नवीन लेखन...

ठाण्यातील क्रिकेट..काल आणि आज

क्रिकेट म्हटले की माणूस सगळे काही विसरून जातो. परंतु हे क्रिकेट काल कसे होते आणि आज कसे आहे हे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागू शकतो. परंतु एका शहराचे आणि क्रिकेटचे काय नाते आहे ह्यासाठी शोध घेण आवश्यक ठरते. श्री. दत्तात्रय नीलकंठ उर्फ बाबुराव कर्णिक याचे ठाण्यातील क्रिकेटवरील जुने पुस्तक हाती आले आणि खजिनाच हाती लागला. ठाण्यात त्यावेळी जवळजवळ २८ संघ ठाण्यात तयार झाले होते. त्यात ठाणा यंग क्रिकेटर्स, फ्रेंड्स युनियन, आनंद भारती, बी. जे. हायस्कूल, एम. एच. हायस्कूल, झोरास्टीयन, ठाणा यंग स्टार्स असे अनेक संघ होते. त्यावेळी तेरेदेसाई क्रिकेट टूर्नामेट होत.ही टूर्नामेट सुरु केली ती के.टी.मंत्री यांनी, के.टी. मंत्री हे क्रिकेटपटू माधव मंत्री याचे वडील. ही टूर्नामेट अत्यंत भरभराटीस आली त्यावेळी म्हणजे १९३५ ते १९४० च्या सुमारास. त्यावेळी ठाण्याची लोकसख्या अंदाजे ३०००० होती. सामना बघण्यासाठी सुमारे २००० लोक सेन्ट्रल मैदानावर येत असत. त्यावेळी सेन्ट्रल मैदान आजच्यासारखे नव्हते. दोन्ही बाजूला रागेने गर्द छाया देणारी अशोक, पारबा, आंबा, वड, पिपळ याची झाडे होती. आत्ता तर त्याचे दोन भाग झाले आहेत. सुमारे १९३१ साली ‘ तिथल्या Pavlovianच्या इमारतीची निर्मिती झाली. त्यातील प्रत्येक क्लबमध्ये अनेक खेळाडू होते. टी.वाय.सी. मध्ये राम देशपांडे, भालू गुप्ते, जया प्रधान, बंडू जोगळेकर, बाळू जोगळेकर, चंदू टिपणीस, अजंता पाटील हे होते.

तेरेदेसाई मेमोरिअल भर जोमात असताना १९३४ साली सामने ” लीग सिस्टीम ” वर झाले. नाहीतर बाकीचे हे सामने ” नॉक आउट ” पद्धतीवर खेळले गेले.ठाण्यातील एक सर्वोत्तम खेळाडू श्री. राम भावे यांनी तेरेदेसाई मेमोरियलचे सामने लीग पद्धतीवर खेळले पाहिजे असे सुचवले. त्यावेळी एम. एच. हायस्कूल मधून दत्तू गावंड.., सीना खारकर, वसंत आगासकर, विठोबा कोळी, गप्प्या अभ्यंकर, एन. टी. केळकर, ए. एम. जोशी, एस. पी. कानिटकर, पंडित ओंक,माधव गुप्ते आणि सदू सातघरे. विठोबा कोळी उत्तम तुफानी गोलंदाज होता. तो गोलंदाजीची बाजू साभाळत असे. शाळेनतर आनंदभारती या संघातून खेळला आणि गप्प्या अभ्यंकर लहान वयातच शाळेतर्फे खेळू लागला. शाळेतून चार वर्षे खेळला, बर्यापैकी केली. त्यानंतर तो चित्रपटसृष्टीमध्ये गेला तो ‘ विवेक ‘ या नावाने, त्याने अनेक चित्रपटामधून कामे केली. त्याच्यावर चित्रित झालेले पी. सावळाराम याचे ‘ जेथे सागरा धरणी मिळते….” हे गाणे अजूनही लोकप्रिय आहे. तर पारशी समाजाने अनेक ब्रिटिशांच्या अनेक गोष्टी यांनी अनेक गोष्टी स्वीकारल्या आहेत क्रिकेट पण त्यातलेच. तेरेदेसाई मेमोरिअल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कितीतरी आधी पारशी मुलाचा ‘ पारशी युनियन ” नावाचा क्लब खेळत होता. पुढे या संघात इतर चागले खेळाडू मिळाले त्यात हेन्री रेमीडीयस-इलायास परेरा -तात्या वैद्य -पाडू कोळी या खेळाडूचा समावेश झाल्यानंतर या संघाचे नाव ‘ कॉस्मापौलेटीन ‘ असे बदलण्यात आले. आणखी सातआठ वर्षानंतर या संघाचे आपले नाव ‘ झोरास्ट्रीयन ” असे बदलून सर्व पारशी खेळाडूनाच वाव देला. त्यात डी.पी. तट, के.के.तारापोरवाला, एच. ए. प्रिंटर, बमनशा तारापोरवाला, तारापोरवाला, गुस्ताद इराणी, एच. पी. टाटा, रुस्तम तारापोरवाला असे अनेक होते. त्याचेवेळी ‘ ठाणा बार ‘ नावाचा संघ होता हा ठाणे शहारामधील वकिलाचा संघ होता त्यात श्री.एम. एन. सबनीस,श्री. माधव हेगडे, श्री. सी.टी. रणदिवे, श्री.सी.टी. रणदिवे, श्री. जे.पी. पागनीस, डी.एम. नाडकर्णी, श्री. के.एन.कोतवाल, श्री. गोपीनाथ सिंधकर, श्री.डी. के. देशपांडे, श्री. द.सं. ओवालेकर इत्यादी होते.

