नवीन लेखन...

चला भाकरीकडे वळा

मी गहू खायचा बंद केला आणि माझं वजन ३० पौंडांनी कमी झाले

तुम्हाला माहितीय का की गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. खरं तर, स्निकर्सच्या एका बार मुळे रक्तातली साखर जेवढी वाढेल त्यापेक्षा जास्त गव्हाच्या ब्रेडच्या दोन स्लाईसेस मुळे वाढते. त्यामुळे जेव्हा लोकांनी गहू खाणं बंद केलं तेव्हा त्यांचं वजन, विशेषतः पोटावरून, खूप मोठ्या प्रमाणात घटलं यात काही नवल नाही. गहू सोडल्यानंतर पहिल्या महिन्यात लोकांचा जाडेपणा खूप इंचांनी कमी होऊ शकतो.

इथून निवडले आहे: दिमाग क्लिनिक

एका प्रसिद्ध कार्डिआॅलजिस्ट ने हे समजावून सांगितलं आहे की, आहारातून गहू काढून टाकल्यामुळे तुमचं आरोग्य “सुधारू” शकतं.

कार्डिआॅलजिस्ट विल्यम डेव्हिस, एमडी, यांनी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीद्वारे बिघडलेली हृदयं दुरुस्त करण्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली.

“मी त्याचंच प्रशिक्षण घेतलं होतं आणि सुरुवातीला मला तेच करायचं होतं,” ते सांगतात. पण हृदयविकारासंबंधी उत्कृष्ट सेवा पुरवूनदेखील जेव्हा त्यांच्या आईचा १९९५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तेव्हा साहजिकच त्यांना स्वतःच्या व्यवसायाबद्दल वारंवार चिंता वाटू लागली.

“मी रुग्णाचं हृदय दुरुस्त करायचो, पण तो रुग्ण पुन्हा त्याच समस्या घेऊन माझ्याकडे परत यायचा. माझे उपचार एखाद्या बँड-एड सारखे होते, त्यात आजाराचं ‘कारण’ शोधून काढण्याचा काही प्रयत्न नसायचा.”

म्हणून मग त्यांनी आपल्या प्रॅक्टिसचा रोख एका खूपच अज्ञात वैद्यकीय प्रांताकडे – प्रतिबंधाकडे – वळवला आणि पुढची १५ वर्ष त्यांच्या रुग्णांच्या हृदयविकाराची कारणं तपासण्यात घालवली.

त्यातून जे काही शोध लागले ते त्यांच्या न्यूयॉर्क टाईम्स बेस्ट-सेलिंग “व्हीट बेली” ह्या पुस्तकात उघड केले आहेत. आपल्या बऱ्याच शारीरिक समस्या, हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा ह्या आपल्या गहू खाण्यामुळे उद्भवतात असं ह्या पुस्तकात म्हटलं आहे.

आहारातून गहू काढून टाकल्यामुळे “आपलं आयुष्य बदलू शकतं.”

“व्हीट बेली” काय आहे?

गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. खरं तर स्निकर्सच्या एका बार मुळे रक्तातली साखर जेवढी वाढेल, त्यापेक्षा जास्त गव्हाच्या ब्रेडच्या दोन स्लाईसेस मुळे वाढते.

“जेव्हा माझ्या रुग्णांनी गहू खाणं बंद केलं, तेव्हा त्यांचं वजन, विशेषतः पोटावरून, खूप मोठ्या प्रमाणात घटलं. गहू सोडल्यानंतर पहिल्या महिन्यात लोकांचा जाडेपणा खूप इंचांनी कमी होऊ शकतो.”

गहू आणि बऱ्याचशा इतर आरोग्यविषयक समस्यांचा संबंध लागू लागतो

माझ्या रुग्णांपैकी ऐंशी टक्के रुग्णांना मधुमेह किंवा मधुमेहापूर्वीची स्थिती होती. मला माहिती होतं की, इतर कशाहीपेक्षा गव्हामुळे रक्तातली साखर खूप जास्त वाढते, म्हणून मग मी म्हणालो, “आपण तुमच्या आहारातून गहू काढून टाकूया आणि त्याचा तुमच्या रक्तातल्या साखरेवर काय परिणाम होतो ते पाहूया.” ३ ते ६ महिन्यांनंतर ते माझ्याकडे परत येत, आणि तेव्हा त्यांच्या रक्तातली साखर खूपच कमी झालेली असे.

