणाच्या फोडी घालून तेल कढवावे व मुंग्या आलेल्या ठिकाणी लावावे.
  • व्रणामध्ये कृमी झाल्यास करंज, कडूनिंब व निर्गुडी यांची पाने वाटून लेप करावा.
  • पित्त पडण्यास करंजाची साल खाण्यास द्यावी.
  • अर्धशिशीवर याची बी गरम पाण्यात उगाळून त्यात थोडा गूळ कालवावा व ते नाकात घालावे.
  • ओकारीवर करंजाची बी किंचीत भाजून तुकडे करून खावी.
  • मधुमेहामध्ये याची फुले खावी.
  • चाई पडल्यास याची फुले वाटून लावावी.
  • डांग्याखोकल्यात याची बी उगाळून देतात.
  • घरात डास झाले तर करंजाची सुकी पाने जाळून धुर करावा, म्हणजे सर्व डास नाश पावतात.

करंज तेल अतिशय प्रभावी औषध आहे. याचे फायदे

त्वचा आणि केसांसाठी विविध तेल फायदेशीर असतात. स्किन केअर आणि हेअर केअर रूटीनमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे तेल वापरले असतील. आज करंज तेलाबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये सामील करून तुम्ही तुमचे सौंदर्य आणखी खुलवू शकता. करंज तेल हे तुरट आणि अँटी इंफ्लामेटर गुणधर्मांसह हायड्रेटिंग अँटीऑक्सिडंट आहे. करंजचे फुलं, साल, पाने, मुळे आणि बियांसह करंजच्या झाडाचा प्रत्येक भाग औषधी आणि कॉस्मेटिकसाठी उपयुक्त आहे. हे तेल एक्जिमा, जळजळ, विविध त्वचा रोग आणि अगदी जठरासंबंधी समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. तेलाचा वापर केला जात आहे. हे तेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे.

त्वचा विकारावर:
संक्रमित त्वचा विकाराच्या आजारांमुळे हे उपचारासाठी देखील किचकट बनतात. या आजारांचे निदान व त्यावरील उपचार हे पशुवैद्यकांच्या द्वारे आणि त्यांच्या सल्ल्यानेच करावेत. सुरुवातीस त्वचेवर एखादा चट्टा किंवा पुरळ येऊन त्या भागात खाज सुटते. असे जनावर गोठ्यातील भिंत किंवा एखादा खांब यास आपले अंग घासते, यामुळे त्या भागातील त्वचा लाल होते. ही त्वचाविकाराची सुरुवातीचे लक्षणे आहेत. सुरुवातीची लक्षणे आढळताच उपचार तत्काळ करावेत किंवा यावर संसर्ग होतो. या आजाराची तीव्रता वाढत जाते, बाधित भागावर जखमा होतात, त्यातून पाणी गळते. त्वचा विकारांवर उपचार करण्यापूर्वी त्यांचे नेमके निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जनावरांना परोपजीवी, जिवाणू, बुरशी किंवा इतर अनेक कारणांमुळे त्वचाविकार संभवतात. विविध प्रकारच्या त्वचाविकारांवर औषधी वनस्पतीद्वारे उपचार करणे सहज शक्य आहे. उपयुक्त औषधी वनस्पती करंज करंजी किंवा करंज या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. ही वनस्पती जिवाणूविरोधी, बुरशीविरोधी, परोपजीवीविरोधी असल्यामुळे त्वचा विकारांमध्ये हिचा वापर अत्यंत उपयुक्त आढळतो. सर्पदंश, कृमी व दूषित जखमा बऱ्या होतात.

करंज तेल कपूर एकत्र करून खरुजेच्या जखमेवर लावावी.

