नवीन लेखन...

हिरोजी फर्जंद

Hiroji Farjand

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण महाराजांवर जीव ओवाळून टाकीत होता त्यातीलच एक म्हणजे हिरोजी फर्जंद

मिर्झा राजे जयसिंग यांबरोबर झालेल्या कराराच्या ओझ्यामुळे महाराजांना पातशहाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणे भाग पडले औरंगजेबाचा पन्नासाव्या वाढदिवसाला महाराज त्या औरंग्याच्या दरबारात हजर होते येथे मात्र महाराजांचा अपमान करण्यात आला आणी नंतर महाराजांना डांबून ठेवण्यात आले हफ्सी मुराज खान, फौलाद्खन जातीने पहारा देत. नंतर हे पहारे ढील्ले पढले

युक्ती लढवली गेली तसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वतः हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत पांघरून घेऊन झोपला झोपला.

(मागें दिल्लीमध्ये हिरोजी फरजंद पलंगावरी निजला होता. तो चार प्रहर रात्र व तीन प्रहर दिवस तैसाच निजला.चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात {तो} राजे शेला पांघरून निजले.पोर पाय रगडित होता. पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले? पोर म्हणतो की ‘शीर दुखते’ऐसे पाहोन लोक जातात. तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता. तों प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन , आपलीं पांघरुणे, चोळणा, मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन, बाहेर आला चौकीदारांनी पुसिले त्यांस हिरोजीने सांगितले की शीर दुखते, कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मन करणे. आपण औषध घेऊन येतो ” म्हणून चौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले. रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोन देशाचा मार्ग धरीला ) कंसातील लेखन – सभासदाची बखर

दुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला.एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल ? तो विरघळला की गोठला ? त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का ? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का ? केवढी फजिती!

एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला तेही साऱ्या मावळ्यांना सुरक्षित घेऊन . आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे ? त्याला सांगायचे तरी काय ? काय अवस्था झाली असेल फुलादखानची ?

केवढी ही स्वामीनिष्ठा केवढा हा त्याग स्वताच्या जीवावर खेळून पर मुलखातुन आपल्या धन्याला सुखरूप राजगडी न्हेणारे असे हे हिरोजी फर्जंद

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

17 Comments on हिरोजी फर्जंद

  1. NAMASKAR
    Majhya vichara anusar Maharajan vishai lihinare lekhak tyanchya premapoti Ani shradhe potich lihitat tyat tyanchya apaman karnyacha heto nasto.Aplyala evdha farak kalto ki kon apaman karu baghtoy Ani kon nahi.
    APAN hya gostin vr charcha karnya aivaji tyanchya Charitra darshanatun shikvan gheu ya
    JAY SHIVRAY..!! JAY SHAMBHU RAJE..!!!

  2. मराठेशाहीचा पुढे जो भारतभर दरारा निर्माण झाला तो छ.शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्याची स्थापना आणि छ.संभाजी महाराजांचे बलिदान या दोन प्रमुख गोष्टींमुळे.आपण कायम ऋणी आहोत त्यांचे.

  3. तुम्ही एक लेखक व्यक्ती चारित्र्य लीहतांना मान पान असतो हे विसरलात का आणि ते राजे आहेत असा नाव घेऊन लिहू नका एकच विनंती करतो. जय शिवराय,जय संभुराय

  4. राजांविषयी लिहताना आपण कसा शब्दप्रयोग करतोय याचे भान ठेवावे

  5. ०४.१२.१६
    नमस्कार.
    – छान माहितीपूर्ण लेख.
    – अजून थोडेसें कांहीं –
    -हिरोजी हा शहाजी राजांना नाटकशाळेपासून झालेला पुत्र होता. फर्जंद म्हणजे पुत्र. त्या काळी, अशा, मोठ्या लोकांच्या विवाहबाह्य पुत्रांना फर्जंद म्हणत असत.
    – यावरून, हिरोजी हा कांहींसा शिवाजी राजांसारखा कां दिसत असे, याचा उलगडा होतो.
    – असा, शिवाजीवरून जीव ओवाळून टाकणारा हिरोजी पुढे संभाजीविरुद्ध गेला. ( संभाजी हा राजा होऊं नये अशा विचारांच्या बर्‍याच महत्वाच्या व्यक्ती होत्या). संभाजी नें हिरोजीला एकदा माफ केलेें, पण दुसर्‍या वेळीं हत्तीच्या पायीं दिलें. काय दैवदुर्विलास हा !
    सस्नेह,
    सुभाष नाईक.

    • Ha lekh chukicha ahey… chhatrapati Sambhaji Maharajani Hiroji Farzand hyanna Hattichya paya khali nahi dile… Mahit nasel tar lihu naka pan chukicha itihaas shikvu naka

      • सचिन तुम्हाला किती माहिती आहे हेय समजते ह्या मध्ये . माहिती बरोबर आहे आणि हिरोजी फक्त शंभाजी महाराजां विरुद्ध न्हवते तर त्यांनी पन्हाळा गड वरून खजिना सुद्धा चोरून पळून गेले होते . त्यांच्या हत्ती च्या पाया खाली दिले हि माहिती बखर क्रमांक ४२३९ पान क्रमांक ४५ दारा ३ आणि ओळ ३५ वर नोंद ठेवली आहे वेळ विलास जरूर वाचावे आणि मग विधान करावे

    • साहेब एक विनंती आहे महाराजाना एकेरी नावांने नका करूँ संभाजी महाराज म्हना

    • राजांविषयी लिहताना आपण कसा शब्दप्रयोग करतोय याचे भान ठेवावे

      • Lekhak he june shiv charitrache abhyasak ahet. Baryach kadambaryat (chava, shrimanyogi) shivaji maharaja ncha, shabhu maharajancha ekeri ullekh adhalto. Charitra lihitana ekeri navacha ullekh kela jato. Tyat konacha apman krnyacha hetu nsto. Lekhak he tumha amha peksha mote shiv bhakt ahet. Mhanunch te shiv charitra che likhan ani prasar krit ahet. Tyanchyashi asbhya pne bolu nye te eka mavlyala ashobhniy ahe. Jay shivray

    • आपण वरील दिलेली माहिती पुर्णपणे खोटी आहे… आपण ज्यांच्या बद्दल लिहित आहोत ते सामान्य व्यक्ती नाही त कुठल्याही प्रकारचा पुरावा , संदर्भ न देता ईतकी गंभीर स्वरूपाची बदनामी करणारी टिप्पणी करणे आपल्या ला शोभणारे नाही….

      अत्तापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात खुप लेख आले वा तशी सोयच करून ठेवी पण सत्य लोकांच्या मनात झिरपत झिरपत आज वर पोहोचलच….आपण केलेल्या एकेरी उल्लेख अणि बदनामी करणाऱ्या मजकुरा वरून आपली निती स्पष्ट होते….

Leave a Reply to Sachin pawar Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..