Web
Analytics
मराठी आडनावांच्या गमतीजमती. – Marathisrushti Articles

मराठी आडनावांच्या गमतीजमती.

मराठी नावे किवा आडनावे अंग्रजीत लिहीलीत आणि स्पेलिगनुसार त्यांचा अुच्चार केला तर कसे अनर्थ निर्माण होतात याची अनेक अुदाहरणे आहेत. नावात काय आहे? असे खुद्द शेक्सपियरनेच म्हटले आहे. परंतू नावाच्या अुच्चारात खूप काही किवा सर्व काही आहे हे कदाचित शेक्सपियरच्याही लक्षात आलेले दिसत नाही. भारत नावाच्या देशातील गुजराथ नावाच्या प्रांतातील काही व्यक्ती आपल्या नावाचा अुच्चार ‘सेक्सपियर ‘ असाही करू शकतात याची त्याला कशी कल्पना असणार?

मराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. मराठी आडनावात असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से आणि गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही आडनावातील गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी, या गमतीजमतींचा आनंद, खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.

बोंबलाभुसावळजवळील, वरणगाव येथे माझी आत्या राहते. त्या कुटुंबाला, अहिल्याबाआी होळकरांच्या काळापासून अेका मंदिराची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंदिराचा खर्च भागविण्यासाठी, थोडी शेतजमीनही देण्यात आली आहे. जमीन कसण्यासाठी ती अेका कुळाला देण्यात आली.कुळकायदा आला तेव्हा त्या कुळाने जमिनीवर हक्क सांगितला. जमीन स्वत:ची नसून मंदिराची असल्यामुळे ती कुळकायद्यात येत नाही असे परोपरीने सांगूनही अुपयोग झाला नाही आणि शेवटी कोर्टात दावा लागला. कुळ…. वादी आणि आत्याचे कुटुंब….. प्रतिवादी असा खटला अुभा राहिला. कुळाची अुलट तपासणी करतेवेळी, प्रतिवादीच्या वकीलाने विचारले, ‘तुझे नाव काय ?’ ‘खुशाल बोंबला ‘ अुत्तर आले.’तुझे नाव विचारतो आहे, ते सांग.”खुशाल बोंबला ‘ पुन्हा अदबीने अुत्तर आले.न्यायाधीशंानी लाकडी हातोडा आपटीत, कुळाला त्यांचे नाव सांगण्याचा हुकूम सोडला. तेव्हा वादीचा वकील सांगू लागला. ‘कुळाचे नाव ‘खुशाल’ आहे आणि आडनाव ‘बोंबला’ आहे. म्हणूनच तो ‘खुशाल बोंबला’ हे स्वत:चे नावच सांगतो आहे साहेब. सर्व

अुपस्थित मंडळींनी ह्या विनोदाला

दाद दिली.नंतर त्याच्या धाकट्या भावाची अुलट तपासणी सुरु झाली.’तुझे नांव सांग ‘ वकीलांचा प्रश्न.’पुना बोंबला’ अदबीने अुत्तर आले.आता मात्र न्यायाधीश चांगलेच रागावले. कोर्टात हा काय प्रकार चालला आहे. मघाशी खुशाल&nbs
p; बोंबला म्हटले आता हा पुन्हा बोंबला म्हणतो आहे. वकीलाच्या प्रश्नांना नीट अुत्तर देता येत नाहीत का?पुन्हा वादीच्या वकीलांनी खुलासा केला. साहेब, माझ्या अशिलाचे नाव ‘पुना’ आहे आणि आडनाव ‘बोंबला’ आहे म्हणून तो, पुन्हा बोंबला असे न म्हणता ‘पुना बोंबला’ हे आपले नावच सांगतो आहे. कोर्टाची बेअदबी करीत नाही. आता मात्र कोर्टात प्रचंड हशा पिकला.पुढे ती जमीन आतेकडेच राहिली आणि तेच कुळ कायम राहिले.