या वनस्पतीचे फळ औषधीमध्ये वापरतात. याचे तेल बाजारपेठेत मिळते. त्याचा वापर त्वचाविकारांवर करावा.
कारंजाचा उपयोग बद्धकोष्ठता हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो कारण ते आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करते आणि त्यात रेचक गुणधर्म आहेत. तुरट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे मूळव्याधांसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

आयुर्वेदानुसार, करंजाचे तेल मुख्यत्वे त्वचेवर फोडे आणि इसब व्यवस्थापित करण्यासाठी तसेच रोपण (उपचार) आणि प्रतिजैविक गुणधर्मांमुळे जखमा बरे करण्यासाठी लावले जाते. बरे होण्यास मदत करण्यासाठी त्याच्या पानांची पेस्ट काप आणि जखमांवर देखील लावली जाऊ शकते. करंजाचे तेल त्याच्या दाहक-विरोधी कृतीमुळे संधिवातमध्ये देखील उपयुक्त आहे.

करंजाच्या पानांनी नियमितपणे आंघोळ केल्याने वेदना आणि जळजळ कमी होण्यास मदत
होते.

करंजाच्या कांडाचा उपयोग दात स्वच्छ करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी
प्राचीन काळापासून केला जात आहे

उपयोग :

हे तेल जंतुनाशक आहे. यामध्ये ‘करंजीन’ व ‘पॉन्गेमॉल’ ही द्रव्ये आहेत. प्राचीन काळी विविध त्वचारोग, सर्पदंश, कृमी व दूषित जखमा भरण्यासाठी वापरले जात असे. पानांचा उपयोग संधिवातावर करतात. जंतुनाशक म्हणून याची पेंड बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. दिव्यामध्ये जाळण्यासाठी याचा उपयोग करतात. साबण बनविण्यासाठीही आणि वंगण म्हणूनही याचा वापर करतात. पानांचा वापर हिरवे खत म्हणुन केला जातो. तेल काढल्यानंतर उरलेली करंजाच्या पेंडीतील नत्राच्या उच्च प्रमाणामुळे तिचा खत म्हणून नेहमी वापर केला जातो. नत्राबरोबरच या पेंडीच्या खतातून शेतीला स्फुरद व पालाश ही द्रव्ये देखील मिळतात, शिवाय त्यातील विषद्रव्यांमुळे मातीतील किटक व बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षणही अपोआप होते.
करंजाच्या बियांपासून पिवळसर करड्या रंगाचे अखाद्य तेल मिळते. या तेलाचा वापर भिंतीला देण्याच्या रंगात, साबण व कीटकनाशके बनविण्यासाठी, कातडी कमाविण्यासाठी तसेच वंगण म्हणून करतात. हे तेल बायोडीझेल किंवा डीझेलला पर्याय म्हणूनही वापरले जाते. तेलाचा वापर खरूज, नायटे, पुरळ इ. त्वचारोग तसेच संधिवात, खोकला यांवर करतात. मुळे व बी मत्स्यविष आहेत. मुळांचा रस जखमा धुण्यासाठी करतात. पाने गुरांना चारा म्हणून वापरतात, तसेच जमिनीत गाडून चांगले खतही तयार होते. या खतामुळे शेतातील वाळवीचा उपद्रव कमी होतो. लाखेचे कीटक पोसण्यासाठी करंजाची लागवड करतात. भारतात इंधन तेल उपलब्ध व्हावे म्हणून जट्रोपा या वनस्पतीसह करंजाची वाढ केली जाते. भारत सरकारने अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या निर्मितीसाठी एक विशेष प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पांतर्गत सु. २ कोटी करंजांची रोपे देशात लावण्यात आलेली आहेत. लाकूड घरांची बांधकामे, तेलाचे घाणे, गाड्याची चाके, जळण इत्यादींसाठी उपयुक्त असते.

