ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

केशर-सेंद्रियातून संजीवनी – (पुस्तक परिक्षण)

प्रयोगशील माणसे ही नेहमीच नव्याचा ध्यास घेत कार्यरत असतात. सुरेश वाघधरे हे नावसुद्धा शेतीत प्रयोग करणाऱयांमधील एक प्रमुख आहे. म्हणूनच त्यांच्या प्रयोगाची माहिती देणाऱया `केशर : सेंद्रियातून संजीवनी\’ या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे प्रयोग केले प्रामुख्याने वीजनिर्मिती, शेण, गोमूत्र, स्लरी, खतनिर्मिती, सिंचनाची किफायतशीर पद्धत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून जे आपल्याला समजले ते दुसऱयाला सांगावे यानुसार शेतकऱयांसाठी माहिती त्यांनी अत्यंत खुलेपणाने उपलब्ध करून दिली आहे.
[…]

विक्षिप्तांचे प्रकार

सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्यप्राणी समजावून घेणे अतिशय अवघड आहे. जे केवळ वर्तमानाच जगतात अशा चतुष्पाद प्राण्याचे व पक्ष्यांचे जीवन मर्यादित क्षेत्रात, विशिष्ट पद्धतीने नेमून दिल्यासारखे असते. त्यांची चाकोरी ठरलेली असते; परंतु तिन्ही काळात जगणाऱया माणसाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. पंचज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने, स्वयंप्रेरणेने, प्रतिभेने तो प्रगती साधत असतो. त्याला मर्यादा नाही. त्यामुळे माणसांच्या तऱहा अनेक, एकासारखा दुसरा नाही.
[…]

विकेंद्रकरण

जिथे जिथे सत्ता किंवा साधनसंपत्ती केंद्रीभूत होते तिथे तिथे गैरव्यवहाराला, भ्रष्टाचाराला, दडपशाहीला प्रचंड वाव मिळतो. मूठभरांची मत्ते*दारी निर्माण होते, ही वस्तुस्थिती आहे. या विषमतेतूनच पुढे असंतोष जन्माला येतो आणि क्रांतीची ठिणगी पडते.
[…]

कोरडेपणा नव्हे तर व्यवहार्यता!

प्रकाशन दिनांक :- 19/12/2004 अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा मुलभूत आहेत, याचाच अर्थ त्यांचे महत्त्व केवळ सामान्य पातळीवर, इतर साधारण प्राणी जगतात त्या पातळीवर जगण्यापुरते मर्यादित आहे. परंतु इतर प्राण्यांशी मानवाची तुलना करता येणार नाही. सर्वच बाबतीत मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची बौद्धिक, मानसिक क्षमता जशी उच्च […]

भकास करणारा विकास!

दोन चार दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचावयास मिळाली. बातमी क्रिकेटशी संबंधित होती म्हणून सुरूवातीला केवळ वरवर नजर टाकली, परंतु बातमीचा मथितार्थ वेगळाच असल्याचे लक्षात आले आणि पुन्हा काळजीपूर्वक नीट वाचली. न्यूझीलंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघातील हरभजन आणि सेहवाग या दोन खेळाडूंना घाणेरडे बुट सोबत आणल्याबद्दल प्रत्येकी 200 डॉलर्स दंड करण्यात आला, अशी ती बातमी होती.
[…]

नवी अस्पृश्यता

सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती.
[…]

1 127 128 129