नवीन लेखन...

हसणे

हसणं हे नेहमीच संसर्गजन्य असतं.. दुःखाचं असं नाही ते एकट्याचं असतं… ते शेअर करावं लागतं..

म्हणूनच अनादी कालापासून दुःखापेक्षा हसणं श्रेष्ठ आहे…

काल घडलेल्या एका प्रसंगातून हे सत्य अजूनच मनावर कोरलं गेलं..

रात्रीच्या सीएस‘एम’टी वरुन सुटलेल्या एका लोकलमध्ये कळकट्ट कपड्यातली रस्त्यावर वगैरे राहणारी मनोरुग्ण बाई बसली होती.. वास्तविक पाहता ती तिच्या विश्वात होती..एकटीच बडबडत होती…पण दुसऱ्याच्या सुखात नाक खुपसण्याची भारतीय वृत्ती आसपासच्या प्रवाशांना स्वस्थ बसू देत नव्हती… कोण तिची टर खेचत होते तर कोणी तिच्या वेड्या चाळ्यांवर हसत होते..सगळ्यांनाच तिच्याबद्दल उत्सुकता होती…कोणी तिला “किधर उतरना है”, “घर किधर है” वगैरे प्रश्न विचारत होते.. एका काका काकूंनी तिला बिस्कीट वगैरे दिलं खायला… तिने ते अर्धवट खाल्लंसुद्धा.. पण लोकांना तिच्याबद्दल वाटणाऱ्या औत्सुक्याची तिला जरासुद्धा पर्वा नव्हती… हिंदी मराठी मिश्रित भाषेत ती फक्त बडबडत होती.. १० रुपयाला ५ चिकू विकणारे एक काका आले लोकांनी तिला खाणार का? विचारले असता ती नको म्हणाली … असंच सगळं चालू असताना अचानक ती समोरच्या सीट वर बसून काहितरी हातवारे करुन चर्चा करणाऱ्या दोघांकडे बघून..हसली.. तिला हसलेलं बघून एकजण हसला…त्याने त्या दोघांना ती तुम्हाला हसतेय असं सांगितलं मग ते दोघंही हसायला लागले … मग अजून दोघं..अजून तिघं असं करत करत अर्ध्यापेक्षा जास्त डबा हसू लागला..नंतर ती अजून मोठ्याने  हसू लागली .. हा ऐन रात्रीचा लाफ्टर क्लब असाच ३-४ मिनीटं चालू होता.. ती जर सुञ असती तर शहाणं कोण वेडं कोण ह्यातील फरक तिलाही कळला नसता.. असे सगळे हसंत होते फक्त ती एकदा हसली म्हणून.. मग त्या मागची भावना काहीही असो..

एकूण काय Smile is Contagious मग ते शहाण्याचं असो वा वेड्याचं, गरीबाचं असो वा धनाढ्याचं…

— विनिमय ©

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..