शब्दी-महाशब्दीआडनावांच्या गमतीजमतींनी मराठी लेखकांना अतकी भुरळ पाडली आहे की, दोनतीन महिन्यात, कोणत्यातरी प्रसारमाध्यमात, कुणीतरी अेखादा लेख लिहीलेला आढळतो. त्यावरून असे लक्षात येते की ह्या गमती जमतींचे गमतीदार वर्गीकरणदेखील करता येते.प्रसंगांशी सुसंगत किवा विसंगत आडनावे असली म्हणजे काही किस्से निर्माण होतात. आमच्या कॉलेजात महाशब्दे आडनावाचे अंग्रजीचे प्राध्यापक आणि शब्दे आडनावाचे प्राचार्य होते. वास्तविक शब्दे प्राध्यापक आणि महाशब्दे प्राचार्य असावयास हवे होते. अेकदा गॅदरिग चालू असतांना ह्या दोघांची, विद्यार्थ्यासमोरच बाचाबाची झाली. तेव्हा आमचा विद्यार्थ्यांचा गट म्हणू लागला, आज शब्दांना महाशब्दांनी प्रत्युत्तरे मिळाली. परिणामी शब्दे आणि महाशब्दे ह्यांची शब्दी-महाशब्दी झडली.‘वाम ‘ नभाभा अणुसंशोधन केंद्रातील आम्ही चारपाच मित्रमंडळी कॅन्टीनमध्ये दुपारचे जेवण घेण्यास जात असू. कॅन्टीन बरेच दूर असल्यामुळे, जाता जाता आमच्या गप्पा रंगत असत. बोलण्याच्या नादात, अेकदा माझा डावा पाय लचकला आणि मी विव्हळलो. तेव्हा अेक खट्याळ मित्र मला म्हणाला ‘तुझ्या वामनाचार्य आडनावांत ‘वाम’ आहे. तेव्हा तुझे पाअूल वाकडे पडणारच !!तेव्हा मी चिडून म्हणालो, ‘गधड्या, अतकी वर्षे माझ्या सहवासात राहूनही, माझ्या आडनावाची खरी ओळख तुला झाली नाही. माझ्या आडनावात ‘वाम न ‘ आहे. म्हणून माझे पाअूल वाकडे न पड
ारे आहे.खट्याळ मित्रासहित, सर्व मित्रांनी माझ्या खुलाशाला मनापासून दाद दिली.

* नाटक, सहल, खेळाची टीम किवा कार्यालयातील अेखाद्या खात्यात विसंगत किवा सुसंगत आडनावांच्या व्यक्ती असल्या म्हणजे हरघडी खुसखुशीत विनोद निर्माण होतात. काळे-गोरे, विळे-भोपळे, खरे-खोटे, लांबट-टिल्लू, आंधळे-बहिरट, वाघ-अेडके-बकरे, मांजरे-अुंदरे अशासारखी आडनावे असलेल्या व्यक्ती असल्या म्हणजेही बरेच वेळा हास्यतुषार अुडतात.

* खेळाच्या टीममध्ये, डोआीफोडे, हातमोडे, पायतोडे, लचके, कानतोडे, कानपिळे, दांगट, मानमोडे, पोडफाडे, पोटदुखे, रडे, लुळे असे आडनावधारी क्रीडापटू असले आणि ते, आपल्या आडनावाप्रमाणे खरोखरच वागले, तर अनेक पेचप्रसंग निर्माण होअू शकतात.

* अेखाद्या अस्पितळात, ढोरमारे, माणूसमारे, बैलमारे, रगतचाटे, प्राणजाळे अशा भयंकर आडनावांचे डॉक्टर किवा परिचारिका असल्या तर रोगी बरा होण्याअैवजी त्याची तब्येत आणखीनच बिघडायची!!

* चोर, पगारचोर, चणेचोर, अशा आडनावांच्या व्यक्तीनी अेखाद्या संस्थेचे खजिनदारपद भूषविले तर त्यांच्यावर सतत चोरीचे आळ येण्या चा संभव आहे.

* अेखाद्या संस्थेच्या सुरक्षाखात्यात नोकरी मिळण्यासाठी मुलाखतीस गेलेल्या अुमेदवाराचे आडनाव झोपे, कुंभकर्ण, पांगळे किवा लंगडे असले तर मुलाखतीत नसते अडथळे येअून नोकरी हातची जायची!!

