नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

प्राचीन कोकणातील बंदरे

व्यापार बहराला येण्यासाठी राजकीय स्थैर्य असण्याची आवश्यकता असते. मौर्य काळात आणि पुढे महाराष्ट्रात सातवाहन काळात अशा प्रकारचे राजकीय स्थैर्य मोठ्या काळासाठी उपलब्ध झाले आणि म्हणूनच सातवाहन काळात कोकणातील बंदरांतून पश्चिमेकडील देशांशी आणि विशेषकरून रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आर्थिक सुवर्णकाळ म्हणता येईल. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असलेला देश […]

परशुराम क्षेत्रातले कोकण

वनराईच्या बोलण्याने आनंदलेल्या आभाळाने एक सुंदर इंद्रधनू जमिनीवर खोवलं. त्यामुळे अवघी कोकणभूमी दृष्ट लागण्याइतकी लोभस दिसू लागली! त्यावेळी समुद्राच्या लाटांची गाज कोकणभूमीला सांगू लागली. ‘हे अपरान्त कोकणभूमे, भारताची पश्चिम भूमी तुझ्यापाशी परिपूर्ण होते, म्हणून तू अपरान्ता. तुझी निर्मिती या आकाशाइतक्याच विशाल मनाच्या दैवी पुरुषामुळे झाली. त्यांचे नाव परशुराम. […]

जवान

न प्रेम मला पत्नीचे पुत्राचा न मोह मला । दुर्लक्षिलेच मी सुयश प्रसिद्धी- वैभव मान सन्मानाला ॥ जीवनातल्या आनंदोत्कर्षाचे मला न कसले लोभ कशाचे । ध्येय आमुचे, निर्धार आमुचा – देशासाठी बलिदान प्राणांचे ॥ नाव स्मरणाची बातच सोडा, क्षुद्र धूळही जेथे मला विसरते। प्राणांची बाजी लावेन, मेल्यावर पण याद फिरुन कोणाला येते ॥ इतिहासात अमर होईन, […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर

“इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी भरलेले होते. सुदैवाने सावरकरांना याचा अभ्यास करायची परवानगी मिळाली. तिथे तासतास बसून महत्वाची टिपणे काढली. ते पाहून त्या ग्रंथपालला आश्चर्य वाटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी गुप्त कागदपत्रेसुद्धा सावरकरना अभ्यासायला दिली. याचा उल्लेख त्यांनी “शत्रूच्या शिबिरात “ आत्मचरित्रात केला आहे. आणि त्यांनी १८५७ चे बंड नव्हते तर स्वातंत्र्य समर होते हे  सिद्ध केले. […]

कळेना

तू पाप की पुण्य ?….कळेना . तू स्वार्थ की परमार्थ ?…. कळेना. तू विष की अमृत ? ……कळेना. तू छंद की आसक्ती ?….कळेना. तू ध्यास की भास ?……. कळेना. तू आस की आभास ?……कळेना. तू नस की फास ?……कळेना. तू श्वास की भ्रमनिरास ?…..कळेना. तू मृगजळ की शाश्वत ?…… कळेना. तू शांती की तगमग ?……. कळेना. […]

वृद्धाश्रम

वृद्धाश्रमात ठाण्याच्या – माझी आत्या असते, मधूनमधून जातो – मी तिला भेटायला. गेल्यावर मात्र जे – भकास चित्र दिसते, पाहिल्यावर नको वाटतं – पुन्हा तिथे जायला. सणवार वाढदिवसाचे गोडधोड – सारे काही मिळते, डोळे मात्र आतुरले असतात – मुलांना पाहायला. ती दिसणार नाहीत सदा – हे जेव्हा उमजते , शिकतात मग सारी स्वतःशी – खोटं खोटं […]

अष्टपैलू अभिनेता – ओम प्रकाश

त्यांचा अभिनय इतका सशक्त होता की त्यांना भूमिकेची लांबी बघायची गरज भासली नाही. चरित्र भूमिकेचे ते बादशाह होते. त्यांच्या काही चरित्र  भूमिका इतक्या ताकदीच्या होत्या की त्या चित्रपटांचे तेच हीरो होते. अन्नदाता, बुढा मिल गया हि त्याची उदाहरणे, साधू और शैतान मधील खजानजी,गोलमाल मधील इन्स्पेक्टर, पडोसन मधील मामा,चमेली की शादी मधील कुस्ती  वस्ताद, नामक हलाल  मधील ददु,शराबी मधील मुनशी  जंजीर मधील अमिताभला निनावी टीप देणारा डि सीलव्हा,आणि चुपके चुपके मधील जिजाजी कोण विसरेल. […]

येणारे दिवस जाणारच

येणारे दिवस जाणारच पण आपण जस ठरविलेल आहे तसे दिवस जाऊ लागले तर उत्तमच पण आपल्याला माहिती आहे कि कोणत वित्रुष्ट येणाची संभावना आहे त्याचा सामना योग्य प्रकारे झाला कमीच कमी हानी झाली तर तोही आनंद हे ही ओळखावे. आपण काय करू कस वागू हे आपल्या हाती येणाऱ्या संकटांना ओळखून आत्मविश्वासाने सामना करणे हाहि निर्मळ आनंद […]

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडणातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला. […]

जीव गुंतला रे जीव गुंतला

जीव गुंतला रे जीव गुंतला चांदण्यात या चंद्र ही बहरला, गुंतून गेल्या रे अधर जाणिवा तारका लाजल्या आकाशी पुन्हा.. जीव गुंतला रे जीव गुंतला धुंद झाल्या रे मलमली भावना, आस लागली शांत सरितेला ओढ लागली सागर भेटीला.. जीव गुंतला रे जीव गुंतला आठवणीत तुझ्या मोगरा फुलला, अलवार मिठीत तुझ्या स्पर्श बावरा प्रहर थांबेल तू मला ओढून […]

1 3 4 5 6 7 135
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..