नवीन लेखन...

युरोपायण पाचवा दिवस – रोटरडँम – अँमस्टरडँम – कोलोन

कालचा दिवस संस्मरणीय! म्हणजे पहा न, फ्रांसमधे पँरीसला ब्रेकफास्ट, बेल्जीयममधे ब्रुसेल्सला लंच आणि हॉलंडमधे रोटरडँमला डिनर!!

रोटरडँम, म्हणजेच हॉलंड किंवा नेदरलँडमधील, डच लोकांच्या शहरात येता येताच नदी, त्यावरील ब्रिज आणि बाहेरुन विशिष्ट बारीक बारीक टायलींग असलेल्या 8-10 मजली इमारती पाहून खूप छान वाटल; लंडन, पँरीस, ब्रुसेल्सहून डचांच वेगळेपण नक्कीच जाणवल. बहुतेक घरांना बाल्कनी किंवा टेरेस होत्या. रस्तेही भव्य आहेत. ब्रेकफास्ट आवरुन हॉलंडच मिनी व्हर्शन, मदूरोडँम, बघायला जायच ठरल.

संपूर्ण हॉलंडची छोटी प्रतिकृती पहाण्यापूर्वी अत्यंत सुरेख चित्रित केलेली प्रतिकृतीविषयीची पार्श्वभूमी समजाउन देणारी अॉडियो व्हीडीयो फिल्म मोठ्या पडद्यावर दाखवली जाते. त्या नंतर 15-20 एकरात तयार केलेली संपूर्ण हॉलंडची कलात्मकरीत्या तयार केलेली प्रतिकृती बघायला प्रवेश मिळतो. फार छान संकल्पना आहे!!

अँमस्टरडँम

मदूरोडँमहून एखाद तासात लंचसाठी पोहोचलो आणि अंदाजे दीडच्या सुमारास नेदरलँडची राजधानी अँमस्टरडँमच्या 1 तासाच्या सीटी टूरसाठी बोटीतून जायला क्यूमधे थांबलो. प्रत्येक प्रवाशासाठी हिंदी वा इंग्रजीमधे कॉमेंटरीची व्यवस्था होती. कँनाल भोवतीच्या इमारतींचा इतिहास व घडलेले बदल तसेच अँमस्टरडँम शहराचा थोडक्यात पण महत्वाचा इतिहास सांगितला जात होता. शिवाय बोटीचा कँप्टनही माईकवर महत्वाच्या बाबी सांगत होता. हॉलंड हा देशच समुद्र हटवुन वसवलेला देश आहे. समुद्राच आक्रमण थोपवुन अँमस्टरडँमचा बीझी एअरपोर्ट (Schevningen) तर समुद्रसपाटीहुनही काही मीटर खाली तयार केला आहे.

एकूणच बोटीतून घडलेली सीटी टूर नक्किच उपयुक्त आणि स्मरणात रहाणारी होती.

कोलोन

अँमस्टरडँमहून जर्मनीची बॉर्डर क्रॉसकरुन कोलोनला निघालो आणि कोलोनच्या हॉटेलमधे मुक्काम करण्यापूर्वी सुमारे साडेपाचशे फूट उंचीच गॉथिक रचनेतील सातशे वर्ष जुन्या कॅथलिक चर्चपाशी फोटो स्टॉप घेतला. या चर्चचे बांधकाम कित्येक वर्ष चालु होतं आणि हे चर्च पूर्णपणे कधीच बांधून होणार नाही अशी आख्यायिका योगेशकडून ऐकायला मिळाली.

प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..