या झाडाचे सर्व भाग औषधी आहेत. मुळांचा रस जखमा धुण्यास, ताज्या सालीचा रस रक्ती मूळव्याधीवर पोटात घेण्यास व पानांचे पोटीस कृमियुक्त जखमांवर लावण्यास उपयुक्त असते;

बियांची पूड ज्वरनाश व अशक्तता नाहीशी करणारी, कफोत्सारक व माकड खोकल्यावर (डांग्या खोकल्यावर) गुणकारी; फुले अग्निमांद्यावर; बियांचे तेल (करंजेल) संधिवातावर, कातडीच्या रोगांवर (खरूज, नायटे, पुरळ इत्यादींवर), खोकल्यावर वगैरे उपयोगांत असून साबण बनविण्यास व दिव्यात जाळण्यासाठीही वापरतात.

मुळे व बी मत्स्यविष आहेत. पाने गुरांना खाऊ घालतात व जमिनीत गाडून खतही करतात. पेंडीच्या खतामुळे शेतातील वाळवीचा उपद्रव कमी होतो. हा वृक्ष शोभादायक असल्याने रस्त्यांच्या दुतर्फा व मोठ्या बागांत लावतात. सालीतील धागे काढून ते पिंजून बुरणूस बनवितात.
करंजाच्या बिया त्यातील तेलासाठी उपयुक्त आहे. विविध उद्योगधंद्यात व औषधात त्याचा उपयोग होतो. करंजाच्या बियांमध्ये अपचनकारक तत्त्वे असून त्यांचा विषारी परिणाम अन्नातून बियांचे चूर्ण किंवा पेंड दिल्यास प्राण्यांवर दिसून येतो. करंजाचे तेल कातडे कमाविण्यासाठी, वंगणासाठी व मेणबत्या बनविण्यासाठी वापरतात. या तेलाचा औषधी उपयोग आयुर्वेदात विशद केला आहे. करंज तेल पिवळट रंगाचे असून दीर्घकाल साठवणीनंतर ते अधिक गडद रंगाचे होते. तेलाचा उग्र गंध असून ते कडू असते.

करंजाच्या बियांपासून पिवळसर करड्या रंगाचे अखाद्य तेल मिळते. या तेलाचा वापर भिंतीला देण्याच्या रंगात, साबण व कीटकनाशके बनविण्यासाठी, कातडी कमाविण्यासाठी तसेच वंगण म्हणून करतात. हे तेल बायोडीझेल किंवा डीझेलला पर्याय म्हणूनही वापरले जाते. तेलाचा वापर खरूज, नायटे, पुरळ इ. त्वचारोग तसेच संधिवात, खोकला यांवर करतात. मुळे व बी मत्स्यविष आहेत. मुळांचा रस जखमा धुण्यासाठी करतात. पाने गुरांना चारा म्हणून वापरतात, तसेच जमिनीत गाडून चांगले खतही तयार होते. या खतामुळे शेतातील वाळवीचा उपद्रव कमी होतो. लाखेचे कीटक पोसण्यासाठी करंजाची लागवड करता

नायट्रोजनचे प्रमाण स्थिरीकरण:
हा वृक्ष जमिनीतील नत्राचे म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण स्थिरीकरण करीत असल्याने जमिनीचा कस वाढतो. चरणारी जनावरे साधारणपणे ह्याला तोंड लावीत नाहीत. ह्याला पाणबोदाड, खारपडीची अथवा अल्कधर्मी जमीनदेखील चालते. खराब हवामान तसेच मध्यम आणि भरपूर पावसाला देखील हा तोंड देऊ शकतो. कसण्यायोग्य जमिनीप्रमाणेच नापीक अथवा पडीक जमिनीवरदेखील ह्याची लागवड करता येते. करंजाच्या बियांमध्ये सुमारे 30-40% तेल असते. ह्याच्या मुळांचे दाट जाळे आडव्या दिशेत पसरत असल्याने जमिनीची धूप थांबवणे आणि वालुकामय जमीन धरून ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.
ह्याची मुळे, पाने, खोडाची साल आणि खोडातील गर ह्यांमध्ये औषधी गुण आहेत. धान्य साठवताना कीड दूर ठेवण्यासाठी करंजाची वाळलेली पाने वापरतात.

