नवीन लेखन...

क्रिकेटपटू जिम लेकर

जेम्स चार्लस लेकर म्हणजे जिम लेकर यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२२ रोजी इंग्लंडमध्ये झाला. जिम लेकर नाव म्हटले की डोळ्यासमोर येतो तो ओल्ड ट्रॅफर्ड वरचा सामना. ज्यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९५६ मध्ये १९ विकेट्स घेतल्या होत्या. ते राईट हॅन्ड ऑफ ब्रेक टाकून गोलंदाजी करत असत. खरे तर ते यॉर्कशायर कौंटी क्रिकेट क्लब खेळ असताना फलंदाज म्हणून बोलवले गेले. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांच्या खेळण्यांमध्ये खंड पडतो. दुसऱ्या महायुद्धानंतर ते यॉर्कशायरच्या परवानगीने ‘ सरे ‘ मध्ये खेळू लागले.

१९४७ -४८ मध्ये ते वेस्ट इंडिजविरुद्व खेळले तेव्हा त्यांनी पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये १०३ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या. जिम लेकर हे २८ वे इंग्लंडचे गोलंदाज होते ज्यांनी पहिल्याच कसोटी सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेतल्या. जिम लेकर यांनी इंग्लंड विरुद्ध ‘ ऑफ इंग्लंड ‘ यणाच्यात झालेल्या ३१ जुलै १९५० च्या सामन्यांमध्ये जिम लेकर यांनी ‘ रेस्ट ऑफ इंग्लंड ‘ यांच्या ८ खेळाडूंना २ धावामध्ये बाद केले त्यावेळी त्यावेळी जिम लेकर यांनी १४ षटकांमध्ये १२ षटके निर्धाव टाकली. ह्या सामन्यामध्ये ‘ रेस्ट ऑफ इंग्लंड ‘ चा संघ २७ धावामध्ये सर्वबाद झाला. त्या सामन्यांमध्ये फक्त ३६ षटके टाकली गेली.

आज आपल्याला अनिल कुंबळे यांचे नाव माहीत आहे, ते त्यांनी घेतलेल्या झुंजार, चिवटपणे पाकिस्तानी संघाच्या एक ईनिंग मध्ये घेतलेल्या १० विकेट्समुळे. अनिल कुंबळे यांनी हा पराक्रम १९९९ मध्ये केला परंतु जिम लेकर यांनी हा पराक्रम इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या संघामध्ये ओल्ड ट्रॅफर्ड मध्ये झालेल्या १९५६ च्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये केला तेव्हा त्यांनी ५३ धावा देऊन ऑस्ट्रेलियाचे १० खेळाडू बाद केले.त्याच सामन्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये जिम लेकर यांनी ३७ धावा देऊन ऑस्ट्रलियाचे ९ खेळाडू बाद केले, त्यांनी ९० धावांमध्ये १९ खेळाडू बाद केले तेही एकाच कसोटी सामन्यांमध्ये. म्हणजे जिम लेकर यांनी एकाच सामन्यामध्ये २० पैकी १९ खेळाडू बाद केले. हा त्यांचा विक्रम आत्तापर्यंत अबाधित आहे. भारतीय संघामध्ये अनिल कुंबळे त्यांच्याआधी एक इनिंगमध्ये ९ विकेट्स घेण्याचा पराक्रम १९५९ मध्ये जसू पटेल यांनी केला होता तर सगळ्यात आधी हा विक्रम इंग्लंडच्याच टेड बर्राट यांनी २ सप्टेबर १८७२ रोजी ओव्हल वर ऑस्ट्रेलिया विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये केला होता. टेड बर्राट यांनी ४३ धावा देऊन एक इंनिंग मध्ये १० विकेट घेतल्या होत्या. टेड बर्राट यांनी त्यांच्या फर्स्ट क्लास क्रिकेट कारकिर्दीमध्ये १५३ सामन्यांमध्ये ७९० विकेट घेतल्या तर ६९ वेळा एक डावात ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू बाद केले होते.

जिम लेकर हे त्यांचा शेवटचा सामना १८ फेब्रुवारी १९५९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळले. त्यांचे आत्मचरित्र आले परंतु त्यामध्ये सरे आणि इंग्लंडचा कप्तान पीटर मे यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांची सरे आणि एम. सी. सी. ची सन्माननीय मेंबरशिप संपुष्टामध्ये आली. त्यांनतर ते काही सामने त्यांच्या इसेक्स तर्फे खेळले. त्यांनी त्यानंतर क्रिकेट सामन्याचे समालोचन बी.बी.सी. आणि अन्य ठिकाणी केले.

जिम लेकर यांची खेळाची कारकीर्द आणि त्यांनी केलेल्या खेळाचे आकडे बघूनच त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होते. त्यांनी ४६ कसोटी सामन्यांमध्ये १९३ विकेट घेतल्या आणि ६७६ धावा काढल्या. कारण ते प्रमुख गोलंदाज होते. त्यांनी एक इनिंगमध्ये ९ वेळा ५ आणि त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या. त्यांच्या गोलंदाजीची सरासरी होती २१.२४. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये तर त्याहून कमाल केली. ४५० फर्स्ट क्लास सामन्यामध्ये त्यांनी ७, ३०४ धावा केल्या आणि तब्बल १,९४४ विकेट्स घेतल्या. त्यांची गोलंदाजीची सरासरी होती १८.४१. गोलंदाजीमध्ये सरासरी जितकी कमी तितका गोलंदाज मोठा मानतात. ह्या १,९४४ विकेट्स साठी त्यांनी १,०१,३७० चेंडू टाकले.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही त्यांनी एकूण १२७ वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडू एका इनिंगमध्ये बाद केले. आणि इथेही ५३ धावा देऊन १० खेळाडू एक डावामध्ये बाद केले आहेत. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये २७० झेल पकडले आहेत.

जिम लेकर जिथे फेमहिल एरियामध्ये रहात होते त्या वेस्ट यॉर्कशायर येथील ‘ शिप्ले ‘ या विभागाला ‘ जिम लेकर प्लेस ‘ म्हणून संबोधले जाते.
२३ ऑगस्ट २००९ रोजी जिम लेकर, जॅक हॉब्स आणि लेन हटन यांचा ‘ आय. सी.सी. हॉल ऑफ फेम ‘ मध्ये समावेश करण्यात आला.

अशा इतिहास घडवणाऱ्या खेळाडूचे २३ एप्रिल १९८६ रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी लंडन येथे निधन झाले.

— सतीश चाफेकर. 

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..