नवीन लेखन...

भारतीय शास्त्रीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत हा काही माझा विषय नाही. तानसेन होता आलं नाही, तरी कानसेन मात्र नक्कीच झालो.

शास्त्रीय संगीतामधे प्रत्येक रागाची ऐकण्याची वेळ ठरलेली असते. बरेचदा सकाळी ऐकायचा राग जर तुम्ही दुपारी ऐकाल तर तो ऐकतांना काहीतरी बिघडलंय याची जाणीव करून देतो, उगीच काहीतरी चुकल्या सारखं वाटतं. या उलट जर त्या – त्या वेळेसचा राग त्या त्या वेळी ऐकला तर तो सगळ्य़ा जाणीवांना स्पर्शून जातो. मी स्वतः याचा बरेचदा अनुभव घेतला आह . एवढ्यातलीच गोष्ट आहे, अश्विनी भिडे देशपांडे यांच्या एका पहाट मैफिलीला गेलो होतो. सकाळचा गारवा.. हेमंत ऋतू असल्याने मंद वारे सुरु होते. अश्विनी भिडे यांचा “कवन बदरीया गयो माई, कौन गली गयो शाम” रे मनवा सुमर हरी नाम.. सुरु केले आणि साधारण २० एक मिनिटांच्या नंतर आपोआपच डोळ्यात पाणी आलं. इतका आर्त स्वर लागला होता की तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही. योग्य वेळी योग्य राग आणि उत्कृष्ट वातावरण निर्मिती यामुळे हे शक्य होऊ शकते! संगीता मधे जी शक्ती आहे ती फक्त अनुभवाने च समजते. संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच गाणं गात असतो. समोर समे वर आल्यावर एक जरी मान डॊलली की तो भरून पावतो. गाणं म्हणण्याचा रियाज तर हवाच पण गाणं ऐकण्याचा ही रियाज हवा, नाही तर शास्त्रीय संगीतात काहीच रस वाटणार नाही.

एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी मा.आरती अंकलीकर म्हणाल्या होत्या, ” पट्टीच्या गवयाला कुठलाही नाद चालतो, मग तो पंख्याचा लयबद्ध नाद जरी असला, तरीही त्या नादावर गाणं आपोआप गुणगुणले जातं.” हीच गोष्ट पुढे नेत मा.भाऊ मराठे यांनी सूत्र संचालन करतांना पंडित भीमसेन जोशींचा एक बडॊद्याचा अनुभव सांगितला .रात्रीची वेळ, भीमसेन जोशी टांग्यात बसून जात होते. टांग्याच्या घोड्यांच्या टापांचा, चाकांचा- लयबद्ध आवाज, आणि निःशब्द शांतता. पंडितजींनी स्वतःच्या नकळत पूरियाधनाश्री गुणगुणणे सुरु केले. रात्रीची निवांत वेळ, टांग्याच्या घोड्य़ांच्या टापाचा लयबद्ध आवाज, आणि पंडीतजींचा सूर.. तेवढ्यात काहीतरी झालं आणि टांगा थांबला. लय थांबली, आणि त्या बरोबरच पंडीतजींचा आवाजही थांबला. टांगेवाला म्हणतो, ” पूरियाधनाश्री क्युं बंद किया? शुरु रखिये नां”.. आता एक टांगेवाल्याने कुठला राग आहे हे ओळखलेले ऐकून पंडितजींना खूप आश्चर्य वाटले, त्यांनी विचारले,” आपको , कैसे मालूम की ये धनश्री पुरीया है” त्यावर टांगेवाल म्हणतो, ” बाबूजी, हम फैय्याज खां साहब के पडॊसमे रहते, है, और हमेशा उनका रियाज सुनते हुए बडे हुए है, इतना तो मालूम रहेगाही नां…”

वरचा अनुभव म्हणजे त्या टांगेवाल्याच्या कानावर ऐकण्याचे संस्कार झाले होते. हा प्रसंग ऐकण्याचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे दाखवणारा आहे. गाणं म्हणणं जितकं महत्त्वाचं, तितकंच ते ऐकता येणं हे ही महत्त्वाचं. त्या टांगेवाल्याच्या कानावर गाणं ऐकण्याचे संस्कार झाले होते.गाणं कसं ऐकावं यातलं मर्म त्याला समजलं होतं. म्हणूनच तो पंडितजींना दाद देऊ शकला. योग्य वेळी जर योग्य राग ऐकला, तर त्याचा परिणाम जास्त होतो. बरेचदा चुकीच्या वेळेस ऐकलेले राग उगाच नकोसे वाटतात. तेंव्हा, रागाची वेळ सगळ्यात जास्त महत्त्वाची.

इंटरनेट वरून आपल्या सभासदांसाठी, कुठला राग केंव्हा ऐकावा याची माहिती देत आहे. या वर अधिक प्रकाश आपल्या सभासदांनी टाकावा.
सकाळी २ ते ४ :- सोहिनी, पारज
सकाळी ४ ते ६ :- ललित, भटीयार,भनकर
सकाळी ६ ते ८ :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा, विभास,गुनकली
सकाळी ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल
दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी,असावरी,
दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग
दुपारी २ ते ४ :- भिमपलासी, मुलतानी
दुपारी ४ ते ६ :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी, बरवा
सायंकाळी ६ ते ८ :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौ्री, हंसध्वनी,परीय़ाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, हमीर, यमन कल्याण, कलावती
रात्री ८ ते १० :- देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद,खमाज, कलावती
रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा ,कौ्शिक अवनी, बिहागडा, सरस्वती,
रात्री १२ ते २ :-अदना, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..