नवीन लेखन...

कवी आणि कविता

कविता कशी करतात माहित नाही. पण कविता वाचताना एक अनोखा आनंद होतो. किमान मला तरी होतो. आणि आणखीन एक विचार मनात चमकून जातो.आपण का नाही करू शकत अश्या कविता? यातला प्रत्येक शब्द परिचित आहे ,त्यांचा अर्थ आपण जाणतो .मग मी का नाही करुशकत कविता? सराव नाही म्हणून? सरावाने जमेल?

नाही. हि बाब सरावसिद्ध नसावी.एका टी.व्हि. कार्यक्रमात (बहुदा आयुष्या वर बोलू काही ) संदीप खरेनी एक किस्सा सांगितला होतो. एकदा बरेच दिवस त्यांना कविता जमेना. मग त्यांनी काही काळ वाट पहिली. अचानक एके रात्री “ती” आली. तब्बल बावीस कविता त्या एका रात्री खरेनी केल्या! कवितेची अशीच वेळी, अवेळी ‘भरती’ येत असावी. जर ‘कविता’ सराव सिद्ध असती तर त्यांना वाट पहावी लागली नसती.
आपल्या अंतर्मनात अनेक गोष्टीनची, घटनाची व त्यांचा आपण लावलेल्या अर्थाची नोंद असते.बहुदा कविता तेथूनच जन्म घेते. आपण काय आणि कसे पाहतो याचा तो परिपाक असतो.हे अंतर्मन आपण रात्री झोपेत असताना मनाच्या पृष्ठभागावर येते.स्वप्न रूपाने गमती दाखवते. एका कवीला स्वप्नात , शंभर ओळींची कविता तिच्या शिर्षका सहित दिसली ! आणि त्यांनी मग सकाळी उठल्यावर लिहिली.
रात्र आणि कविता यांचा घनिष्ठ संबंध असावा. आम्हाला ( अहो म्हणजे मलाच ) कविता सुचते  ,पण भर दुपारी, रामजन्मा सारखी! म्हणूनच ‘ तिच्या ‘ नशिबी वनवास असावा. अजून अप्रकाशितच! असो .
“का हो तुम्ही कविता कश्या करता?” मी एका जाणत्याला (माझ्या ओळखीचा कवी ) विचारले. तो म्हणाला ते खरे असावे. तो म्हणाला कविता कधीच ‘करता’ येत नाही! ती अपोआप होते.! ती हलकेच तरंगत मनात येते .मनात ‘ती ‘ फक्त  एक कल्पनेची कळी असते .एक अश्ब्द  आल्हाद! एक मस्त ,निखळ,मुक्त, आनंद ! तर कधी राग,क्रोध ,अन्यायाची चीड ,संताप, भेदभावाची खदखद !पण सार अशब्द.कवी त्या ‘काळी ‘ला फुलवतो.त्या ‘अश्ब्देला’ अक्षरांचे कोंदण करतो. आणि मग ती ‘अक्षरा ‘ कागदावर अवतरते ! रसिकांना भुरळ पडण्यासाठी! अंतर्मुख करण्यासाठी! कविता म्हणून !
मला वाटते ‘तिला ‘ अशीच येऊ द्यावी. अट्टाहासाने यमकांच्या बंधनात बंदी करण्याचा प्रयत्न करू नये. ज्या प्रवाहीपणे ती मनात घालमेल घालते त्याच प्रवाहीपणे तिला प्रसवू द्यावे.
साध्या-साध्या घटना कवी मन कसे टिपते हे पाहण्या सारखे आहे.पावसाळ्यात वीज चमकते. कधी कधी ती एखाद्या झाडावर पडते. झाड पेट घेत. आपण सर्वानीच कधीतरी हे बघितलेले आहे.’झाडावर पडणारी वीज ‘या घटनेवर एका मान्यवर कवीची कविता पाहू.

मौन 

शिणलेल्या  झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली ,गाण गाऊ का?
झाड बोलल नाही
कोकिळा उडून गेली .
शिणलेल्या झाडा पाशी
सुगरण आली
म्हणाली,घरट बांधू का?
झाड बोलल नाही
सुगरण निघून गेली
शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली,जाळीत लपू का?
झाड बोलल नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली
शिणलेल्या  झाडापाशी
बिजली आली
म्हणाली,मिठीत घेऊ का?
झाडच मौन सुटल
अंगाअंगातून
होकारच तुफान उठल.
हि कविता आहे कुसुमाग्रजांची .——
एकंदर कविता हि सर्वांनाच वश होत नाही हेच खरे.पोकळ शब्दांच्या बांबूची बासरी करणे काविश्वरच जाणे! पण तिचे रसग्रहण सर्वांनाच करता येते. आपणच -कविता -बापरे ते एक प्रस्त असते,किवा कविता म्हणजे यमकाळलेल्या  अर्थहीन वाक्यांची लक्तर म्हणून कवितेला दूर सारत आलोय. थोडा स्वाद घेऊन तर बघा.एक नवीन दुनिया तुमची वाट पाहत आहे .
— सुरेश कुलकर्णी 
(एकंदर कवितेची ओढ कमी होत आहे. ती वाढावी म्हणून हा खटाटोप केला.किमान एक जण जरी या मुळे ‘कवितेत’ रमला तर त्याचा मी ऋणी राहीन.)

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..