नवीन लेखन...

दिग्दर्शक अदूर गोपाल कृष्णन

 

अदूर गोपालकृष्णन यांचा जन्म ३ जुलै १९४१ साली केरळमध्ये अदूरजवळ असलेल्या मन्नाडी ह्या खेड्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवन उन्नीथन आणि आईचे नाव मोत्ताथु गौरी कुंजम्मा असे होते. वयाच्या आठव्या वर्षीच अदूर यांनी गावातील छोट्या नाटकांमधून कामे करण्यास सुरवात केली. त्यानंतर कळायला लागल्यावर ते लिहू लागले आणि दिग्दर्शन करू लागले. अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी गांधीग्राम रूरल इन्स्टिट्यूट मधून पोलिटिकल सायन्स अँड पब्लिक ऍडमिन्सट्रेशन चा अभ्यास केला आणि तामिळनाडूमधील दिंडीगुल येथे सरकारी अधिकारी म्हणून काम करू लागले. परंतु त्यांनी १९६२ मध्ये ती नोकरी सोडली. कारण त्यांना पुणे येथील फिल्म इंस्टीट्युटमधून पटकथा आणि दिग्दर्शन यांचा अभ्यास करावयाचा होता. त्यांनी तो अभ्यास पूर्ण केला तो महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती घेऊन .

त्यांनी केरळमध्ये आपल्या मित्रांच्या सहाय्याने ‘ चित्रलेखा फिल्म सोसायटी अँड चलचित्र सहकारणा संगम ‘ संस्था काढली ही केरळमधील पहिली फिल्म सोसायटी होती. चित्रपट निर्मिती , वितरण आणि चित्रपट प्रदर्शित करणे हे त्यांचे उद्दिष्ट्य होते. ह्या त्यांच्या चळवळीमुळे नवीन चित्रपटाची लाट , समांतर चित्रपटांची लाट केरळमध्ये आली, त्या चित्रपटांना ‘ आर्ट फिल्म्स ‘ असेही म्हटले गेले . त्यामुळे जी . अरविंदन , केजी जॉर्ज , पवित्रन , आणि रवींद्रन सारखे दिग्दर्शक निर्माण झाले.

अदूर गोपालकृष्णन यांनी अकरा फिचर फिल्म्सचे पटकथा लेखन आणि दिग्दर्शन केले आहे आणि सुमारे ३० डॉक्युमेंट्रीएस आणि शॉर्ट फिल्म्स तयार केल्या आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘ स्वयंवरंम् ‘ हा १९७२ साली प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. खरे तर हा चित्रपट प्रदर्शित करणे अशक्य होते कारण कोणी निर्माता डिस्ट्रिब्युटर मिळत नव्हता . अदूर ह्यांनी हा चित्रपट कर्ज घेऊन काढला होता. हा चित्रपट केरळमधील महत्वाचा चित्रपट समजला जातो. कारण हा चित्रपट मास्को , मेलबर्न , लंडन आणि पॅरिस येथील आतंरराष्ट्रीय फेस्टिवल्समधून दाखवण्यात आला. तर त्यांचा दुसरा चित्रपट ‘ इलियापथम ‘ या चित्रपटामध्ये केरळमधील ‘ सामंती ‘ समाजाचे पतन दाखवण्यात आले आहे. तर नुकत्याच तीन-चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘ निग़लकत्थू ‘ या चित्रपटामध्ये एका ‘ जल्लादाच्या ‘ जीवनावर आधारित चित्रपट असून त्याचा मुलगा पुढे क्रांतिकारक होतो असे दाखवण्यात आले आहे. कारण ‘ जल्लाद ‘ म्हटले की त्याची प्रतिमा समाजामध्ये वेगळी असते त्या व्यक्तीमत्वाच्या अनेक बाजू या चित्रपटामध्ये दाखवलेल्या आहेत.

अदूर गोपालकृष्ण यांची न्यूयॉर्क टाइम्स पासून अनेक परदेशी वृत्तपत्रांनी प्रशंसा केली आहे. ते म्हणतात चित्रपट करताना सतत डोळे आणि कान उघडे ठेवले पाहिजे, अनुभव घेताना तुमच्यावर अवलंबून असते की आपण या घटनेला किंवा कथेला चित्रपटाचे स्वरूप देऊ शकतो का ते ?
अदूर गोपालकृष्णन यांची कामाची पद्धत खूप वेगळी आहे ते कलाकाराला भूमिकेसाठी वेळ देतात , त्यांच्या तालमी घेतात . त्यांच्यामते कलाकार हा एखाद्या मुलाप्रमाणे असत सतत शोध घेत असतो , स्ट्रगल करत असतो नुसत्या पैशासाठी नाही तर स्वतःच्या नव्या अस्तित्वाच्या शोधात असतो . ते म्हणतात मी दिग्दर्शक तर आहेच परंतु त्याआधी मी प्रेक्षकही असतो . जेव्हा मी प्रेक्षक असतो तेव्हाच ठरवतो एखादी गोष्ट बरोबर आहे का चुकीची.

अदूर गोपालकृष्णन यांची भाषेबद्दलची मते अत्यंत परखड आहेत . ते म्हणतात प्रत्येक भाषा त्या प्रांतात महत्वाची असते मग एकच राष्ट्रीय भाषा कशी ? कारण भारतात अनेक प्रकारची संस्कृती वसलेली आहे . त्यांचाही सन्मान ठेवला गेला पाहिजे.

अदूर गोपालकृष्णन यांनी अनेक डॉक्युमेंटरिज बनवल्या कथकली, मोहिनीयाट्टम , कुडीयाट्टम ह्यावर आधारित आहेत . त्यामुळे एक वेगळा इतिहास कायमचा चित्रित केला गेला. त्या एक सांस्कृतिक ठेवा म्हणून जपल्या जातील.

आज , उद्या आणि भविष्यातदेखील . ते म्हणतात आम्ही ग्रीक थिएटरचा अभ्यास करतो , तो केलाच पाहिजे परंतु आमच्या गोष्टी आम्ही विसरतो किंवा दुर्लक्ष करतो. आजही अदूर गोपालकृष्णन अत्यंत साधे आहेत , त्यांची मुले घट्टपणे केरळच्या मातीमध्ये रुजलेली आहेत आणि ते प्रामाणिकपणे , एकनिष्ठेने त्यांच्या मातीशी , त्यांच्या संस्कृतीशी त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यांचे चित्रपट बघताना त्यांना असणाऱ्या जाणिवांचे भान त्यामधून जाणवते.

अदूर गोपालकृष्णन यांचे जास्त चित्रपट केरळमध्ये प्रदर्शित झालेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांना केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे , भारत सरकारने त्यांना पदमश्री आणि पदमविभूण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. चित्रपट क्षेत्रामधील मोठा सन्मान समजला जाणारा दादासाहेब फाळके सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यांना उत्कृष्ठ दिग्दशक म्ह्णून चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे तर तीन चित्रपटांना सर्वश्रेष्ठ चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे दोन चित्रपटांना उत्कृष्ठ पटकथा लेखकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..