* सहस्त्रबुध्दे आडनावाची व्यक्ती ढ असणे, लाखे-सवालाखे-कोटे-करोडे-कुबेर अशासारखी आडनावे असलेल्या व्यक्ती दरिद्री असणे, झगडे-किरकिरे-भांड, बोबडे-तोतरे-पिसाट अशा आडनावांच्या व्यक्ती चांगल्या असणे, ह्यामुळे विरोधाभासी विनोद निर्माण होतात.* सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार, माळी, अशी व्यवसायदर्शक आडनावे धारण करणाऱ्यांनी वेगळाच व्यवसाय करणे किवा या आडनावांच्या व्यक्ती मोठ्या हुद्यावर असणे.

* अष्टपुत्रे, दशपुत्रे, पाचपोर, बारभाआी, तेरभाआी, सातपुते, विसपुते अशी आडनावे असलेल्या व्यक्ती अेकच अपत्य किवा विनापत्य किवा अविवाहित असणे…

* अेखाद्या संस्थेत भोपळे, पडवळ, दोडके, भेंडे, कोथमिरे, मुळे, लसणे, गवारे,

वांगे, असा भाजीबाजार असणे.

* घरबुडव्यांची मुलगी, पिसाटांचा

मुलगा आणि त्यांची सोयरिक जमविणाऱ्या मध्य स्थांचे आडनाव, आगलावे असेल तर त्या विवाहाची वाट लागलीच म्हणायचे !!

* बोंबले या आडनावाच्या गृहस्थाने आपले आडनाव महाशब्दे असे बदलवून घेतले. आडनाव बदलले पण आडनावातला आशय मात्र कायम राहिला !!* सुले, अकडे ये, यांची ओळख करून देते. या मीनाताआी धडपडे-भडभडे. म्हणजे लग्नाआधीच्या धडपडे आणि लग्नानंतरच्या भडभडे, म्हणून त्या आपले आडनाव धडपडे-भडभडे असे लावतात.* अफझुलपूरकर आडनावाच्या मुलीने हातकणंगलेकर आडनावाच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिने अफझुलपूरकर-हातकणंगलेकर असे लांबलचक जोड-आडनाव धारण केले. पण तिच्या मुलीने मात्र वडिलांचेच आडनाव म्हणजे हातकणंगलेकर असेच ठेवले. पुढे तिचे लग्न तंगडपल्लीवार आडनावाच्या मुलाशी झाल्यावर तिचे जोड-आडनाव हातकणंगलेकर-तंगडपल्लीवार असे झाल्यामुळे हात आणि तंगडी यांचे सख्य जमले.

* अेक अक्षरी अेकमेव आडनाव म्हणजे पै. दोन अक्षरी, तीन अक्षरी वगैरे आडनावे खूप आहेत. अडवलपालकर, अनसरवाडीकर, अफझुलपूरकर, अहमदाबादकर, हयातनगरकर – – ही झाली आठ अक्षरी आडनावे.अकेअंजनढवकर आणि अनगरकरपाटील ही झाली नअू अक्षरी आडनावे.

