नवीन लेखन...

चमत्कारिक औषधी वनस्पती अगस्त !

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, ‘भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत. महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करायोगच ठरेल. मला मुळात हे सांगायचे आहे की, मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जागतिक स्पर्धा वाढली असतांना भारतीय शेतकऱ्यांनी काळानुसार पावले उचलून व जगातिक बाजारपेठेचा विचार करून शेती उत्पादन घ्यावे. भारतीय शेतकऱ्यांना शेतीमध्ये अधिक उत्पन्न देऊ शकणाऱ्या वनस्पतींपैकी एक म्हणजे अगस्त होय.

ह्या चमत्कारिक वनस्पतीचे नावे पुढील प्रमाणे- कुळनाव – Fabceae
Latin name – Sesbania grandiflora (L ). Pers संस्कृत नाव-अगस्त्य, मुनिद्रम मराठी नाव-अगस्त, अगस्त, हदगा, हेटी हिंदी नाव-अगस्तीया, अगस्त English name-Sesban अशी विविध नावे आहेत.
ह्या वनस्पतीबाबत प्राचीन ग्रंथांमध्ये पुढील उल्लेख आढळतात :-
” वृषागस्तयो: पुष्पाणि तिक्तानि, कटूविपकानि क्षयाकासहरानि च | अगस्तयं नातिशितोष्णम नक्तान्धानां प्रशस्यते || (सुश्रुतसूत्र. )
” अगस्ती पुष्प चूर्णेन माहिषमं जनयेददधि | तदुत्थनवनीतेन देहजं स्फुटनं जयेत || (भावप्रकाश )

अगस्त चे वृक्ष भारतात सर्वत्र पहावयास मिळते.जवळ पास २०० फुट पर्यंत वाढणारे हे वृक्ष शेताच्या बांधावर सहज लावता येते. या झाडाला शरद ऋतुत फुले येतेत जी पांढऱ्या रंगाची असतात. झाडाला शेंगा हिवाळ्यात येतात. फुलांची व शेंगांची भाजी बनवून खातात जी डोळ्यांना फायदेशीर असते.
रासायनिकघटक :- याच्या सालीत पैनीन आणि एक रक्तवर्णीय निर्यास असते. पानांमध्ये प्रोटीन, कैल्शियम, फास्फोरस, लोह तसेच विटामिन ‘अ’ ‘ब’ ‘क’ असते. फुलांमध्ये विटामिन ‘ब’ आणि ‘क ‘ आणि प्रोटीन असते. शेंगातील बियांमध्ये जवळपास ७० टक्के प्रोटीन व एक तेल असते.

उपयोग :- मिरगी, अर्धाशिरी, सर्दीपडसे, नेत्रविकार, अश्वस्थता, पोटदुखी, बद्धकोष्ट, श्वेतप्रदर, ज्वर, मुर्च्छा, लहान मुलांचे विकार, शरीरांतर्गत फोडे फुन्सी, रक्तस्त्राव आदी विकारांवर उपयोगी आहे. त्याशिवाय ही वनस्पती बुद्धीवर्धक, पित्तनाशक, त्रिदोषनाशक, पौष्टिक व शक्तिवर्धक आहे. वापर करतांना मात्र जाणकार व तज्ञ व्यक्ती कडूनच मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे . ह्या वनस्पतीचे उत्पादन घेतांना व्यावसायिक दृष्टीकोनही समोर ठेवला तर जास्त फायद्याचे ठरू शकते .

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..