त्यामध्ये खंडू रागणेकराचा स्वतःचाच संघ म्हणता येईल असा संघ होता ‘ ठाणा यंग स्टार ‘ नावाचा संघ. खंडू रांगणेकर याच्याबद्दल सर्वांनाच माहेत आहे, त्याचे चौफेर फटके सर्वश्रुत आहेतच त्याचे हे फटक्यावरचे प्रभुत्व आणे वर्षे ठाणेकरांनी पाहिले. या संघात के. आर. कोळी, गोप्या मुळे, वामन कोळी,शिवराम कोळी, टी. जे. कोळी,महादेव कोळी,डी. एच. कोळी, जे.एस. देशपांडे, हे होते. ह्या संघाची खरी मदार खंडू रांगणेकर याच्यावर होती.

आणखी एक महत्वाचा संघ म्हणजे आनंद भारती हा संघ ठाण्याच्या रेल्वे पुलाकडील कोळी समाजाची हे संस्था, ठाण्याच्या तेरेदेसाई मेमोरिअल स्पर्धेत या समाजातील खेळाडूंनी काही खेळाडूंनी चागलेच नाव काढले. जॉली चेंदणी क्लब या सस्थेतूनही काही जण केह्लात होते. त्यात यशवंतराव नाखवा कर्णधार होते ते आनंदभारतीचे संस्थापक होते.उत्तम फाल्दाजी करीत. खेळावर त्याचे फार प्रेम. कोळी समाजामधील समाजामधील संपूर्ण शाकाहारी माणूस म्हणून लोक त्याचे विशेष कौतुक करत. धोतर घालून खेळायचे. सन्मान्य नागरीक, नगरपिते, सन्मानीय मेजिस्ट्रेट म्हणून सर्वाना परिचित. त्याचप्रमाणे शात्या कोळी हे संघाचे सलामीचे तुफानी फलंदाज. धोतरातच खेळायचे त्याच्यासारखा तीव्र गतीने आट्यापाट्या खेळणारा गावात झालाच नाही. नामदेव कोळी, अंपु वढावकर हे कायस्थ प्रभू ज्ञातीचे पण आनंद भारती या संघातून खेळायचे.या संघातून शंकर कोळी, के. आर. कोळी, मोरया कोळी, डी.जी. ठाणकर, वामन कोळी, शिवराम कोळी, महादेव कोळी, विठोबा कोळी हे होते त्यातला महत्वाचा गोलंदाज म्हणजे अंपू वढावकरच. तर बी.जे. हायस्कूल मध्ये बाबू आग्रे, विष्णू पाटील असे अनेक होते. तर न्यू हिंदूज मध्ये दत्तू किलजे, तात्या वैद्य, व्ही.जी. नवरंगे, हिरा कोळी, बाबू हेगडे, एस. बी. क्न्होला, अंतू कोतवाल,मधु गुप्ते आहे खेळाडू होते. असे अनेक क्लब ठाण्यात होते आणि अनेक खेळाडू त्यामध्ये वसंत नाखवा, प्रभाकर हेगडे, वसंत कर्णिक, बाळू गुप्ते हा भालू गुप्ते याचा भाऊ, बाबू तेली,शेख हा सुभेदाराचा मुलगा. उत्तम फलंदाज. सेन्ट्रल मैदानावरून त्याने असा षटकार मारला की चेदूचा पहिला टप्पा किल्याच्या तळ्यात पडला होता. कदाचित हा विक्रम कोणीही मोडलेला नाही.त्याचप्रमाणे भुऱ्या लगड, मेहेरबान ठाणावाला, रुस्तम राजा, आचार्य मो.वा.दोंदे, डॉक्टर टी. वेल्स हे अध्यक्ष असतानाच ठाण्याचा जिमखाना झाला.बाबुराव तासकर,डॉक्टर एस. व्ही. सामंत, डॉक्टर बी.जी.