* ‘अ’ कारी आडनावे – अचवल , अजगर , अडसड , अडसर, अनगळ, अनपट, अनमल ,अनवट, अरबट, कद, कदम, कपटकर, कळमदर, कळस, कळसकर, खडक, खडककर, खडप, खडपकर, खडस, खरटमल, खरड, खळदकर, गजबर, गजमल, गडकर, गडग, गडद, गणकर, गणपत, गदग, गदगकर, गरड, गवस, घन, घनवट, घनवटकर, घरत. चमणकर, चरण, चरणकर, जतकर, जनक, जपकर, जरग, जरड, जवळ, जवळकर, झगडकर, झणकर, झनक, झनकर टक, टणक ठक, ठग, ठवकर, ढफ, ढवण, तक, तट, तडवळकर, तडस, तळवलकर थरवळ दगड, दडकर, दडमल, दडस, दशरथ, धनवट, धस, नगरकर, नर, नरड, नरम, नरदकर, नवलकर, पडवळ, पवनगडकर, पळ, फटकळ, फळ, बडकस, बदक, भगत, भट, भटकळ, भडकमकर, भरत, मगर, मटकर, मदन, यमकर, यरमळ, रडकर, लगड, वगळ, शहर, शहरकर, सकळकर, सणक, सणस, सरमळकर, सरळकर, हटकर, हडकर, हडप, हडपड, हडळ, हणम, हणमकर हनमघट, हरणकर, हळदणकर, * सर्व अक्षरंाना अेकार असलेली आडनावे : बेहेरे, देठे, लेले, नेने* सर्व अक्षरंाना अुकार असलेले आडनाव : धुळुबुळु* असे कोणते आडनाव आहे की ज्यात मराठी शब्द आणि त्याचा अंग्रजी अर्थ मिळून ते आडनाव तयार झाले आहे : वाट – वे आणखी काही संकलीत किस्से पुढे देत आहे.

अहो माआी येते’अहो माआी येते ‘. छोटेसेच वाक्य पण त्याचे वैशिष्ठ्य असे की, त्यातील प्रत्येक शब्द म्हणजे ‘अहो ‘, ‘माआी ‘ आणि ‘ येते ‘ ही तीनही मराठी आडनावे आहेत.’माआी केस कापतात’ असा अेक किस्सा ज्यावेळी माझ्या काकांनी मला सांगितला तेव्हा त्यांचे वय सुमारे 90 वर्षांचे होते. माआी केस कापतात ही घटना, ते 30/35 वर्षांचे असतांना घडली आहे. 1988 साली 102 व्या वर्षी काकांचे निधन झाले.केसकर्तनालयात जाअून केस कापून घेणे ही अलीकडची पद्धत. पूर्वी न्हावी घरी यायचा आणि ज्यांचे केस वाढले असतील त्यांचे केस कापायचा. अशाच अेका वेळी घडलेली गंमत काका सांगतात. त्यावेळी कुटुंब मोठे असायचे. लहान मुले, मोठी माणसेही बरीच असायची. शिवाय वाड्यातल्या बिऱ्हाडातील मंडळी असायची म्हणजे न्हाव्याला घरात खूप काम असायचे.अेकदा काका आपल्या मित्राकडे गेले होते. मित्राचे केस कापून घेणे चालले होते. काकांचे केसही कापण्यायोग्य झाले होते. ते म्हणाले, ‘चला, मीही येथेच केस कापून घेतो.’मित्र म्हणाला, ‘घ्या ना. पण आधी शेजारच्या माआींचे केस कापायचे आहेत. त्यांचे झाल्यावर तुम्ही बसा.’ आणि त्यांनी आपल्या मुलाला माआींना बोलवायला पाठवले आणि ते स्वत: आंघोळीला निघूनही गेले.केस कापून घ्यायला माआी येत आहेत,

हे पाहून काकांना आश्चर्य वाटले. त्याकाळी विधवांचे केशवपन केले जाआी. पण ते अेखाद्या आडबाजूच्या खोलीत. माआी ही विधवा बाआी&n
bsp;

सर्वांसमोर केस कापून घेणार हे अैकून काका चाटच पडले.मध्यंतरी अेक गृहस्थ आले, आणि केस कापून घेअू लागले. काका वर्तमानपत्र वाचीत बसले.थोडा वेळ गेला. काकांचे मित्र आंघोळ करून आले. त्या गृहस्थांचे केस कापून झाले होते. मित्र म्हणाला, ‘वामनाचार्य, आता तुम्ही बसा.”पण त्या माआींचं व्हायचंय ना?’ काकांनी विचारले.’अहो हेच माआी. ‘ मित्र म्हणाला, ‘हे आमचे नवे शेजारी. यांचंच आडनाव माआी.’

