ईश्वराची बँक

प्रभूंनी बँक काढली    उघडा खाते

ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।।

जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित

दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।।

ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे

धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।।

पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक

जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।।

गरज पडतां धन मिळणे   हे आपल्याच हातीं

परि कामीं येणें पुण्य     हें प्रभूचे इच्छांती  ।।५।।

जमता पुण्याच्या राशी     चांगली कर्मे करुनी

नाते जडतां ईश्वरासी    जाल तुम्हीं उद्धरुनी  ।।६।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1528 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…