करंजाच्या तेलाचे गुणधर्म:
मुख्यतः बियांपासून मिळणारे हे तेल खाण्यासाठी मात्र वापरता येत नाही. बी मध्ये 95% गर असतो. तेलाचे प्रमाण सुमारे 27 – 40% असते. गरापासून तेल काढण्यासाठी यांत्रिक एक्स्पेलरचा वापर केल्यास सुमारे 24 – 26.5% तेल मिळते. ह्या कच्च्या तेलाचा रंग पिवळसर-केशरी किंवा तपकिरी असू शकतो. काढलेले तेल एका ठिकाणी न हलवता ठेवल्यास रंग जास्त गडद बनतो. हे कडू चवीचे अखाद्य तेल असून त्याला भयंकर वास येतो. हे तेल जैवइंधन म्हणून वापरतातच तसेच दिवाबत्तीसाठी, वंगण, रंगामधील बंधक (बाइंडर), कीटकनाशक, साबण-उद्योग आणि कातडी कमावण्याच्या कामातही त्याचा वापर होतो. माणसांना तसेच जनावरांना होणार्या त्वचारोगांवरील उपचारांमध्ये आणि संधिवातावर उपाय म्हणूदेखील हे तेल वापरतात. तेल काढल्यानंतर उरणाऱ्या चोथ्यामध्ये (ह्याला प्रेस-केक असे म्हणतात) नत्र भरपूर असते आणि त्यामुळे त्याचा वापर जमिनीचा कस वाढवण्यासाठी करता येतो. हा केक मातीत गाडल्यानंतर, त्याच्या कीटकनाशक गुणामुळे, नेमॅटोड म्हणजे सूत्रकृमी कीड आटोक्यात राहते.

करंज वृक्षाचे आणखी कांही उपयोग:
1.अपचन:
कारंजा अपचन व्यवस्थापित करण्यास मदत करते. आयुर्वेदानुसार, अपचन म्हणजे पचनाच्या अपूर्ण प्रक्रियेची अवस्था. अजीर्ण होण्याचे मुख्य कारण तीव्र कफ आहे ज्यामुळे अग्निमांड्या (कमकुवत पचनशक्ती) होतो. कारंजा त्याच्या उष्ण (गरम) सामर्थ्यामुळे अग्नी (पचनशक्ती) सुधारण्यास मदत करते आणि अन्न सहज पचते. 1/4-1/2 चमचे करंजा चूर्ण (पावडर) दिवसातून दोनदा जेवणानंतर 1/4-1/2 चमचे करंजा चूर्ण (पावडर) पाण्यासोबत सेवन केल्यास अपचन दूर होते.

2. भूक वाढण्यास:

करंज्याला रोजच्या आहाराचा भाग बनवल्यास भूक वाढण्यास मदत होते. आयुर्वेदात अग्निमांड्यामुळे (कमकुवत पचनशक्ती) भूक न लागणे होय. हे वात, पित्त आणि कफ दोषांच्या वाढीमुळे होते ज्यामुळे अन्नाचे अपूर्ण पचन होते. यामुळे पोटात गॅस्ट्रिक ज्यूसचा अपुरा स्राव होतो ज्यामुळे भूक कमी होते. करंजा पचनास उत्तेजित करतो आणि दीपन (भूक वाढवणारा) गुणधर्मामुळे भूक सुधारते.

3. संधिवातामद्धे:
आयुर्वेदानुसार, वातदोषाच्या वाढीमुळे ऑस्टियोआर्थरायटिस होतो आणि त्याला संधिवात म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वेदना, सूज आणि हालचाल करण्यात अडचण येते. कारंजामध्ये वात संतुलित करणारा गुणधर्म आहे आणि सांध्यातील वेदना आणि सूज यासारख्या ऑस्टियोआर्थरायटिसच्या लक्षणांपासून आराम मिळतो.

