नवीन लेखन...

“कुष्माण्डा” – मा दुर्गेचे चवथे रूप!

“ सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च |
दधाना हस्तपद्माभ्यां कुष्माण्डा शुभदस्तुमे ||”

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची जी आराधना केली जाते, त्यातील चवथे स्वरूप म्हणजे “कुष्माण्डा” होय. कूष्मा आणि अण्ड अश्या दोन शब्दांनी कुष्मांडा शब्द तयार झाला आहे. कूष्मा म्हणजे कुत्सित, संताप, अत्यंत ताप देणारा उष्मा जो तापत्रय आहे. असा संसार जीच्या अण्डात म्हणजे उदरात मांसपेशीच्या स्वरुपात आहे, त्रिविधतापत्रयाने युक्त संसार भक्षण करणारी. कुष्मांड म्हणजे कोहळा, देवीला कोहळा आवडते म्हणून नवचंडी पूजेत वैगरे होमहवनात कुष्मांड अर्पण करतात. आपल्या मंद आणि सुहास्य वदनाने अण्ड अर्थात ब्रम्हांडास उत्पन्न केल्यामुळे या देवीस कुष्मांडा या नावाने ओळखले जाते. ज्यावेळी सृष्टीचे अस्तित्व नव्हते सगळीकडे अंधकार पसरला होता, अशा वेळी देवीने ‘इषत’ हास्याने ब्रम्हांडाची रचना केली. या सृष्टीची आदिशक्ती, आदिस्वरूप, आदिमाया होय. देवीचे वाहन सिंह आहे, देवीला आठ करकमल असल्याने ती अष्टभुजा म्हणून प्रसिध्द आहे, कमंडलू, धनुष्यबाण, कमळपुष्प, अमृतकलश, चक्र, गदा, आणि जपमाळ देवीच्या सात हातात आहेत. तसेच आठव्या हातात सिद्धी आणि निधी आहेत. या दिवशी योगी साधक “अनाहत चक्रावर” ध्यान केंद्रित करून साधना करतात. देवीच्या कृपेने भय, शोक, कष्ट, रोग बरे होतात. देवी सूर्यलोकांत निवास करणारी असल्याने, तेजस्वी, सहनशील व सर्वशक्तिमान आहे. देवीची कांती सूर्यासारखी दैदिप्यमान असून, अन्य कोणाचीही तुलना देवीशी करता येत नाही. ब्रम्हांडातील सर्व वस्तू व प्राणिमात्रांत असलेले तेज या देवीची छाया आहे. हृदयात दया आणि युद्धात कठोरता असलेली देवी, शत्रूं ा भयभीत करणारी आहे.

कुष्मांडा स्तोत्रपाठ

“ दुर्गतिनाशिनी त्वंहि दरिद्रादि विनाशनीम् ।
जयंदा धनदा कूष्माण्डे प्रणमाम्यहम् ॥
जगतमाता जगतकत्री जगदाधार रूपणीम् ।
चराचरेश्वरी कूष्माण्डे प्रणमाम्यहम् ॥
त्रैलोक्यसुन्दरी त्वंहिदुःख शोक निवारिणीम् ।
परमानन्दमयी, कूष्माण्डे प्रणमाभ्यहम् ॥”

 

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..