नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ३४ )

मूंबईतील प्रत्येक गल्लीत एक दोन कुत्री असतातच आणि ती बाहेरच्या माणसांवर हमखास भुंकत असतात  आणि कधी कधी चावाही घेत असतात. त्या कुत्र्यांना गोंजारणाऱ्या लोकांचा विजयला प्रचंड राग येतो. काही महिन्यांपूर्वी विजय जेंव्हा मॉर्निंग वॉकला जात होता. तेंव्हा  त्याला काही लोक सकाळी स्वतः चालायला येतात कि कुत्र्याला चालवायला घेऊन येतात  तेच कळत नव्हते. विजयने त्या कुत्र्यांना रस्त्यावर घाण करताना पहिले कि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जायची. विजयच्या मनात कुत्र्याविषयी बसलेली ती भीती अजूनही नाहीशी झालेली नाही. विजय तर या मताचा आहे की  मुंबई या भटक्या कुत्र्यांपासून  पूर्णपणे मुक्त व्हायला हवी.

मुंबईत या कुत्र्यांचा त्रास खूप लोकांना सहन करावा लागतो खास करून कुरिअर बॉय वगैरे लोकांना. या कुत्र्यांमुळे सरकारला ही करोडो रुपये रेबीजच्या लसीवर आणि  त्याच्या निर्बिजीकरणावर  खर्च करावे  लागतात. कुत्रे हे कोणालाही चावत नाहीत पण कुत्र्यांना भिणाऱ्याला हमखास चावतात. कारण कुत्र्याला पाहून तुम्ही घाबरला की तुमच्या मनात निर्माण होणारी भीती कुत्रा अचूक टिपतो आणि मगच तुमच्यावर भुंकतो किंव्हा तुम्हाला चावतो. दुसरं तो त्याला इजा पोहचविणाऱ्या वस्तूची प्रतिमा त्याच्या मेंदूत टिपून ठेवतो त्यामुळे काही कुत्रे विशिष्ट वाहनांचा पाठलाग करताना दिसतात. विजयच्या लहानपणी त्याच्या घराच्या गल्लीतही एक कुत्रा होता त्याला पाहून लोकांना घाम फुटायचा! विजय त्याला रोज खायला घालायचा पण तरीही त्याला तो घाबरायचा तो कुत्रा मेला तेंव्हा विजयला खूप दुःख झाले त्यानंतर विजय कुत्रा पाळायचा नाही या निर्णयापर्यंत पोहचला. विजय गावावरून येताच त्याच्या एका मित्राने त्याला फोन केला आणि विचारले ” तू गावावरून आलास का? त्यावर  विजयने का? असा प्रश्न करताच तो म्हणाला,” मला एक पोपटाचा पिल्लू हवं होतं. त्यावर विजय  त्याला म्हणाला, मी तर आला गावी कोणाला तरी सांगतो मिळाला तर! पण प्रत्यक्षात विजय तसे काहीही करणार नव्हता कारण कोणतेही प्राणी पक्षी जलचर पाळायला विजयचा विरोध होता. कारण विजयच्या मते कोणताही पाळलेला प्राणी आनंदात असू शकत नाही. खास करून पोपट, मासे, कासव, कुत्रे आणि मांजर इ. हे पाळलेले प्राणी जर दुःखी असतील तर ते घरा बाहेरील अशुभता आणि नकारात्मकता  स्वतःकडे आकर्षित करून घेतात.

पिंजरा, साखळी आणि बेडी ती  सोन्याची जरी असली तरी कोणालाही कधीच आवडत नाही. मुंबई सारख्या शहरात लोक आई बापावर जितका खर्च करत नाहीत,  त्याहून जास्त कुत्र्या मांजरावर करतात. बंधनात असणारे कोणतेही प्राणी कधीच कोणाला आशीर्वाद देत नाहीत. नव्हे देऊ शकत नाही. प्राण्यांची काळजी घेण्यात त्यांना खायला प्यायला देण्यात काही चूक नाही पण त्यांचे स्वतंत्र हिरावून घेऊन नाही. फिश पॉट मधील मासा कसा आनंदी असू शकतो? त्याचा जीव तर तुम्ही पाणी बदलण्यावर आणि तुम्ही खायला घालणाऱ्या अन्नावर असतो त्यात जरा जरी गफलत झाली तर मासे मरतात. नैसर्गिक रित्या ते मरणे आणि  त्यांच्या मरणास आपण कारणीभूत होणे यात खूप फरक असतो. बहुसंख्य प्राणी पाळणारे लोक एकाकी जीवन जगत असतात अथवा माणसात राहूनही ते एकाकी असतात खसकरून स्त्रिया त्यांना निसर्गतः वेळोवेळी प्रेम करण्यासाठी कोणीतरी लागत मग त्या स्त्रिया या पाळलेल्या प्राण्यांच्या प्रेमात  पडतात आणि त्यात गुंतून पडतात. प्रचंड कामात व्यस्त असणाऱ्या व्यक्तीच्या मनात कोणतेही प्राणी पाळण्याचा विचार कधीच येत  नाही. पण हल्ली काही लोक आपल्या बेगडी प्रतिष्टेसाठी प्राणी पाळतात पण त्यांच्यावर प्रेम करायला पैसे देऊन माणसे ठेवलेली असतात. विजयाच्या गावी त्याच्या काकाने एक कुत्रा पळला होता. तो त्याच्या घरातील सोडून बाहेरच्या माणसावर सरळ चालून जायचा आणि चावा घ्यायचा त्याच्या भीतीने त्याच्या गावातील लोक त्यांच्याकडे येईनासे झाले. पण तरीही त्याच्या काकाने त्याला कधी बांधून ठेवले नाही. एक दिवस त्याचा काका जंगलात गेला असता त्याला फिट आली ते पाहून तो कुत्रा त्याच्या भोवती जोरजोरात फेऱ्या मारत भुंकत राहिला त्याचा आवाज ऐकून काकी तेथे गेली तेंव्हा तो शांत झाला.त्या कुत्र्याला रात्री तो अंगणात असताना बिबट्या  घेऊन गेला. त्या कुत्र्याची आठवण अजूनही काका – काकूला येते. विजयही गावी गेल्यावर त्या कुत्र्याला प्रचंड घाबरायचा.