4. मूळव्याधीवर: करंज किंवा त्याचे तेल बाहेरून लावल्यास मोड व मोडाचा ढीग,  सूज आणि जळजळ नियंत्रित करण्यास मदत करते.     हे त्याच्या रोपन (उपचार) गुणधर्मामुळे.

5. करंजाच्या पाने: पानांची पेस्ट करून पोल्टिस (कापडाच्या तुकड्यात गुंडाळून, गरम करून त्वचेवर ठेवलेले पदार्थ) बनवा. वेदना आणि सूज पासून आराम मिळविण्यासाठी पुन्हा करा.

करंज- रासायनिक घटक:
करंज तेलामद्धे मुख्यत्वे चार फॅटी ऍसिड असतात. ती म्हणजे पामिटिक ऍसिड, ओलिक ऍसिड, लिनोलिनीक ऍसिड, व बेहेनिक ऍसिड.
करंज तेलात ४३% ड्राय मॅटर, १८ % नैसर्गिक प्रथिन, ६२% फायबर असते.
याशिवाय अल्कलॉइड्स, फ्लॅव्होनॉइड्स, लयकॉसिडेंसी, कार्बोहैड्रेट्स, स्टिरॉइड्स वगैरे असतात.

करंज वापरताना घ्यावयाची खबरदारी:

तज्ञांकडून सल्ला-
आयुर्वेदिक दृष्टिकोन करंजाचे तेल सामर्थ्याने गरम असल्याने आम्लपित्त आणि इतर जठरासंबंधी समस्या असल्यास कमी प्रमाणात वापरा.
स्तनपान स्तनपान देण्यापूर्वी करंज घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गर्भधारणा व गर्भधारणेदरम्यान करंज घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

करंजाच्या बियांचे तेल आणि नेहमीच्या पेट्रोल/डिझेलची तुलना:
• जैवइंधन म्हणून पाहिल्यास करंजाच्या तेलाचे बरेचसे गुणधर्म डिझेलप्रमाणेच आहेत.
डिझेलपेक्षा करंजाचे तेल अधिक स्वच्छ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले (इको-फ्रेंडली) आहे.
डिझेलपेक्षा करंजाचे तेल अधिक स्वच्छ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले (इको-फ्रेंडली) आहे. डिझेलपेक्षा करंजाचे तेल अधिक स्वच्छ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले (इको-फ्रेंडली) आहे.

राष्टीय रासायनिक प्रयोग शाळा पूणे येथील उतिसंवर्धन विभागात करंज या वृक्षावर संशोधन झाले आहे.
तर असा हा पांथस्थांना विसावा देणारा डेरेदार व वृक्षाचे सर्व भाग औषधी असलेला सदाहरित करंज वृक्ष.

संदर्भ:
१. गुगल वरील अनेक लेख
२. या विषयावरील प्रकाशित पुस्तके.
३. सर्व फोटो गुगल वरून साभार

डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
तारीख: २७/०४/२०२४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 72 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

3 Comments on महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ४ – पांथस्थांना विसावा देणारा करंज वृक्ष

  1. या वेळी जरा विस्तृत लेख आहे. अतिशय बारीक बारीक तपशील पण मांडला आहे. माहितीपूर्ण लेख.
    धन्यवाद.

  2. या वनस्पती खूप उपयोगी आहेत. माहिती ही संग्राह्य आहे. या मोलाच्या वनस्पतींची माहिती सगळ्यांना झाली पाहिजे ते काम हा लेख वाचून होते. कॅनॉल च्या शेजारून ह्या गर्द वनस्पती दिसतात. याच्या शेंगा ह्या खेडेगावात व्यापारी आठवडे बाजारात विकत घेतात. खूप ठिकाणी ह्या शेंगा गोळा करून त्या विकतात.मीठ मिरची साठी ह्याची विक्री पुरेशी होते. देखभाल खर्च काही नाही. तसेच लेखात म्हटल्याप्रमाणे प्रवाशांना विश्रांती देणारे,उत्पन्न देणारे समृद्ध झाड.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..