नवीन लेखन...

जन्मले पृथ्वी वरती (सुमंत उवाच – ९४)

जन्मले पृथ्वी वरती

अहंकार मातेस नाही

विश्व घडण्या दाखले

आई न कधीच देई!!

अर्थ

शिखर हे कधीच स्वतःच्या मी पणाचा दाखला देत नाही, कारण त्याला उंची प्राप्त होते ती एकावर एक साचलेल्या मातीच्या थरांमुळे. केवळ जीव बनून जन्माला घालणे हे सृष्टीच्या हातात असते पण त्या जीवाला दगड बनवायचे की सर्वांना एकत्र घेऊन शिखरावर पोचणाऱ्या मातीसारखे बनवायचे हे आईच्या आई पणावर अवलंबून असते. कुठलीही माता बाळास जन्म दिल्याचा मीपणा बाळगत नाही. तर बाळाने मोठं झाल्यावर अंगात बळ आल्यावर त्या वृत्तीचा मीपणा बाळगणे योग्य कसे?

श्री समर्थ म्हणतात की प्रपंची जो अप्रमाण / तो परमार्थी खोटा म्हणजे काय? जो कर्म करताना अजिबात कुचरत नाही, आपल्या आवडीच्या कामात स्वतःला झोकून देण्याची ज्याची वृत्ती आहे त्याला भगवंत साथ देतोच पण, या सगळ्या कर्माच्या प्रवाहातून प्रवास करताना जर घरच्या लोकांना कमी लेखले गेले,  त्यांना मीपणाच्या डोहात सतत बुडवले गेले तर परमार्थ कितीही करा त्यात तुम्हाला भगवंत प्राप्त होणार नाही.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..