नवीन लेखन...

मदर टेरेसा – दीनदुबळ्यांची आई

ती तिच्या नावाप्रमाणे दीनदुबळ्यांची ‘ आई’ होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे दीनदुबळे लोक कोणत्याही एका विशिष्ट भागाचे, देशाचे वा खंडाचे नव्हते तर संपूर्ण जगातील होते. मानवसेवेचे एवढे मोठे कार्य तिने केले होते म्हणूनच तिला १२७९ सालचे शांततेचे नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आले आणि हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिल्याबद्दल सार्‍या जगातून स्वागत करण्यात आले. ही दीनदुबळ्यांची आई म्हणजेच मदर टेरेसा.

प्रामुख्याने मदर टेरेसा यांनी भारतात कार्य केले असले, तरी साऱ्या जगातील गोरगरीब, निराधार आणि अनाथ लोकांची ती देवदूत होती. मदर टेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी युगोस्काव्हियामध्ये एका श्रीमंत शेतकरी कुटुंबात झाला. बालपणीचे त्यांचे नाव आग्रेस वोयान्हिवू होते. शाळेत शिकत असतानाच आग्रेस गोरगरिबांची सेवा करणाऱ्या व्हेस्ट वर्जिन मेरी या संस्थेच्या कामामुळे प्रभावित झाली होती. तेथील चर्चमध्ये भारतीय मिशनरींकडून काही पत्रे यायची. त्या पत्रामुळे त्यांना भारताबद्दल विशेषतः बंगालमधील मिशनरी कार्याबद्दल आकर्षण निर्माण झाले.

अखेर ६ जानेवारी १९२९ रोजी त्यांची भारतात येण्याची इच्छा पूर्ण झाली. दाजिलिंगमध्ये त्यांना प्रारंभीचे प्रशिक्षण देण्यात आले. या काळात त्यांनी हिंदी व बंगाली भाषा आत्मसात केल्या. १९३१ मध्ये त्या धर्मोपदेशिका (नन) झाल्या व गोरगरिबांच्या सेवेचे त्यांनी व्रत स्वीकारले. त्यासाठी त्यांनी १९ व्या शतकातील फ्रान्समधील प्रसिद्ध नन टेरेसा डी. लिसियू यांच्या नावावरून आपलेही नाव टेरेसा ठेवले. गोरगरिबांची सेवा करण्याच्या आपल्या कार्याचा त्यांनी विस्तार करून सहा वर्षांतच आपले मदर टेरेसा हे नाव सार्थ केले. झोपडपट्टीतील गरीब लोक, निरीक्षर मुले, भिकारी, रोगपीडित आणि वृद्ध नागरिक यांना भावंडे समजून त्यांनी त्यांची सेवा केली.

त्यांच्यासाठी जणू त्या ईश्वरी अवतार होत्या. जगात अनेक ठिकाणी विविध संस्था स्थापन करून त्याद्वारे त्यांनी समाजकार्य सुरू केले व त्यांच्या या कार्याला संपूर्ण जगातून मान्यता मिळाली. या कार्यामुळेच त्यांना १९७९ साली शांततेचे नोबेल पुरस्कार मिळाला. मदर टेरेसा पहिल्यापासूनच राजकारणापासून दूर राहिल्या. १९८० साली मदर टेरेसा यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ५ सडेबर १९९७ रोजी मदर टेरेसा यांचे हृदयविकाराने निधन झाले. शासकीय इतमामाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी जगातील प्रमुख नेते, अधिकारी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..