नवीन लेखन...

लोकल

पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो.


लोकलची वाट पाहत उभा होतो. उशीर होता, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर तुडुंब गदी साकळली होती. सकाहच्या वेळी जर लोकलला दोन मिनिटं उशीर झाला तर पाचशे नवीन उतारुंची त्यात भर पडते, इतर वेळा शंभर माणसांची भर पडते, असा माझा प्रवासी मित्राचा अभ्यास आहे. कोणती गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवरुन सुटते, कोणत्या गाडीच्या पहिल्या डब्यात जागा असते, कोणत्या गाडीत मधले डबे जरा कमी गर्दीचे असतात, याबाबतची त्याची माहिती आणि अंदाज अचूक असतात. लोकलमधून प्रवास करताना तासभर बसलेले प्रवासी काय काय करतात, उभे असलेले प्रवासी कसा वेळ घालवतात याची पाहणी त्याने केली आहे. त्यात पत्ते खेळण, पेपर वाचणं, शब्दकोडी सोडवणं, गप्पा मारणं, वॉकमन कानाला लावून गाणी ऐकणं, खिडकीच्या बाहेर पाहत बसणं, समोरच्या माणसाकडे पाहत बसणं, दात कोरण(तासभर), न फिरणाऱ्या पंख्याकडे बघत तासभर विचार करीत राणं, अंधुक उजेडात खिशातील कॅलक्युलेटर वापरुन आकडेमोड करणं, भाव-कॉपी वाचून उलट-सुलट खुणा करणं, वारा खात दारात उभं राहणं, व्हिडीओ कोचात उभं राहणं (लेडीस फर्स्टक्लासला लागू असलेल्या पहिल्या वर्गाला मित्राने दिलेलं नाव) शेजारच्या प्रवाशाला वैताग येईल इतक्या वेळा सतत चुळबुळ करीत राहणं, शेजारी बसलेल्यालासुध्दा ऐकू येणार नाही अशा पध्दतीने गाण म्हणणं-अशा असंख्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. त्याची त्याने पध्दतीरपणे नोंद केलेली आहे. एक शंभरपानी वही पूर्ण भरेल इतक्या नाेंदी त्याच्याकडे तयार आहेत.
महिलांच्या डब्यातील नोकरदार महिला आपला वेळ कसा घालवतात, काय करतात, त्याची त्याच्याप्रमाणे इतरांनाही उत्सुकता असणं साहजिकच आहे. त्यासाठी त्याने आपल्या पत्नीला पाहणी करण्यास सुचवल आहे. त्या कितपत मनावर घेतात यावर अवलंबून आहे.
लोकलमध्ये बसल्या बसल्या लोक कसा वेळ घालवतात, याबरोबच डब्यातील छोटया-मोठया जाहिरातीनी त्याच लक्ष वेधून घेतल आहे. तर रीतसर रेल्वे अधिका-यांची परानगी घेऊन लावलेल्या जाहिरातींबरोबरच कोणतीही परवानगी न घेता लावलेल्या जाहिरातींकडे, प्रचार मजकुराकडे त्याच जास्त लक्ष आहे. या अनधिकृत जाहिरातीत केवळ कंपन्यांच्या मालाची जाहिरात केलेली नसते, तर अनेक मनोरंजन माहिती मिळते. कोणती सेवा कुठे मिळते, त्याचा टेलिफोन नंबर दिलेला असतो. लहानसहान कामगार संघटनांच्या घोषणा असतात, बंदची धमकी असते, बंद यशस्वी झाल्याचा आनंद असतो, प्रवास करताना काय काळजी घ्यायची ते सांगून प्रवासात हीच बॅग वापरा असा संदेश असतो. या सगळयाची एक जंत्रीच मित्राने तयार केली आहे. ‘तुम्हाला काहीही खरेदी करायचं असेल, आम्हाला संपर्क साधा. फोन नंबर…’ अशी वीतभर आकाराची जाहिरात बसलेल्या माणसाचं लक्ष जाईल आणि तेही सहजरीत्या, अशा ठिकाणी चिकटवलेली असते. सर्व धर्म