* फेब्रुवारी 1975 च्या ‘अमृत’ मध्ये, ‘मराठी आडनावांचा संग्रह’ हा माझा लेख प्रसिध्द झाल्यावर, नागपूरच्या श्री. म. वि. गोखले ह्यानी, आडनावांच्या गमतीजमती असणारे फारच सुंदर पत्र पाठविले, त्यातला काही भाग… …पूर्वीच्या मध्यप्रदेशातील न्यायाधीशात दुबे होते तसे चौबेही होते. द्विवेदी, त्तिवेदी व चतुर्वदी हते . काळे, बेंद्रे व रडके ह्या आडनावंाचे न्यायाधीश हत. पण सुदैवान ते अेकाच गावी अेकाच वेळी अेकत्र आले नाहीत. शास्त्री होत, पुराणिक होते तसे हरदासही होते. अेकदा यवतमाळ येथे शास्त्री व पुराणिक ह्या आडनावंाच्या पक्षकारंामध्ये अेक दावा होता व तो हरदास नावाच्या न्यायाधीशासमोर आला. अेका गावी वाघ, सिंह, लंाडगे व कोल्हे ह्या आडनावाच्या व्यक्तीचे ओळीने बंगल आहेत. त्या बंगल्यासमोरून जाताना गाआी, म्हशी व शेळ्या बिचकतात अशी वदंता आहे. विळे, आणि भोपळे ह्या आडनावांचे गृहस्थ अेकमेकंाच मित्र होते. त्यामुळ विळ्या भोपळ्या अितके सख्य ह्या वाक्प्रचाराला तडा गेला.अेकदा श्री. देव ह्यंानी श्री. ब्रह्यराक्षस ह्यंाच्या बंगल्याच्या बाजुला आपला बंगला बंाधला. त्यामुळे देव कोठे राहतात? ब्रह्यराक्षसंाच्या बाजुला, ब्रह्यराक्षस कोठे राहतात? देवंाच्या बाजुला असे संवाद अैकू येअू लागले. पुढे भूत आडनावाच गृहस्थ ब्रह्यराक्षसंाच्या तळमजल्यावर राहण्यास आले. त्यामुळे भूत कोठ राहतात? ब्रह्यराक्षसांच्या खाली.&nb
sp; ब्रह्यराक्षस कोठे राहतात? भुतांच्या वर असे संवाद अैकू येअू लागले. पुढे सुदैवाने श्री. काणे ह्यंानी देव व ब्रह्यराक्षस ह्यंाच्यामध्य आपला बंगला बंाधून त्यंाची फारकत केली. त्यामुळ देव-ब्रह्यराक्षस योगाकडे काणाडोळा करणे शक्य झाले!! नागपूर येथील सुप्रसिध्द राजाराम वाचनालयाच्या कार्यकर्त्यांमध्ये, धर्मप्रधान नावे व आडनावे अेकत्र आली आहेत. संस्थापक कै. राजाराम सीताराम दीक्षित… नावात राम राजा, वडिलंाचे नावात सीता व राम, आडनावात दीक्षा घेतल्याचा पुरावा. अध्यक्ष…पुराणिक. हे पुराण संागत नाहीत पण वाचनालयामार्फत लोकशिक्षणाचे व लोकरंजनाचे कार्य करतात.अेक अुपाध्यक्ष… जोगीराव. जोगी हा योगी चा अपभ्रंश आहे, हे मुद्दाम संागावयास नको. जोगीराव योगसाधना करतात की नाही कोणास ठाअूक! पण वाचनालयाकरता देणग्या मिळविणे, अमारतीसाठी लोखंड, सिमेंट अत्यादी मिळविणे, ह्याच्या तंद्रीत सदैव मग्न असतात. दुसरे अुपाध्यक्ष अुपाध्ये. ह्यांच वाचन दांडगे आहे. वाचनालयातील गणेशोत्सव व अतर धार्मिक समारंभाचे अुपाध्येपण हे समर्थपणे करतात. अितकी धार्मिक नावे पुरेशी झाली नाहीत म्हणूनच की काय वाचनालयाला सेो*टरी मिळाले पद्माकर जोशी. वाचनालयातील सर्व समारंभाचे जोसपण हे तन्मयतेने करतात. हे सर्व पाहिले म्हणजे असे वाटते की, नावे व आडनावे केवळ योगायोगाने अेकत्र येत नसावीत. त्यंाच्या मागे काहीतरी सूत्र असावे.

