नवीन लेखन...

बहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी

“मी पाहिलेला बापू” या पुस्तकाची प्रस्तावना पूज्य समीरसिंह दत्तोपाध्ये यांनी लिहिली असून मांडणी भाषेसाहित मुद्देसूद साधी सरळ अशी आहे.

“मी पाहिलेला बापू” हे पुस्तक कधी एकदा हातात पडते आणि संपूर्ण वाचून काढतो असे झाले होते. कारण या आधीही दैनिक प्रत्यक्ष मधून पुस्तकातील काही लेख वाचण्यात आले होते. परंतू पुस्तकातील काही लेख नवीन आहेत.

पुस्तकाची मांडणी सजावट खूपच छान आणि त्यातील परमपूज्य सद्गुरू बापूंचे काही रंगीत आणि कृष्णधवल फोटो शब्दांच्या पलीकडले आणि काही न बोलताच व्यक्त होतात आणि बरेचं काही सांगून जातात.

“मी पाहिलेला बापू” म्हणजे दुग्धशर्करा योग आणि तो जुळून आणला आहे पूज्य समीरसिंह दत्तोपाध्ये यांनी त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि अम्बज्ञ. या निमित्ताने तरी आम्हांला परमपूज्य बापूंचे लहानपण ते सर्वार्थाने मोठेपण असल्याचे मित्र/मैत्रिणींच्या अनुभवाच्या लिखाणांतून वाचायला व वाचतांना अनुभवतोच आहोत की काय असे वाटायला लागले कारण बापूंच्या सहवासात राहून बऱ्याच जणांना लेखन कसे करावे, विषयाची मांडणी कशी करावी, नेमके आणि सुटसुटीत कसे सांगावे ज्यात सर्व मुद्दे येतील याचे बाळकडू त्यांना त्यांच्या सहवासात मिळाले होते याचाही प्रत्यय ठाईठाई वाचतांना येत होता.

रत्नाच्या आकाराचा विचार करून त्यासाठी कोंदण बनविले जाते परंतू येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी नावाच्या  हिऱ्याला कोंदणात बसवितांना कोंदणचा आकार बदलावा लागत नाही तर स्वत: हिराच कोंदणाच्या आकाराचा होतो.  डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे बालपण म्हणजे जोश्या, डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी ते परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू हा प्रवास विविध कंगोर्यांनी आणि पैलूंनी भरलेला असल्याचे सर्व लेख वाचतांना लक्षात येते. बहुआयामी हा शब्दसुद्धा जेथे फिका पडतो, आणि सर्व विशेषणे कमी पडतात.

पावित्र्य हेच प्रमाण आणि मर्यादेची चौकट अंगी बाणलेल्या डॉ. अनिरुद्ध जोशींचे विविध पैलूंनी भरलेले व्यक्तिमत्व हीच एक मोठी व्याख्या आहे, चौकट आहे, मर्यादा आहे, सत्य, प्रेम व आनंदाने खचाखच भरलेला देवयान पंथ आहे. जीवनाच्या सर्व व्याख्या, पायऱ्या, ध्येय, उद्दिष्ट, आणि मर्यादा येथूनच सुरु होतात असे गर्वाने म्हणावेसे वाटते.

|| ॐ मन:सामर्थ्यदाता श्री.अनिरुद्धाय नम: ||

काही लेखांचा संक्षिप्त आढावा :       

दैनिक मराठा मधून पत्रकारितेची सुरुवात करणारे, आणीबाणीत दैनिक ‘पहारा’ सुरु करणारे, लोकप्रभा आणि संडे इंडियनचे संपादक श्री.प्रदीप वर्मा यांचा ‘बापू’चं वलय…,हा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातून डॉ.अनिरुद्ध जोशी यांची वैचारिक झेप, संघटन कौशल्याबरोबर नवा विचार, नवा दृष्टीकोन देण्याची बौद्धिक क्षमता आणि इतर कार्य बघून ते एकदम अचंबित झाले. डॉ.जोशींनी घडवलेली सुसंस्कृत माणसे जी समाज जीवनात शिस्त निर्माण करणार आहेत आणि या सामाजिक शिस्तीतून उभे राहणार आहे एक राष्ट्र जे जगाचे नेतृत्व तर करेलच पण संपूर्ण मानवजात नष्ट करण्याची ताकद असलेले तिसरे महायुद्धदेखील थोपावेल असा त्यांचा मानस आहे आणि तो खरा आहे.

सौ. पुष्पा त्रिलोकेकर, श्री. प्रदीप वर्मांच्या पत्नी, गेली साडेपाच दशके मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पुष्पाताईंचा लेख ‘प्रिय बापू आगाऊपणा करू का थोडा?” वाचतांना खुपच उपयुक्त माहिती देऊन गेला. डॉ.अनिरुद्ध जोशीं हे “रॅशनल” विचारांचा जोडणारा महत्वाचा दुवा असल्यामुळे सौ.पुष्पाताई त्रिलोकेकर डॉ.जोशीशी जगातील कुठल्याही विषयावर बोलत असतं जसे राजकारण, इतिहास, विज्ञान, धर्मसंकृती, मानवीस्वभाव नी व्यवहारपर्यंत, यातूनच डॉ. अनिरुद्धांचे वेगळेपण आणि वाचनाचा व्यासंग ठळकपणे दिसून येतो.

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..