समभाव- रामजन्मभूमी-बाबरी मशीद. याबाबतची छोटेखनी पत्रकं असतात. चटकन चिकटवता येतील, अशी स्टीकर्स चिकटवली जातात. अत्यंत प्रक्षोभक प्रश्नाची एक मालिकाच कित्येक दिवस रेल्वेच्या डब्यात भेटत होती. कोण लावत होत ही प्रशनमालिका. वाचणारा अस्वस्थ होत होता. पण रेल्वेयंत्रणा किंवा पोलिसांना त्याचं काहीच नसावं. कुठे काही परिषद, वार्षिक सभा असली की ती केव्हा आणि कुठे आहे ते डब्यात बसल्या बसल्या समजतं. गॅट आणि डंककलला विरोध का करायचा, याची कारण उभ्या उभ्या आपल्याला कळतात. कासव छापच्या जाहिराती सतत बदलत असतात. नवीन नवीन कल्पना घेऊन.
लोकल आलीच नाही. गर्दी वाढतच रहिली. काही माहिती नाही. लोकल का उशिरा येत आहेत, किती वेळ लागेल, त्याबरोबर पोहोचत आहेत की नाहीत,याची माहिती पुरविण्याची जबाबदारी रेल्वेवर नाही. स्पीकरवर बाहेरगावारुन येणाऱ्या गाडया कशा वेळेवर येत आहेत याचीच माहिती केंद्रिय कक्षातून देण्यात येत होती. लोकलची वाट पाहत उभ्या असणसऱ्या माणसाला बाहेरगावावरुन येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडयांच्या वेळापत्रकात फारस रस नसणारच. पण नको ती माहिती गळी उरवण्याचा केंद्रिय कक्षाचा उपक्रम चालूच होता. तो मध्येच थांबला. एक महत्वाची सूचना- कमला सिन्हा यांचे पती कुठे असतील त्यांनी तिथून त्यानी दादर रेल्वे मास्तरच्या ऑफिसात यावं. त्यांच्या पत्नी तिथे त्यांची पाटत पाहत आहेत.
म्हणजेच बाहेरगावावरुन आलेल्या पती-पत्नीची ताटातूट गर्दीत झालेली दिसते. पण बाहेरगावावरुन येणाऱ्या कुणालाही मुंबईतील लोकलचा प्रवास म्हणजे ‘भयंकर दिव्य’च वाटत असणार.
भरभरुन येणाऱ्या लोकलगाडया येतात कुठून, जातात कुठे, कुठल्या स्टेशनवर थांबतात, थांबत नाहीत, प्लॅटफॉर्म कुठल्या बाजूला येतो. कुठल्या स्टेशननंतर कुठल स्टेशन येतं., काहीच माहिती नसते. प्लॅटफॉर्मवरची गर्दी पाहून तर नवख्या माणसाची छाती दडपून जाते. जीव मुठीत धरुन तो डब्यात कसाबसा शिरतो. पण बाहेर पडताना आणखी हाल होतात. मध्येच उभा असेल तर भलत्याच कुठल्यातरी स्टेशनवर गर्दीच्या रेटयात फेकला जातो. परत दुसऱ्या गाडीत बसण्याचं धास होत नाही. सोबत लहानमुलं, म्हातारी माणसं, बायाबापडया असल्या तर हाल विचारायलाच नको.
पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग. इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरासारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा, आपल्याला तर गुदमल्यासारखं होत. परगावाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजीची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजच करीत राहतो. डब्यातल्या जाहिराती वाचत, पत्ते खेळत, गप्पा मारत, भजन करीत, गाणी म्हणजे तास-दोन तासांचा कोंडवाडा सहन करीत जातो.
—————————————————————————

— प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : 5 मे 1994

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..