नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

कोकण प्रांतातील औद्योगिक वाढ

हवाई वाहतुकीसाठी मुंबईला आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक विमानतळाबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ, रत्नागिरी येथील थोड्याच कालावधीत सुरू होणारा विमानतळ व सिंधुदुर्ग येथील चिपी-परुळे विमानतळ जोडले जातील. संपूर्ण भारतात ही हवाई वाहतूक आणि सागरमाला उपलब्ध होणार येत्या काही वर्षात! याचाच अर्थ माल वाहतूक त्वरेने भारतभर किंवा जगभर होऊन भारतात तयार होणाऱ्या नाशिवंत मालाला विस्तृत बाजारपेठ उपलब्ध होणार! […]

कोकणातील देवराया

जनमानसाच्या भावनांना हात घालत लोकसहभागातून राखलेली ही जंगले म्हणजे संवर्धनाची मूर्तिमंत उदाहरणेच नाहीत का? मुळात जंगल परिसंस्थेत मानवाने कोणताही हस्तक्षेप केला नाही तर तेथील वनस्पती, कीटक, पक्षी, सरिसृप, प्राणी यांच्या मदतीने अगदी काही वर्षातच तिथे अतिशय संपन्न असा वनपट्टा तयार होतो हे तर सिद्ध झालेलेच आहे. […]

कोकण कलावंतांची खाण

कलावंतांशी तुलना करताना आम्हा राजकारणी लोकांचे जीवन हे अगदी सामान्य आहे. आपल्या लोकांचे जीवन थोडेफार अधिक सुखकारक करण्याचे काम आम्ही करत आहोत. अशा विश्वासापोटी काळाच्या वाळूर आम्ही आमची नावे कोरण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो, पण त्यात काही अर्थ नाही. कलाकार, संगीतकार, कवी, लेखक हेच केवळ अजरामर राहतात. […]

कोकणातील गतकालीन कवी आणि लेखक

निसर्गाने मुक्तहस्ताने केलेला कोकण साहित्यरसांनी सुद्धा तितकाच बहरला. साहित्य विश्वात त्याचे सौंदर्य कायम अधोरेखित होत आले आहे. कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे वेगळेपण इथल्या मातीशी नाते सांगणारे आहे. इथल्या मातीतील शब्द रुपी मोत्यांची पखरण करीत हे साहित्य विश्वात बहुमान मिळवित आहेत. आपल्यासाठी हे अभिमानास्पद आहे. […]

छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकण प्रेम

मध्ययुगात विशेषतः शिवकाळात मैदानावरील युद्धपट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सरकला. डोंगरी किल्ल्यांना महत्त्व आले. या गड-किल्ल्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुराईने करून शत्रूला पराभवाची धूळ चारली. प्रतापगड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आजही सैन्य दलात प्रतापगड युद्धाचा अभ्यास केला जातो. गनिमी कावा तंत्र आणि गिरिदुर्ग, स्थळदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्गाचा प्रभावी वापर छित्रपती शवाजी महाराजांएवढा कोणीही केला नाही. […]

कोकणातील कातळशिल्पे

मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे. […]

कोकणातील पत्र(क)कारिता

कोकणातली पत्रकारिता विकसित व्हायची असेल तर इथला पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. तो पूर्णवेळ पत्रकार असेल याची काळजी वृत्तपत्र मालकांनी घेणं आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर पत्रकारांनीही केवळ आलेल्या पत्रकांवरून पत्रकारिता करणं सोडून देण्याचीही आवश्यकता आहे. […]

कोकणभूमीतील घरगुती व्यवसाय

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य जनता मुंबईच्या चाकरमान्यावर अवलंबून असते. सुशिक्षिततेचे प्रमाण वाढल्याने या परिस्थितीत काही प्रमाणात फरक होताना दिसतो आहे. या सर्व परिस्थितीत सुधारणा व्हावी अशी नुसती अपेक्षा न करता त्यासाठी झटून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे. […]

ग्रामसडक ते हमरस्ता

वरवर पाहता प्रमुख रस्त्यांचं जाळं कोंकणात विणल्याचं दिसत असलं तरी राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य रस्त्यांमध्ये सलगता आणि थेट जोडलेपणा यांचा अभाव आहे. […]

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बांधलेली घरे

कोकणात घरांच्या रचनेमागे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथले वातावरण, जेव्हढे ऊन तेवढाच पाऊस. ओल्या दमट आणि गरम हवामानामुळे घरांमध्ये नैसर्गिक गोष्टींचा पारंपारिक पद्धतीने वापर केला जातो. पावसामुळे घरांमध्ये महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण बदल म्हणजे उतरत्या कौलांची घरे. या मातीच्या कौलांमुळे धुवांधार पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होते आणि कडक उन्हाळ्यात देखील घरातील हवा थंड राहते. […]

1 2 3 4 5 135
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..