* श्री. म. वि. गोखल्यांप्रमाणेच, श्री. धुंडिराज ना. वैद्य, कल्याण यंानीह ‘मराठी आडनावंाचा संग्रह’ ह्या लेखावर चांगली प्रतिा*या पाठविली. ती अशी……आणखीही मजेशीर आडनावंाचा अुल्लेख करता येआील. ती आडनावे बाजी, अहो, परोपकारी, न्यायाधीश, तूपसाखरे, दहीभाते, राजबिंडे, धुके, अहंकारी, दु:खी, अतराज, ताडपत्रीकर, धनाढ्य, फुकट अत्यादी. काही नावे व आडनावे अेकच आहेत. मनोहर नाव आहे तसेच आडनावही आहे. भालचंद्र, कमलाकर हेही तसेच आहे. रडके आहेत तसेच भाग्यवंत आहेत, कल्पवृक्ष आहेत, पोचट, लामकाने आहत, शिंगबळ, आरू, हस्तकसुद्धा आहेत. कंादे, व्यापारी आहेत ,

कलावंत, प्राणी, पाखंड, हयग्रीव, आचारी, कातरणे, भैरव, स्वयंपाकी ही सर्व मराठी आडनाव आहेत.तसेच काही आडनावे विशिष्ट जातीतच असतात अशी सामान्यत: समजूत असते. परंतु निंबाळकर, दाभाडे,

राअुत, राणे, शिंदे हे ब्राह्यणातसुद्धा आहत. कारखानीस, दिघे फक्त चंाद्रसनीय कायस्थ प्रभूतच नाहीत तर ब्राह्यणातही आहेत. म्हात्रे, दलाल, दुर्वे हेही ब्राह्यण आहेत. मराठी आडनावे हा अेक अुत्कृष्ट व महत्वाचा संशोधनाचा विषय ठरेल व सांस्कृतिक दृष्टिने संस्कार फार मोलाचे कार्य संशोधनाअंती पार पडेल, यात शंकाच नाही. आडनावांच्या आणखी काही गमतीडासशिवाजी पार्क येथे राहणाऱ्या, डॉ सोमण ह्या माझ्या मित्राने ‘डास’ ह्या आडनावाची गमतीदार हकीगत सांगितली ती अशी :-त्यांच्या अेका आतेबहिणीच्या विवाहासंबंधी ‘ डास ‘ ह्या आडनावाच्या मुलाची चौकशी करणे चालले होते. तेव्हा बहीण म्हणाली की, हा मुलगा
कितीही चांगला आणि अनुरूप असला तरी मी त्याच्याशी लग्न करणार नाही. कारण लग्नानंतर माझे आडनाव डास व्हावे अशी माझी मुळीच अच्छा नाही. त्या मुलाने त्याचे आडनाव बदलले तरच मी त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करीन. ‘डास’ चे ‘दास’ केले तरी चालेल.पुढे चारपाच वर्षे प्रयत्न करूनही त्या मुलीचा विवाह कुठेच जुळला नाही. आणि योगायोग असा की, डासांचा मुलगा देखील ह्या काळात अविवाहितच राहिला होता. त्यामुळे तिचा विवाह त्याच्याशीच झाला. अर्थात त्यावेळी मुलीने ‘डास’ हे आडनाव धारण न करण्याचा हट्ट सोडला होता.माझा मित्र गमतीने म्हणतो की, बहिणीच्या विधीलिखितात डासच लिहीला होता, दुसरे काय?बुवाबुवा आडनावाचे माझे अेक मित्र बरेच दिवसांनी मला भेटले. त्यावेळी आमचे (काल्पनिक) संभाषण झाले ते असे…नमस्कार बुवा. ‘नमस्कार’आज अकडे कुणीकडे अुगवलात बुवा.’आलो खरे बुवा ‘बुवा, तुम्हाला अेक प्रश्न विचारीन असे कधीपासून वाटते आहे, पण संधीच मिळत नाही, काय करावे बुवा?’ हात्तिच्या, विचारा की आत्ताच ‘तुमचं आडनाव असं कसं बुवा?’ आहे खरं बुवा. पिढीजात चाललं आहे, आम्हीही चालवून घेतो झालं. ‘ते आडनाव बदलवून घ्यावसं वाटत नाही तुम्हाला?’ नाही बुवा. ठीक आहे. आहे तेच. ‘समजा, तुमचं आडनाव बदलायचंच ठरविलं तर कोणतं आडनाव धारण कराल?’ तसं कोणतंही आडनाव ठेवलं तरी चालण्यासारखं आहे. पण अेका आडनावाबद्दल मात्र आक्षेप आहे. ‘ते आक्षेपार्ह
आडनाव कोणतं बुवा?बुवा मिस्कीलपणे म्हणाले.. ‘ बाआी ‘.

