नवीन लेखन...

LGBTQI : सुप्रीम कोर्ट झिंदाबाद !

अखेर तो सुप्रीम कोर्टाचा मच्-अवेटेड् निकाल जाहीर झाला , की, ‘समलेंगिकता हा गुन्हा नव्हे’ .
( संदर्भ: बातम्या , लोकसत्ता दि. ७ सप्टे. २०१८ . टाइम्स ऑफ् इंडिया ७ सप्टें. २०१८, आणि इतर). आपण अनेकदा बोलतांना-लिहितांना, ‘दि कोर्ट इन इट्स् विज़डम्’ असा शब्दप्रयोग करतो, तो किती यथार्थ आहे, याची पुनश्च एकवार जाणीव झाली.

• प्रस्तुतचा लेख लिहितांना, LGBTQI या विषयावर मी जानेवारी २०१८ ला एक लेख , जो याच
वेब-पोर्टल वर ( मराठी सृष्टी) लिहिला होता, त्याचा मी आधार घेतो. जिज्ञासूंनी त्या मूळ लेखाला पुनर्भेट भेट द्यावी, ही विनंती. मी तूर्तास त्यातील एकदोन महत्वाच्या मुद्दयांना स्पर्श करणार आहे.

१. यापूर्वी, मी , ’जगातील ६८ टक्के’ माणसांबद्दल मराठी व इंग्रजीत लेख लिहिले होते. ते लेख ‘Mentally / Physically Challenged Persons’ , या विषयाशी संबंधित होते . मात्र तो मूळ मुद्दा इथेंही तितकाच लागू पडतो. दोन तृतियांश लोकांच्या ज्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स् आहेत, त्यांना ‘नॉर्मल्’ म्हटलें जातें, आणि जो कोणी त्यापासून भिन्न असेल, त्याला ‘नॉट्-नॉर्मल’ , ‘अॅबनॉर्मल्’ असें संबोधलें जातें. (हा मुद्दा मांडतांना मी संख्याशास्त्राचा —- ‘स्टॅटिस्टिक्स’चा ‘आधार घेतलेला आहे). कोणी जितका ‘नॉर्म’ पासून दूर, तितका तो अधिक ‘अॅबनॉर्मल्’, असें मानलें जातें.
अगदी उदाहरणच द्यायचें झालें, तर, LGBTAQI या ‘टऽर्म’मधील ‘क्वीयर’ हा शब्द पहा. अधिक स्पष्टीकरणाची गरज नाहीं.
#आत्तांची टिप्पणी –
या निकालानंतर, एक महत्वाची संस्था म्हणत आहे की, ‘आम्ही समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांना गुन्हेगार मानत नाहीं, पण समलैंगिकता ही संस्कृती व निसर्गनियम यांच्याविरुद्ध आहे’.
त्यावर, माझें म्हणणें हें , की –
*‘गुन्हेगार मानत नाहीं’, ही योग्य गोष्टच आहे .
*संस्कृतीबद्दल, मी मागच्या लेखात लिहिलेला, मुद्दा पुढील परिच्छेदात पुन्हां मांडत आहे. *राहिला प्रश्न ‘निसर्गनियमा’चा. त्यासाठी, वर उल्लेखलेलें संख्याशास्त्रीय विश्लेषण पहावें.
२. दुसरी गोष्ट ही की, समाजमान्यत्व-प्राप्त-असलेल्या-प्रथा, या, भूगोल, संस्कृती आणि काळ या सर्वांशी संबंधित आहेत. एका भूभागात मान्य असलेल्या प्रथा ( उदा. जेवणानंतर ढेकर देणें) या दुसर्‍या भूभागात मान्यताप्राप्त असतील असें नाहीं ; एक संस्कृतीला, एका कम्युनिटीला, मान्य असललेल्या प्रथा दुसर्‍या संस्कृतीला, दुसर्‍या कम्युनिटीला, मान्य असतील असें नाहीं ; एका काळात समाजमान्य नसलेल्या प्रथा दुसर्‍या काळात समाजमान्यत्व प्राप्त करूं शकतात ( आणि व्हाइसे व्हर्सा ).
आत्तांची टिप्पणी – आपण येथें सेक्शुअल संबधांची चर्चा करत आहोत, ( हिंदीत – ‘यौनसंबंध’ . मराठीत समर्पक प्रतिशब्द मला तरी अजून माहीत नाहीं), म्हणून दोन उदाहरणें देतो .
(अ) मध्ययुगीन तुर्कांमध्ये, पुरुषांनी, तरुण — अर्ली टीनएजर्स — गुलाम मुलांशी , स्वत:च्या मौजेखातर सेक्शुअल संबंध ठेवण्याची प्रथा होती. अर्थातच, त्या पुरुषांना अनेक बायकाही असत. म्हणजेच, ते बाय्-सेक्शुअल होते. त्या काळात, त्या संस्कृतीत, असें गुलामांशी संबंध ठेवणे, आणि बाय्-सेक्शुअल असणें , या दोन्ही गोष्टी ‘नॉर्मल’ समजल्या जात.
(ब) पुरातन रोमन संस्कृतीचेंही असेंच आहे. तेथेंही, पुरुष, खास करून मोठे सरदारदरकदार , फॉर दि सेऽक ऑफ् प्लेझर, तरुण गुलांम मुलांशी सेक्शुअल संबंध ठेवत. त्यांनाही बायका होत्या. म्हणजे, तेही बाय्-सेक्शुअल प्लेझर उपभोगत. एवढेंच नव्हे, तर, तत्कालीन रोमन संस्कृतीत ‘सेक्शुअल ऑर्जीज् (orgies) ही सुद्धां एक कॉमन बाब होती. तत्कालीन समाजात या गोष्टींना मान्यता होती.
म्हणून, आपण, कालसापेक्षता व संस्कृतीभिन्नता, या गोष्टी नजरेआड करून चालणार नाहीं. आजच्या जमान्यात, जुन्या क्रायटेरिया वापरणें अमान्य असायला हवें.

