नवीन लेखन...

उद्योगपती जेआरडी टाटा

उद्योगपती जेआरडी टाटा यांचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी पॅरिसमध्ये झाला.

जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा हे भारतात नागरी विमान सेवेचा पाया घालणारे पहिले द्रष्टे उद्योगपती, वैमानिक! उद्योगपती रतनजी दादाभॉय टाटा हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचे नाव होते सुझान ब्रीअरे. त्या फ्रेंच होत्या. रतनजी टाटा हे टाटा उद्योगसमूहाची स्थापना करणाऱ्या सर जमशेदजी टाटा यांचे चुलत बंधू होते. ‘जेआरडी’ यांची आई ही भारतात १९२९ मध्ये कार चालवणारी पहिली महिला होती. जे. आर. डी. टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी घातला. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा टी, व्होल्टास आणि देशातील पहिली विमान कंपनी एअर इंडिया यांचा समावेश आहे. फ्रान्स, लंडन, जपान आणि भारतात त्यांचे शिक्षण झाले. १९२५ मध्ये त्यांनी ‘टाटा सन्स’मध्ये बिनपगारी अ‍ॅप्रेंटिस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि १९३८ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी ते ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनले होते. स्टील, रसायने, ऊर्जा, वीज, अभियांत्रिकी आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योगांचा पाया त्यांनी घातला. उद्योगात मूल्य आणि तत्त्वे यांचा पाया बळकट करून त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा आदर्श जगासमोर उभा केला.

टाटा म्हणजे विश्वासार्हता, हे समीकरण जनमानसात रुजवण्यात ‘जेआरडीं’चे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने आपली उलाढाल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून पाच अब्ज डॉलर्सच्या पुढे नेली. ८८ व्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या ‘जेआरडीं’च्या नेतृत्वाखाली टाटा समूहाच्या कंपन्यांची संख्या ९५ झाली होती. सर दोराबजी टाटा ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १९४१ मध्ये टाटा मेमोरिअल सेंटर हे कर्करोगावर उपचार, संशोधन करणारे आशियातील पहिले रुग्णालय उभे राहिले. १९३६मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, १९४५मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि राष्ट्रीय सादरीकरण कला केंद्र या संस्थांची स्थापनाही ‘जेआरडीं’नी केली. १९४५ मध्ये टाटा मोटर्सची स्थापनाही त्यांनी केली. १९३२मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स ही स्वतःची विमान कंपनी स्थापन केली. नंतर तिचे राष्ट्रीयीकरण करून ती एअर इंडिया झाली. ‘जेआरडी’ २५ वर्षे या कंपनीचे अध्यक्ष होते. देशात सर्वोत्तम हवाई वाहतूक सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानाची दाखल घेऊन त्यांना मानद एअर कमोडोर पद देण्यात आले होते.

अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते. १९५५ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. देशाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च मानाच्या नागरी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले होते. जे. आर. डी टाटा यांचे २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जीनिव्हा मध्ये निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..