या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अभिनेत्री सारिका

सारिका यांचे पूर्ण नाव सारिका ठाकूर. अभिनेत्री सारिका यांचा जन्म ५ डिसेंबर १९६० रोजी झाला. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या […]

बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी

वेगवेगळ्या भूमिकांनी रुपेरी पडदा गाजविणारे बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९४९ रोजी झाला. बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार झाले आहेत ज्यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता बोमन इराणी. हरहुन्नरीने अभिनय करणारे बोमन इराणी आज प्रत्येकाचे आवडते कलाकार असल्याचं पाहायला मिळतं. आजही ते त्याच जोमाने अभिनय करुन प्रेक्षकांना प्रेमात […]

विनोदी अभिनेता देवेन वर्मा

अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या. देवेन वर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते. […]

पहिल्या भारतातील बोलपटाचे जनक अर्देशीर इराणी

अर्देशीर इराणी याचे पूर्ण नाव खान बहादूर अर्देशीर इराणी. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १८८६ रोजी झाला. अर्देशीर इराणी यांनी भागीदारीत १९१४ मध्ये लोहारचाळ येथे अलेक्झांड्रा थिएटर घेतले. अर्देशीर इराणी यांच्याकडे ‘युनिव्हर्सल पिक्चर्स कॉर्पोरेशन’ या विदेशी सिनेवितरण कंपनीची एजन्सी होती. तेथे ते विदेशी चित्रपट प्रदर्शित करत. तेथे लागणारे बहुतेक इंग्रजी चित्रपट हे हाणामारीने भरलेले देमारपट, युध्यपट, स्टंट […]

मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर

मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्‌एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. आणि तेथे […]

बॉलिवूडचे प्रसिध्द गायक उदित नारायण

आज बॉलिवूडचे प्रसिध्द गायक उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव उदित नारायण झा. त्यांच्या वडिलांचे नाव किशना झा आणि आईचे नाव भुवनेश्वरी झा आहे. उदित यांनी पी.बी शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ नेपाळमध्ये मॅथिली आणि नेपाळी लोकांचे गाणे गाऊन करिअरची सुरुवात केली. उदित यांची गायन करिअरची सुरुवात ‘सिंदूर’ या नेपाळी […]

अजित सातघरे… गाण्यातील माणूस….

हा अजित सातघरे कोण ? अनेकांना प्रश्न पडला असे , याला पाहिले नाही कधी टीव्ही वर, कधी ऐकले नाही. तरीपण ह्या माणसाची ओळख करून देणार आहे एक गाण्यामधील आनंदयात्री म्हणून. […]

थोर मराठी कवी व लेखक बा.सी.मर्ढेकर

थोर मराठी कवी व लेखक बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. […]

जेष्ठ गायीका सुधा मल्होत्रा

जेष्ठ गायीका सुधा मल्होत्रा यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३६ रोजी झाला. लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या प्रभावाच्या काळात सुद्धा सुधा मल्होत्रा यांनी स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. सुधा मल्होत्रा यांनी अनेक हिंदी चित्रपट गीते गायली. तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड – किशोर कुमार […]

डॉ. सुहासिनी कोरटकर

भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानगुरू, बंदिशकार आणि विचारवंत डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजी झाला. डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण खरे म्हणजे अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय घेऊन झाले. मात्र पुढे त्यांनी पीएच.डी. केली ती मात्र संगीत विषयात. लहानपणापासूनच त्यांना असेही संगीताचे धडे मिळाले होतेच. त्यांच्या आई सरलाताई यादेखील शास्त्रीय गायिका होत्या आणि सुहासिनीताईंच्या संगीत […]

1 2 3 4 5 222