आजही विजय गावी गेल्यावर काका काकूंनी एखादा कुत्रा पळाला नाही ना याची खात्री करून घेतो. तरी गावी विजयाच्या मावस भावाने एक कुत्रा पळाला तो कुत्रा तसा लाघवी आहे.कोणाच्याही अंगावर उडया मारत असतो. विजय त्याच्यापासूनही चार हात लांबच राहत होता. सांगायचं तात्पर्य इतकंच की विजयला व्यक्तीश: प्राणी अथवा पक्षी पाळायला आवडत नाहीत. विजयला माणसांशी संवाद साधायला आवडते. विजय गावी गेल्यावर फक्त ते एकच काम करतो आणि दुसरे काम हे करतो की निसर्गाच्या सानिध्यात सेल्फी काढतो. विजयचे निसर्गावर प्रचंड प्रेम आहे. निसर्गातील सौंदर्य त्याला नेहमीच आकर्षित करत असते. कदाचित विजयच्या मनात असणारी भौतिक गोष्टींबद्दलची विरक्ती याला कारणीभूत असावी. विजयचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच सकारात्मक होता. तो म्हणजे निरोगी शरीर, दोन वेळ पोटभर अन्न, अंग झाकण्यापुरते कपडे आणि अंग टेकण्यापुरतं छप्पर असलं म्हणजे पुरेसे आहे. पण विजयच्या सभोवतालची माणसे त्याला भौतिक गोष्टीत गुंतवू पाहत होती त्यामुळेच खरं तर त्याच साधं सोप्प जीवन जगणे अवघड झाले होते. विजय खरं तर त्याच्या जगण्यात सुखी होता पण त्याच्या जगण्याकडे पाहून का कोणास जाणे जग दुखी होते. विजय गावी गेला असता उत्साहाच्या आणि उत्सवाच्या भरात त्याची प्रचंड पायपीट झाली ती ही पाय दुखत असताना! मुंबईत आल्यावर पुन्हा पायात वेदना जाणवू लागल्या. होत काय होत. विजयच्या पुढच्या कामाचे सारे मनसुबे तयार झाले होते पण पायाच्या दुखण्यामुळे त्याच मन कश्यात रमत नव्हतं. अगदी अनामिका प्रत्यक्षात दिसल्याचा आनंदातही.  नाहीतर! इतक्यात तिच्या प्रत्यक्ष दिसण्यावर विजयने एक कविता लिहायला हवी होती. विजयाला हल्ली अनामिकेबद्दलही वाईट वाटते कारण त्याचे तिच्यात इतके प्रचंड प्रेम असतानाही तो ते तिच्यासमोर व्यक्त करू शकत नाही आणि ती त्याच्या  प्रेमात पडण्याचा विचारही करू शकत नाही. सारंच अवघड होऊन बसलं होत. नियतीच्या मनात नक्की काय आहे? तेच विजयला कळत नव्हतं. आणि त्याबाबतीत काही घडण्याचे स्पष्ट संकेतही मिळत नव्हते. विजय तिच्या प्रेमात आयुष्य  पुढे ढकलत होता पण तिच्या आयुष्यालाही दिशा मिळत नव्हती. विजय ज्यांच्या ज्यांच्या प्रेमात पडला त्यांना सुखी पाहून सुखी झाला. पण अनामिकेच्या बाबतीत त्याची ओढ काही वेगळीच होती. तो तिच्या इतका कधीच कोणाच्यात गुंतून पडला नव्हता. तिच्यातून बाहेर पाडण्याचे त्याचे प्रयत्नही नियती का कोणास जाणे यशस्वी होऊनच देत नाही. खरं तर विजयच आता प्रेमात पडून वगैरे राहण्याचं वय राहिलेलं नाही. त्याला त्याच्या आयुष्याला आता फक्त एक दिशा द्यायची आहे म्हणजे त्याला वाटत असत आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत तर या मानवजातीसाठी काहीतरी भरीव कार्य करूनच जावं! पण त्यातही नियती त्याला अजून यश मिळू देत नाही.

विजय आज झोपेतच असताना विजयच्या बाबांनी टी. व्हीवर लावलेले प्रवचन ऐकत होता. तसं तो ते नेहमीच करतो. प्रवचन! त्यातून बोध घ्यावा असं विजयासाठी त्यात काय नसत पण प्रवचनात काही दाखले दिली जातात, काही उदाहरणे दिली जातात, काही गोष्टी सांगितल्या जातात त्या विजयला प्रचंड आवडतात. आजची गोष्ट अशी होती की एक राजा ज्याच नाव विजयला आठवत नाही.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..