खांदेवाले(श्री. श्री. वि. खांदेवाले यांच्या रविवार 6 ऑक्टोबर 1991 च्या लोकसत्तेतील लेखावरून साभार)…’खांदेवाले’ या आडनावातून काही गमती होअू शकतात हे बरेच पूर्वी माझ्या लक्षात आलं होतं. म्हणजे मी मुंबआीला येण्यापूर्वी अेक दिवस सायंकाळी फिरायला निघालो असताना समोरच्या दोन लोकांच्या तोंडी नाव आल्यासारखं वाटलं, म्हणून कान देअून अैकू लागलो. खांदेवाल्यांना जेवायला बोलावलंच पाहिजे. लोक ओळखीचे दिसत नव्हते. परंतु अुल्लेख स्पष्ट होता. आम्हांला जेवायला बोलावण्याचा हा आग्रह का? तेव्हा दुसरा म्हणत ‘हो, पण अकडं ताटं वाढतात ना?’पहिला गृहस्थ – ‘अरे खांदा द्यायला लवकर कुणी येत नाहीत. जे आलेत त्यांना आमंत्रण द्यायलाच पाहिजे. ‘ मग लक्षात आलं हे ‘त्या’ खांदेवाल्यांना अुद्देशून होतं.आमचं आडनांव व्यवसायावरून पडलेलं असल्यामुळं आमची म्हणजे या आडनावाची फारच थोडी कुटुंबं आहेत. कित्येकांना हे नाव नीट आकलनच होत नाही. त्यामुळं काही अडचणी अुद्भवतात. मी प्रथम मुंबआीला आलो तेव्हा रेल्वेचा कारकूनच रेल्वेच्या पासावर आपलं नाव लिहून द्यायचा. आपण आणि कारकून यांच्यातील अंतर व स्थानकावरील गोंगाट यामुळं अेकमेकांचं बोलणं कित्येकदा नीट अैकू जात नाही. जोशी-देशपांडे अशी नावे लवकर कळतात. परंतु माझं नांव अेका कारकुनाला आकलनच होआीना. मी त्याला ‘खांदेवाले’ म्हटलं की या शब्दाशी यमक साधणारा आवाज तो काढी – खांबेवाले, आंबेवाले… असे फक्त खांदेवा
े सोडून सर्व प्रकाचे आवाज त्यानं काढले. शेवटी मी त्याला दोन्ही खांद्यांना (माझ्या) स्पर्श करुन ‘शोल्डरमन’ असं सांगितलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं असं दिसलं.* चित्रलेखा मासिकाच्या 1995 सालच्या दिवाळी अंकात आलेली माहिती….पंजाबच्या आणि नांदेडच्या शीख समाजात फरक आहे. धर्म अेकच असला तरी चालीरितीत थोडा फरक पडला आहे.शीख समाजात मुलाचे किवा मुलीचे नाव ठेवताना गुरुग्रंथसाहिब अुघडून समोरच्या पानावर जे अक्षर पहिले असेल त्या आद्याक्षरानुसार मुलाचे किवा मुलीच नाव ठेवण्यात येते. मुलाच्या नावामागे सिग आणि मुलीच्या नावामागे कौर लावतात. बऱ्याचदा मुला-मुलींची नावं सारखी असतात. अुदाहरणार्थ, प्रकाशसिग आणि प्रकाशकौर. शिखांमध्ये आडनाव नसते. त्या अैवजी गावाच, गल्लीचे, व्यवसायाचे किवा आवडीनिवडीचे नाव जोडण्यात येते. कुणी छोट्या गल्लीबोळात रहात असेल तर तो गल्लीवाले, अेखाद्याकडे बैलगाडी असेल तर तो गाडीवाले, अेखाद्याकडे मोटार असेल तर तो मोटारवाले, अेखाद्याला आंबट वरण आवडत असेल तर त्याला फुलसू म्हणून ओळखतात. अेखाद्याला अेक हात नसेल तो टुंडा म्हणून ओळखला जातो. याशिवाय खानदानावरूनही नावे ठेवण्यात येतात. प्रेमचंद यांच्या खानदानातील प्रेमचंदानी, तर धन्नससिगच्या खानदानातील धन्नानी !गुरुद्वारात ‘ग्रंथसाहिब’ चे पठण करणारे असतात त्यांना पाठीसिग आणि भजन म्हणणारे असतात त्यांना रागीसिग असे म्हणतात.