सामंत,बाबू गुप्ते अशी आघाडीची मंडळी होती. तर रेमंड कंपनीच्या मैदानवरदेखील सामने होत असत. त्यात मोहिंदर अमरनाथ,सलीम दुराणी, खंडू रांगणेकर असे दिग्गज खेळले आहेत त्याचप्रमाणे संदीप पाटील, एकनाथ सोलकर हे देखील सेन्ट्रल मैदानावर खेळले आहेत. पुढे दादोजी कोडदेव मैदानावर स्टेडीयम झाल्यावर सुनील गावस्कर, सचिन तेंडूलकर, रौजर बिन्नी असे अनेक नामवंत खेळाडू खेळले आहेत. दादोजी कोंडदेवची खेळपट्टी तयार केली ते गणपत भाड यांनी अजित वाडेकर याच्या मार्गदर्शनाखाली.

हे कालचे क्रिकेट बघताना वेगळे वाटते, त्यानंतर हेमू अधिकारी,खंडू रांगणेकर यांनी विशेष नाव मिळवले. हेमू अधिकारी हे मुळचे ठाण्याचे नाहीत. त्याचे जावई ठाण्यात रहात. ते गेले तेव्हा त्याचे पार्थिव ठाण्यात आणले होते, इतका मोठा खेळाडू पण अंत्ययात्रेला हाताच्या बोटवर मोजता येतील इतके लोक होते त्यात तुकाराम सुर्वेही होते. तर तुकाराम सुर्वे रणजी खेळाडू आणि कोच म्हणून सुपरिचित आहेतच, त्यांनी सर्वप्रथम इथली मुले इंग्लंडला खेळायला नेली, अनेक वर्ष इथल्या टीम्स ते नेट होते.तुकराम सुर्वे हे खऱ्या अर्थाने ठाण्याचे भूषणच म्हणावे लागेल. ते वयाच्या ४४ वर्षापर्यंत रणजी सामने खेळत होते. ते ४८ रणजी सामने खेळले. त्यावेळी सर्व राज्याचे सामने होत नव्हते. ते शेवटचा सामना खेळले वयाच्या ६८ व्या वर्षी तेव्हा त्यांनी १०५ धावा केल्या.माफतलाल चा सनाग त्यांनी निवडला त्यातले १२ खेळाडू टेस्ट सामने खेळले.त्यावेळी ते ठाणे फ्रेंड्स क्लब मधून खेळायचे त्यात जयंतीलाल, शरद दिवाडकर, आनंद धामणे, विजू गोधळे हे रणजीपटू होते. कोचबद्दल त्याची मते खूप परखड आहेत, ते म्हणतात कोच हा गाईड, मार्गदर्शक असतो, जे करायचे आहे ते खेळाडूच करत असतो. ते म्हणतात खेळाडूकडे डिझायर आणि व्हिजन पाहिजे. त्याचप्रमाणे गोविंद पाटील, लालसिंग सुर्वे हे देखील कोच म्हणून सुविख्यात आहेत. अवि सुळे उत्तम गोलंदाज होते पुढे ते अनेक वेळा भारतीय संघाचे अनेक वेळा व्यवस्थापक होते दोन वर्षापूर्वी अवि सुळे याचे निधन झाले. त्यानंतर आविष्कार साळवी, सुलक्षण कुलकर्णी, रवि कुलकर्णी { त्या वेळी ते कळवा येथे राहत होते }, अभिजात खारगे,मयूर कद्रेकर, काळूराम,संग्राम बागुल अशी नावे घेता येतील. त्याचप्रमाणे दिलीप रणदिवे याचेही नाव घेता येईल, दुर्देवाने क्षमता असूनही त्यांना राष्ट्रीय पातळीवर, आपल्या संघाकडून खेळता आले नाही, हे ठाण्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. क्रिकेट मध्ये जरतर कधीच नसते तरीपण मी हे सांगत आहे.

