नाच ….

का रे पडतोस तू असा ? माझे घर जाते ना कर्दमून, अन छत लागते की ठिबकाया !
ओलेत्या अंगावर ल्यावे लागते ओलेतेच धडूते, ज्याची आधीच गेलेली असते रया !
पाणी झिरपते कुडातून, सरपण जाते चिंब भिजून अन चूल बसते डोळे मिटून !
गळक्या छपराखाली पातेले पडते अडकून, सांग आता सैपाकास भांडे आणू कुठून ?
एकच गोधडी तू तिलाही न सोडी, एकच दंड घातलेली सतरंजी अन तुझी त्यावरही रुंजी !
तुटक्या फडताळाचे जीर्ण लाकूड जाई कसे फुगून, चिखलाने तुझ्या मोरी जाते की तुंबून !
दप्तर ओले होता अक्षरं जाती मिटून, तूच सांग आता देईल अभ्यास कोण लिहून ?
सारवण जाते वाहून अन पाय जाती भेगाळून, नेणार नाही कोणी ओझे माझे वाहून.
पडतोस ते पडतोस अन गर्जनाही करतोस, सानुला रे भाऊ माझा जातो की घाबरून !
येतोस तू खुशाल रे मेघांना झाकळून अन आयुष्य माझे इथे हवेत जाते की सादळून.

असते जर माझेही आईबाबा, तर तुझ्या थेंबाथेंबात मीही नाचले असते की भरभरून !!!

– समीर गायकवाड.About समीर गायकवाड 155 Articles
समीर गायकवाड हे अनेक विषयांवर इंटरनेटवर लेखन करत असतात. त्यांचे लेखन अतिशय वास्तववादी असते. गायकवाड यांना विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते जसे वैचारिक लेखन करतात तसेच चित्रपटांची परिक्षणेही लिहितात. समीर गायकवाड हे सोलापूरचे रहिवासी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…