पण त्यांच्या ह्या इतर प्रतिक्रिया सुद्धा असत:

“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन ३८ पौंडांनी कमी झालं.” किंवा, “माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स फेकून दिले.”

किंवा “गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.” “माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”

“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” आणि अजून काही, आणि अजून काही”.

जर गहू कशापासून बनलेला आहे हे बघितलं, तर त्यात अॅमलोपेक्टिन ए चा समावेश होतो, जे केमिकल फक्त गव्हातच आढळून येतं, आणि जे रक्तातल्या लहान एलडीएल पार्टिकल्सचं प्रमाण खूप वाढवतं – जे की हृदयविकाराचं सर्वात मुख्य कारण आहे.

जेव्हा आहारातून गहू काढून टाकला जातो, तेव्हा ह्या लहान एलडीएल ची पातळी ८० ते ९० टक्क्यांनी खाली येते.

गव्हामध्ये खूप जास्त प्रमाणात ग्लायडिन असतं, जे एक भूक वाढवणारं प्रथिन आहे. गहू खाल्ल्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीचा कॅलरी इन्टेक दिवसाला ४०० कॅलरीजने वाढतो.

ग्लायडिनचे अफू सारखे गुणधर्म देखील असतात ज्यामुळे त्याचं “व्यसन” लागू शकतं. अन्नविषयक शास्त्रज्ञांना हे जवळजवळ २० वर्षांपासून माहीत आहे.

गहू-मुक्त आहार करणं हे ग्लूटन-मुक्त आहार करण्यासारखंच आहे का?

ग्लूटन हा गव्हाचा फक्त एक घटक आहे.

गव्हातून ग्लूटन काढून टाकलं तरी गहू तितकाच वाईट असेल कारण त्यात अजूनही ग्लायडिन आणि अॅमलोपेक्टिन ए, तसंच इतर अनेक अनुचित घटक असतील.

ग्लूटन-मुक्त उत्पादनं ४ प्राथमिक घटकांपासून बनलेली असतात: कॉर्न स्टार्च, राईस स्टार्च, टॅपिओका स्टार्च किंवा पोटॅटो स्टार्च. आणि हे ४ सुकवलेले, पावडरच्या स्वरूपातले स्टार्च असे पदार्थ आहेत जे रक्तातली साखर अजूनच जास्त वाढवतात.

मी लोकांना अस्सल अन्नाकडे परतण्यास प्रोत्साहित करतो:

फळं

भाज्या

कठीण कवचाची फळं आणि बिया, अनपाश्चराईज्ड चीज

अंडी आणि मांस

हायब्रिडायजेशन सारख्या उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक तंत्रांमुळे ७० आणि ८० च्या दशकात गव्हाचं स्वरूप खरोखर बदललं. गव्हाचा दाणा अधिक छोटा आणि अधिक पुष्ट झाला आणि त्यात ग्लायडिनचे प्रमाण वाढले (जो एक प्रभावी असा भूक वाढवणारा घटक आहे)

आज आपण जो गहू खातो तो १०० वर्षांपूर्वी खाल्ल्या जाणाऱ्या गव्हासारखा नाहीये.

तुम्ही दररोज ब्रेड/ पास्ता/ चपात्या खायचं बंद केलंत, आणि चिकन आणि भाज्यांसोबत भात खाऊ लागलात, तरीसुद्धा तुमचं वजन कमी होईल कारण तांदूळ रक्तातली साखर गव्हाइतकी वाढवत नाही, आणि त्यात अॅमलोपेक्टिन ए आणि ग्लायडिन सारखे भूक वाढवणारे घटक नसतात. गव्हामुळे जशी कॅलरी इन्टेक मध्ये वाढ होते तशी तांदळामुळे होणार नाही.

काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. प्रत्येकाने गहू खाणं थांबवलं पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे जी, मला पक्कं माहीत आहे की तुमचं आयुष्य बदलून टाकेल.

Translated by Anyokti Wadekar

— आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवरुन

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..