आज मात्र दोन मैदाने आहेत एक दादोजी कोंडदेव आणि सेन्ट्रल मैदान परंतु मुलांना याचा किती फायदा होत हे बघणे महत्वाचे. मुंबईच्या तुलनेत नगण्यच म्हणावे लागेल. तरीपण किरण साळगावकर, विजय इंदाप, बलाशीती, शाही नायक, अजय कदम हे कोच सतत प्रयत्नशील आहेत हे महत्वाचे. पिलू रिपोर्टर, एम. वाय. गुप्ते यांनी टेस्ट सामन्यात अम्पायारिंग केले आहे त्याचप्रमाणे विनीत गुप्ते, राजेश देशपांडे हे देखील अम्पायरींग करत आहेत. ठाण्याचे सुधीर वैद्य हे जगप्रसिद्ध आकडेतज्ञ सुपरिचित आहेतच हल्ली ते पुण्यात राहतात. नवीन पिढीमध्ये सुबोध वैद्य याने स्कोअरर म्हणून आ. पी. एल. पासून ते टेस्ट सामने, रणजी सामने केले आहेत तो धडाडीचा स्कोअरर म्हणून सुप्रसिद्ध आहेच. त्याचप्रमाणे मुंबई मधील सी.सी.आय. मध्ये असलेल्या लिजेन्ट्स क्रिकेट क्लबचा खंदा कार्यकर्ता आहे.

समीर सुर्वे कोचिंग करत होते पण सध्या त्यांनी ते बंद केले आहे. आजचे क्रिकेट खूप बदलले आहे निदान ठाण्याचे. करण मैदाने उरली नाहीत. सेन्ट्रळ मैदानावर शशी नाईक जीवापाड मेहनत करत आहेत. आज आपल्याइथल्या मुलामध्ये टेलेंट आहे पण कुठेतरी राजकारण खेळले जाते असे म्हटले जाते. एखादा कोच मुलाला शिकवत असतो, तो कष्ट करत असतो परंतु तो त्याचा ताबा सोडायला तयार नसतो किवा मुबईच्या एखद्या क्लबमध्ये आपल्या मुलाने जावे असे त्याला मनापासून वाटत नाही असे दिसते अर्थात यला काही अपवाद असतीलही. परंतु इथे चमकणारा मुलगा आपल्याला हल्ली मुंबईकडून किवा देशाकडून खेळताना दिसत नाही अजिक्य रहाणे हा मुळचा डोंबिवलीचा तर आत्ताचा जागतिक १००९ धावाचा विक्रम करणारा प्रणव धनावडे वरळी स्पोर्ट्स क्लबतर्फे २३ जुलैला इंग्लंडला जात आहे.त्याची खरी परीक्षा तेथेच आहे.

