विविध विषयांवरील वैचारिक लेखन

कोरोना – मृत्यू वादळ

आजपर्यंत भयंकर संकट आली.. पण निश्चल असणाऱ्या मुंबईने आपली जीवन रेखा असणारी… ‘लाईफ लाईन’ नावाने परिचित असणारी ही रक्ताची शिर कधीच बंद झाल्याचे पाहिले नव्हते. अविरतपणे चालणारी, मृत्युशी झुंज देणारी, संकटाशी भिडणारी लाइफलाइन दहशतवादी हल्ला, महापुरात सुद्धा बंद झाली नव्हती… आणि आज कित्येकांची पोटं भरण्यासाठी त्यांना तारण्यासाठी निरंतर धावणारी ‘ती’आज शांत पहुडली आहे. […]

सामूहिक दायत्वाची गरज!

करोना संसर्ग रोखण्यासाठी आता आपल्याला एकजुटीने उभं राहायचं आहे..करोना विषाणू सोबत युद्धाचा बिगुल वाजला आहे.. सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा धीरोदत्तपणे मुकाबल्यासाठी उभी आहे. मात्र, लोकसहभागाशिवाय हे युद्ध जिंकताचं येणार नाही.. त्यामुळे, आपण सगळे या लढाईतील सैनिक आहोत.. ही लढाई आपल्याला रणांगणावर नाही तर घरात बसून प्रतिबंधात्मक उपायांच्या शास्त्राने लढावी लागणार आहे..‘एकमेका साह्य करू…’ या भूमिकेतून करोना संसर्गाचा मुकाबला केला करोनाची आपल्यासमोर काय ‘औकात’ आहे? […]

‘निर्भया’ला न्याय!

निर्भया प्रकरणाचे वैशिष्ट्य हेच की ती एक अपवादात्मक घटना राहिली नाही तर देशभरात महिलांवरील अत्याचाराची ती एक प्रतीकात्मक विषय बनली. या घटनेमुळे देश जागृत झाला, कायदे कठोर झाले, शिक्षेची परिभाषा बदलली. त्यामुळेचं निर्भया प्रकरणातील चार दोषींना फाशी दिल्यानंतर नुसता निर्भयाला न्याय मिळाला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण जनतेच्या दुःखावरही मलमपट्टी झाली आहे. मात्र, जखम पूर्ण बरी झाली का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपल्याला शोधावे लागणार आहे..! […]

प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.

माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो .. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा. जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. कारण औषध जरी कडू असलं. तरी ते आपल्या फायद्याचे असते. […]

लग्नांचं ‘seasoning’

लग्नांचा season सुरू आहे. त्यामुळे साहजिकच डोक्यात लग्नाळू विषय सुरू राहातात. कुणा कुणाची लग्नं attend करता करता आसपासची next in-que मुलं-मुली आणि त्यांच्यावर focussed सर्वांच्या वधू-वर-सूचक नजरा पाहाताना हसूही येतं, आणि धास्तीही वाटू लागते. उपवर माणूस दिसलं, की करा match the pair, आणि चढवा बोहल्यावर! काय तर ही घाई! आणि ती सुद्धा त्यांचीच जास्त, ज्यांचा ह्यांच्याशी मुळ्ळी संबंध नसतो! […]

या ज्येष्ठांना एक सलाम

काही (असामान्य) करण्याची, नवनवीन गोष्टी शिकत, स्वतःला समृद्ध करत राहण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा, त्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक तडजोड, आणि आपल्या (अविश्रांत) जबाबदाऱ्यांमधून घेतलेली (तात्पुरती का होईना) जाणीवपूर्वक निवृत्ती. हे सगळं खूप खूप जास्त matter करतं जेव्हा सादरकर्ते ‘बाल’ नसतात. लहानपणी जमलं नाही तरी काय झालं, आयुष्यात जेंव्हा मला वेळ मिळतोय, सवड काढता येतेय, तेंव्हा तेंव्हा मी स्वतःसाठी झटेन, ही अत्यंत आदर्श बाब वाटते मला! […]

निरंजन – भाग १० – कथा श्री दत्तगुरुंची

गुरु म्हटल्यावर आपल्याला दत्तगुरु सर्वात आधी स्मरण होतात. दत्तगुरु म्हणजे साक्षात दत्तरुपी हरि ॐ ब्रह्म… काय आहे या दत्तगुरुंची कथा ….कशी रचना साकारली  या त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्तगुरुंच्या अवताराची… हरि ॐ ब्रह्मांच्या जन्माची…. पाहुया कथा श्री ॠषीरुपी दत्तगुरुंची… […]

कलंक ‘गुन्हेगारीचा’ झडो..!

…. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना निलंबित केले वा उमेदवारीच दिली नाही, किंव्हा जनतेने अशाना निवडूनच दिले नाही तर सुंठीवाचून खोकला जाईल. पण, ‘शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात’ अशी मानसिकता सर्वांचीच झाली असेल तर राजकारणाला लागलेला गुन्हेगारीचा कलंक दूर होईल कसा? […]

खडूचे अभंग

येता जाता दंश करायला , समाजातील चिल्लरातील चिल्लर माणसाला शिक्षकच सापडतो . इतर कर्मचारी त्याला दिसत नाहीत वा त्यांच्या उपद्रव क्षमतेमुळे कुणीही त्यांच्या वाट्याला जात नाही . शिक्षक बरा , त्याला झोडताही येतो आणि फोडताही येतो … […]

1 2 3 70