* श्री. गोरखनाथ गो. चाबुकस्वार, स्वाक्षरी संग्राहक/पत्रलेखक : के-219, रिझर्व्ह बँक कॉलनी, चेंबूर, मुंबआी – 400 071 यांनी पाठविलेले पत्र :-सप्रेम नमस्कार. आपले दिनांक 30 ऑगस्ट 1994 चे शुभेच्छा पत्र मिळाले. आनंद झाला. आपण मराठी आडनावांचा संग्रह करीत आहात ही आनंदाची गोष्ट आहे. आगे बढो. मला माझ्या आडनावांबद्दल कांहीही माहिती नाही. मला जर कळाली तर ती आपणांला जरूर कळवीन. ज्यावेळी आपला कोश तयार होआील तेव्हा तसे कळविण्याची व्यवस्था करावी ही विनंती. आभारी होआीन. घाटकोपरला केव्हा आलो तर आपली नक्की भेट घेआीन.

* चीनमध्ये नवी दूरदर्शन मालिका (साप्ताहिक सकाळ, 18 नोव्हेंबर 1995 ) : राष्ट्राला पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीपासून दूर राखून लोकांमध्ये आपल्या संस्कृतीविषयीचं आकर्षण वाढावं आणि सांस्कृतिक जाणीव जोपासावी यासाठी चीन सरकारनं अेक वेगळ्या प्रकारचा अुफम हाती घेतला आहे.चीनमधील सर्वाधिक प्रचलित शंभर आडनावांवर आधारित दूरदर्शन मालिका बनविण्याचं चीनच्या सांस्कृतिक खात्यानं ठरविलं असून, ही मालिका शंभर भागांची असेल. चिनी संस्कृती आणि पारंपारिकतेचा अतूट हिस्सा असलेल्या या आडनावांपैकी काहींना हजारो वर्षांची परंपरा आहे.

सारांश : जात म्हणजे जन्मताच जे मिळाले असते ते. ज्या कुटुंबात बाळ जन्म घेते, त्या कुटुंबाच्या आनुवंशिक बाबी बाळाला मिळतातच. त्यात बाळाचे नाव, आडनाव, मातृभाषा, धर्म आणि अनुवंशिक गुणावगुण या पाच बाबींचा मुख्यत: समावेश असतो. गेल्या हजारो वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. पण आता विज्ञानाने अपत्य कसे जन्मते आणि त्याच्या शरीरात आनुवंशिक गुणावगुण कसे येतात याची अुकल केली आहे. म्हणूनच जातीची नवी संकल्पना रुढ केली पाहिजे, असे वाटते.

गजानन वामनाचार्य,180/4931, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई 400 075022-25022897, 9819341841,मंगळवार 8 फेब्रुवारी 2011.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 74 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी एकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राचे ते संपादक आहेत. ६०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
Contact: Website

2 Comments on मराठी आडनावांच्या गमतीजमती.

  1. आडनाव सहस्रबुद्धे असे आहे, सहस्त्रबुद्धे नव्हे !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…