नवीन लेखन...

कलकलाट

आता ध्वनी-प्रदुषणाविरुद्ध मोहिम काढली पाहिजे, असं मत नुकतच एका जागरुक प्रतिभावान लेखकानं जाहिर केलं आहे. ते सुरु करण्यासाठी दोन-तीन लाऊडस्पीकर्स खरेदी केले आहेत. ‘आवाज कमी करा’ हे सांगितलेले कळणार कसं? ते कळावं म्हणून आहे त्या आवाजापेक्षा मोठा आवाज काढून बोललं तरच लोकांना कळणार, असं त्याच मत आहे.


देशातील सर्वात कर्कश शहर म्हणून मुंबई शहराचा पहिला नंबर लागतो म्हणे. प्रदुषणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेने नुकतीच देशातील दिल्ली, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या शहराील मध्यवस्तीच्या परिसरात ध्वनी-प्रदुषण किती आहे, याची पाहणी केली. त्यात आवाजाची सर्वात जास्त तीव्रता मुंबई शहरात आढळून आल्याच निष्पन्न झालं. पण त्याबद्दल तुम्हाला आणि आम्हाला फारच आश्चर्य वाटणार नाही.

फरक एवढाच, की भरधाव वेगाने धावणाऱ्या आणि घोडागाडीपेक्षा जास्त उसळ्या मारणाऱ्या  लोकल गाडीतून प्रवास केल्यास किती आवाजाचे दांडे कानात बसता ते बघा, वा नुसते दांडे बसत नाहीत तर त्या धडाडधुडूम आवाजावर मात करत एकमेकांशी व्यवस्थितपणे बोलणारे, हसणारे, पुस्तक वाचणारे, पत्ते खेळणारे आणि कॅलक्युलेटर घेऊन बेरजा -वजाबाक्या करणारे किंवा भाव कॉपी हातात घेऊन पाहिले त्या शेअरचे भाव वाचणारे महाभाग बघितले, म्हणजे गीतेत कृष्णाने स्थितप्रज्ञ कोणाला म्हणाव त्याची व्याख्या सांगितली आहे, त्या व्याख्येत ही सारी माणस एकदम फिट्ट बसतात. त्यामुळे ध्वनी–प्रदुषण की काय म्हणतात त्याची बाधा त्यांना होत नसावी. नाहीतर कुणाही शहाण्या माणसाला वेड लागेल अशा गाडीच्या खडखडात आपल्याला आवडेल ते काम करणारी ही माणंस स्थित प्रज्ञेच्या अवस्थेला केव्हाच जाऊन पोहोचलेली असावीत. नाहीतर मनाचा इतका निग्रह राखणे अवघडच.

कुठलाच आवाज ऐकू येत नाही आणि नीरव शांतता आहे, अस कधी कुठे मुंबई शहरात जाणवेल असं वाटत नाही. तुम्ही अगदी स्टेशनपासून, रेल्वे लाईनपासून, कारखान्यापासून, रस्त्यांपासून, लांब राहात असलात तरी जिथे राहता त्या सोसायटीतील कोलाहल इतका प्रचंड असतो, आरडाओरडा, मोठमोठयाने बोलणारे, किंचाळणारे, भांडणारे इतके असतात, उचल- खाचल इतकी असते, रेडिओ, टीव्ही आणि केबलला इतका ऊत आलेला असतो की, शांतपणे पडलेल्या माणसाला- माणसाच्या कानाला कधी उसंत मिळेल तर शपथ.

कुठल्याही स्टेशनमधून बाहेर पडल्यावर कानाचे पडदे दररोज एकदा फाटत असावेत. इतका कलकलाट आणखी कुठे असू शकेल असं वाटत नाही. जाता-येता  जागातल्या सर्वच भाषांची मुळाक्षर कानावर पडतात. माणसाच्या स्वरयंत्राने इतक्या विविध प्रकारे आवाज बाहेर {ाडतात, याच नवल वाटायला लागत. बर हा कलकलाट दिवसाचा असतो, अस नाही. सर्वात उशिरा झोपणारं शहर म्हणजे मुंबई. रात्रीचे बारा वाजून गेले तरी लोकलगाडया, बेस्टच्या बसेस, टॅक्सी, रिक्षा लाखो लोकांची ने-आण करत असतात, कारखाने चालूच असतात. त्यांचा आवाज जास्त तीव्र बनतो. त्यात चौवीस तास चालणारे स्टार, सीएनएनसारखे कार्यक्रम असतातच आणि ते पाहणारे महाभागही भरपूर मिळतात. मग शांतता मिळणार कशी?

तसं पाहिल तर शहर कधी झोपतच नाही. शेवटची लोकल एक वाजता गेल्यानंतर पहिली लोकल पहाटे साडेतीन वाजता सुरु होते. या काळातही शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बेस्टच्या बसेस सारख्या धावतच असतात. त्यांचे आवाजही रात्रीच्या काहीशा शांत वातावरणात दूरवर पोहोचत असतात. रात्री कुत्री आणि मांजरं यांना ओरडण्याला चेव चढतो. भटकी कुत्री आणि जनावर पकडण्याच काम नगरपालिका गेली १०० वर्षे करत आहे. त्या पकडलेल्या कुत्र्यांच करायच काय, हा सुध्दा प्रश्नच असतो. त्यावरुनही अनेक वेळा आंदोलन छेडण्यात आली आहेत.

बर सतत कर्कश- कानठळया बसवणारे आवाज ऐकून माणसाची ऐकण्याची क्षमताच कमी होत नाही तर बराच विपरीत परिणाम होतो, अस तज्ञांचे मत आहे. अर्थात कुठल्याच दोन  तज्ञांच कधीच एकमत होत नसते. तेवढाच आपल्याला दिलासा.

सतत उंच स्वरातलं संगीत ऐकून, उंच स्वरात बोलून आणि मोठयाने बोललेले ऐकून काय होत, हे नुकतच अनुभवल. मित्राचा कॉलेजात जाणारा मुलगा सतत भिंती हादरवणार संगीत ऐकून ऐकून जवळ जवळ ठार बहिराच झालेला आहे. त्याल साध बोललेले ऐकू येत नाही. त्याला काही सांगायच असेल तर त्याच्याकानाजवळ जाऊन मोठयाने ओरडाव लागत. मुलाला सतत ओरडून ओरडून मित्रालाही आता कमी ऐकायला यायला लागल आहे. तस आपल्या सगळयानाच थोड थोड कमी ऐकू येत असाव, अस माझ पक्क मत झालेल आहे.

आता ध्वनी-प्रदुषणाविरुध्द मोहीम काढली पाहिजे, अस मत नुकतच एका जागरुक प्रतिभावान लेखकान जाहीर केल आहे. ते सुरु करण्यासाठी दोन-तीन लाऊडस्पीकर्स खरेदी केले आहेत. आवाज कमी करा हे सांगितलेले कळणार कस? ते कळाव म्हणून आहे त्या आवाजापेक्षा मोठा आवाज काढून बोलल तरच लोकाना कळणार, अस त्याच मत आहे. सर्वात जास्त ध्वनी-प्रदुषण असलेल्या शहराचा तो रहिवासी आहे. त्यामुळे त्याचं तरी काय चुकल?

— प्रकाश बाळ जोशी

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..