नवीन लेखन...

भाजपा ‘फक्त’ ३७० वर प्रचार करतोय का??

सध्याच्या निवडणूकीत भाजपावर एक आरोप सतत होत आहे की भाजपा ३७० विषयावर प्रचार करतोय. ३७० चा आणि महाराष्ट्राचा काय संबंध?? “तुम्ही केलेल्या कामावर बोला”, “विकासाच्या मुद्यावर बोला”, “तुम्ही पुन्हा निवडणून आल्यावर काय करणार यावर बोला” अशा अनेक गोष्टी विरोधक आणि काही पत्रकारांकडून उपस्थित होत आहेत.

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ३७० आणि महाराष्ट्राचा संबंध नाही ही बाब चुकीची आहे. काश्मिर मधून विस्थापित झालेले अनेक काश्मिरी पंडीत महाराष्ट्राचे नागरिक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ३७० हटवल्यानंतर काश्मिर मधे जमीन घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरू शकते, MTDC च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार काश्मिरमधे दोन Resort बांधायची योजना बनवत आहे. याचा फायदा काश्मिरी आणि मराठी युवकांना रोजगाराच्या दृष्टीने होऊ शकतो. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ३७० हे काँग्रेसने केलेल्या काही मोठ्या पापांपैकी एक आहे आणि ते हटवण्यासाठी जेव्हा मतदान केले तेव्हा ते देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या खासदारांनी मत दिले ज्यात महाराष्ट्रातील खासदार पण आहेत. पण या देशहिताच्या कार्यातही महाराष्ट्रातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खासदारांना भाग घ्यावासा वाटला नाही. आज भाजपा ३७० वरून बोलतो तेव्हा काहींना होणाऱ्या जळजळीचे मुख्य कारण हे आहे की यामुळे पक्षाचा जनाधार आणि विश्वासार्हता आणखीनच वाढली आहे. पण मुद्दा हा आहे की भाजपा फक्त ३७० विषयावर प्रचार करतो हे कितपत योग्य आहे??

तर मुळात हे अर्धसत्य आहे. भाजपाचे नेते जेव्हा प्रचारा दरम्यान भाषण करतात तेव्हा ते आपल्या सरकारने केलेली कामे मांडतात. त्या केलेल्या अनेक कामांतील एक म्हणून ३७० मांडले जाते पण भाजपाचा प्रचार तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. गेल्या काही दिवसांत भाजपा नेत्यांच्या ज्या काही सभा झाल्या त्यात मांडल्या गेलेल्या निरनिराळ्या विकास कामांची यादी करायची झाल्यास ती खालीलप्रमाणे होते.

१) ३०,००० किमी रस्तेबांधणी
२) १८,००० गावांचा पाणी प्रश्न सोडवला
३) ग्रामीण आवास योजने अंतर्गत गरिबांसाठी ७ लाख घरे
४) २०२१ पर्यंत सर्व गरिब कुटुंबांना घरे देण्याचे उद्दिष्ट
५) शिक्षणात महाराष्ट्र क्रमांक ३ चे राज्य
६) दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्नशील
७) १५ वर्षांत आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत २०,००० कोटी तर भाजपा युती सरकारने ५ वर्षांत दिलेली मदत ५०,००० कोटी
८) आघाडी सरकारच्या काळात शेतकरी बोनस रू.५० असायचा, भाजपा सरकारने २०१४ ते २०१७ रू.२०० तर २०१८-२०१९ मधे रू.५०० बोनस दिला.
९) मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोमाने सुरू. दीड वर्षात पूर्ण होणार
१०) ३८ जलप्रकल्पांचे काम जोमाने सुरू
११) रायगड हे आगामी Industrial Hub बनणार
१२) मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण दिले
१३) धनगर आणि आदिवासींचे प्रश्न मार्गी लावले
१४) ST समाजाच्या योजनांचा वाभ धनगर समाजालाही होणार
१५) OBC समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती
१६) स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हजारो कोटींची कामे
१७) क्लस्टर बांधकामाचा प्रश्न सोडवला
१८) मेट्रोचे जाळे
१९) १,६०,००० विहिरींचे बांधकाम
२०) ५ लाख शेतकऱ्यांना पंप पुरवले
२१) १९,००० गावे दुष्काळमुक्त
२२) आगामी काळात गरिबांसाठी १० लाख घरे बांधणार
२३) ४० लाख लोकांना वैद्यकीय सहाय्यता
२४) जल जीवन मिशनसाठी ३.५ लाख कोटी रूपयांची तरतूद
२५) ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी २५ लाख कोटींची तरतूद
२६) गरिब शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना
२७) Direct Benefit Transfer मुळे थेट १००% मदत शेतकऱ्या पर्यंत
२८) किसान निधीचा शेतकऱ्यांना फायदा
२९) शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी Vaccination Programme
३०) कौशल्य विकास आणि मुद्रा लोन सारख्या योजनांचा ग्रामीण भागातील युवकांना फायदा
३१) One Ticket Policy साठी प्रयत्न (Local/Metro/Best etc. साठी एक टिकीट)
३२) कोळीवाडा आणि गावठाणांसाठी नवीन योजना
३३) Airport लगतच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास
३४) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ३०० चौ.फुटांची घरे देणार.
३५) आशियातला सगळ्यात मोठा पूनर्विकास धारावीत होणार
३६) उज्वला योजनेचा १.५ कोटी गरिब कुटुंबांना लाभ
३७) बांद्रा-वर्सोवा Sea Link
३८) विविध ठिकाणी रिंग रोडचे बांधकाम
३९) जलवाहतूकीला चालना
४०) जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांना लाभ

हि केंद्र आणि राज्य सरकारची ‘काही’ कामे ज्यांचा उल्लेख ‘काही’ ठिकाणच्या भाषणांमधे झाल्याचे मी नोंदवून ठेवले. या व्यतिरिक्त अनेक भाषणे झाली आहेत आणि त्यात अनेक वेगळे मुद्दे आणि कामे मांडली आहेत ज्याचा वरिल यादीत समावेश नाही. तसेच यात एका विशिष्ट शहरासाठी/प्रदेशासाठी केलेल्या किंवा प्रत्येक उमेदवाराने त्याच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांचा उल्लेख नाही. मग आता विचार करा की त्या सगळ्या मुद्द्यांना जोडले तर किती मुद्दे होतील??

मग जर एवढे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे मांडून जर भाजपा नेते ३७० वर ३-४ मिनीटे बोलत असतील तर त्याचा एवढा बाऊ का??
पण तरिही तो होत आहे आणि निवडणूक संपपर्यंत जाणीवपूर्वक चालू राहील. पण भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नम्रपणे सांगतो की आम्हाला फरक पडत नाही. कारण आमच्यावर अटलजींचे संस्कार आहेत. अटलजी भर संसदेत म्हणाले होते, “सत्ता का खेल तो चलता रहेगा,सरकारे आएगी-जाएगी,पार्टियां बनेगी-बिगडेंगी पर ये देश रहना चाहिए,इस देश का लोकतंत्र रहना चाहिए” हा देश आणि या देशातील लोकतंत्र टिकवण्यासाठी आम्ही ३७० हटवण्याचे काम केले आहे आणि त्याविषयी भरभरून बोलणार कारण त्यासाठी आमच्या नेत्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. मग त्याने आमच्या विरोधकांना पोटदूखी होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे आमचा नाही. आम्ही एकच जाणतो की ‘राष्ट्र प्रथम’!!! आणि हो आणखीन एक जाणतो, आएगा तो देवेंद्र ही!!!

– SwaG
(स्वानंद गांगल)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..