• दोन महत्वाचे मुद्दे :
#याव्यतिरिक्त, यासंदर्भात, सुप्रीम कोर्टानें, ‘फंडामेंटल् राइट् टू इक्वॅलिटी’, ‘राइट् टु फ्रीडम ऑफ् एक्स्प्रेशन’, ‘राइट् टु चॉइस्’, ‘राइट् टु डिग्निटी’, अशा मूलभूत मुद्द्यांचा ऊहापोह केला व निकालसमयीं संदर्भ दिला, ही गोष्ट फाऽर चांगली झाली. आतां तरी लोक, LGBTQI जनांना ‘हाउंड्’ करणार नाहींत, असें मानायला जागा आहे.
#या फंडामेंटल राइटस् च्या उल्लेखाचा आणखी एक सुपरिणाम होईल काय ? आज जाती-जमाती-गट यांच्यामुळे, व्यक्तिस्वातंत्र्य व फ्रीडम ऑफ् एक्स्प्रेशन , यांना एकप्रकारें धोका निर्माण झालेला आहे. कोणी कांहीं विचार मांडले, किंवा कथन केलें, तर, त्याचा प्रतिवाद विचारांनी करण्यांऐवजी, भावनाउद्रेक होऊन, झुंडशाही-ठोकशाही सुरूं होते ; ‘बेस्ट् एनिमी इज् ए डेड् एनिमी’ या प्रकारच्या विचारांना अयोग्य ( इनअॅप्रोप्रिएट) ठिकाणीं थारा दिला जातो. ‘हें सर्व आतां थांबेल’ अशी भाबडी आशा करण्यांतलें वैयर्थ कुणालाही दिसतेंच ; पण, किमान, तशी प्रवृत्ती बरीच कमी होईल, अशी आशा करायला हरकत नाहीं .

– – –
सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M- 9869002126, 9029055603.
eMail : vistainfin@yahoo.co.in

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..