खेळाडूना अर्थात खर्च देखील परवडला पाहिजे. साधा क्रिकेटचा कीट घ्यायचा म्हटला तरी कमीतकमी ८००० रुपये पाहिजेत. काही मुले घेतात पण ती कुठपर्यंत पोचतात हे महत्वाचे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ येथे टेलेट खूप आहे परंतु प्रश्न पैशाचा आणि कोचच्या मनोवृत्तीचा आहे. आपला मुलगा आपल्याकडून गेला तरी चालेल कारण दुसरीकडे त्याचे भलेच होणार आहे ही वृत्ती पाहिजे. खूप काही लिहिण्यासारखे आहे, सध्या मार्केटींगचेही दिवस चालू आहेत इतके म्हटले तर गर्भितार्थ कळेलच. तूर्तास ठाण्यामधून देशाला चागला क्रिकेटपटू देण्याची जबाबदारी कुणाची आहे हे संबधितांनी लक्षात घेतले पाहिजे. आज मैदाने नाहीत जी आहेत त्याची अवस्था काय आहे हे सर्वाना माहित आहे तरीपण अपेक्षा करायची की देशाला ठाण्यातून एखादा खेळाडू द्यायचा खरे पहिले तर हे हास्यास्पदच आहे, पण अपेक्षा करायला काय हरकत आहे.डोम्बिवालीमधील निलेश कुलकर्णी, अजिक्य रहाणे नंतर ठाण्यातून कोण याचा शोध सुरू आहे म्हणण्यापेक्षा नवीन मुले तयार होत आहेत नुकतेच दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदान नीट केले आहे आज ना उद्या रणजी सामने खेळवले जातील, फक्त परत खर्च करून तयार केलेले मैदान, स्टेडियम नीट संभाळणे महत्वाचे आहे, कारण मैदानापेक्षा अनेकांचा ‘ आ ‘ मोठा असतो, काही बिचाऱ्याना मोकळी जागा दिसली की जीव घुसमटतो अशांना वेळीच दणका देणे आवश्यक असते. गावदेवी मैदान हे देखील महत्वाचे आहे, ते आता मैदान रहाते का कुणाचा ‘ आ ‘ मैदानापेक्षा मोठा होतो ते महत्वाचे आहे तेथे जे काही करत आहेत ही निव्वळ नसलेल्या बुद्धीची बौद्धिक दिवाळखोरी आहे असे जाणवते. इतके करून मैदान परत दिसले तर ठीक नाहीतर आ आ आ आणि आ असेच म्हणावे लागेल. हा लेख आता सोशल मिडियावर टाकल्यावर माझे ठाण्याचेच स्कोरर मित्र सुबोध वैद्य यांनी मला बहुमूल्य माहिती दिली ती लिहीत आहे. ठाण्याच्या क्रिकेटमध्ये दिलीप मुल्हेलकर, सदा भिसे ह्यांची नावे महत्वाची होती. दिलीप मुल्हेलकर यांचे नुकतेच निधन झाले. त्याचप्रमाणे कौस्तुभ पवार, ओंकार साळवी रेलवेसाठी खेळला तर वर्षा नागरे ही आधी मुंबईसाठी खेळली, नंतर ती स्कोअरंर झाली तिने बी सी सी आय साठी तिने आय पी एल, रणजी, एकदिवसीय सामन्यात स्कोअरिंग केले, सध्या ती बे सी सी आय सामना अधिकारी आहे. त्याचप्रमाणे अखिल हेरवाडकर अंडर १९ वर्ल्ड कप खेळला तसेच रणजी पण खेळला.तर प्रणव जोशी बी सी सी आय चा पंच आहे, तो अत्यंत होनहार आहे पुढे खूप प्रगती निश्चित करेल.त्याचप्रमाणे आता सुबोध वैद्य तर स्कोअरिंग करत आहे,सुदेश पुराडकर, किशोर लवणे ठाण्यातील असून सध्या ते गोव्यात स्कोअरिग करतात, त्यानेही आय पी यएल रणजी, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्कोअरिग केलेले आहे. तर अखिल मुलाचा ठाण्याचा नव्हता तर तो आता ठाण्यात रहातो.

एखादे नाव राहिले तर क्षमस्व.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..