नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

मराठीतील प्रवासवर्णनं

मराठी संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका बाजूला समुद्र उल्लंघून जाऊ नये, पंचक्रोशीतच रोटी-बेटी व्यवहार करावा, यवनी म्हणजे उर्दू – हिंदी भाषा बोलू नये या सारखी समाजबंधनं त्या काळात होती. ‘महाराष्ट्र देशी वचीजे’ असा महानुभाव पंथात दंडक होता. तरीही नामदेवाचे ‘तीर्थावळीचे अभंग’, मराठ्यांच्या बखरींमधील उत्तर-दक्षिणेकडील चढायांच्या निमित्ताने केलेल्या प्रवासाची वर्णने ही अव्वल इंग्रजी पूर्वकालीन प्रवासवर्णने म्हणता येतात. […]

उगवत्या सूर्याचा नि भव्य मंदिरांचा देश – जपान

दि व्यत्वाचा वास जिथे जाणवतो, मन:शांतीची अनुभूती येते त्या वास्तूला प्रत्येक भाविकाच्या हृदयात एक अढळ स्थान असतं. मग भले तिथलं आराध्य दैव वेगळ्या धर्माचं, वेगळ्या पंथाचं असेल. ती कदाचित युरोपातील भव्य चर्च, सिनेगॉग असतील किंवा पूर्व आशियातील बौद्ध आणि हिंदूंची प्राचीन मंदिरं. जपानमधील पर्यटनात या मंदिरांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचं वास्तुशिल्प अतिशय कलात्मक असतं आणि परिसर तितकाच मनमोहक. […]

अमेरिकेतील समुद्रकिनारे

समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र, मुलायम वाळू त्याचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करीत असते. क्षितिजापाशी दूरवर अस्ताचली जाणारे सूर्यबिंब सौंदर्यात अधिकच भर घालीत असते आणि विविध जहाजे. शिडाच्या होड्या चित्रात रंग भरीत असतात. समुद्रदर्शन हा एक विलक्षण आनंददायक अनुभव असतो. मग तो आपल्याकडील असो वा अमेरिकीतील-काही फरक पडत नाही. […]

धार्मिक संस्कृतीच्या खुणा

भारत माझा देश आहे व माझे देशावर प्रेम आहे. दक्षिणेतील कन्याकुमारी पासून उत्तरेतील हिमालयातील काराकोरम पर्वत रांगातील नयनरम्य काश्मीर – हिमाचल व उत्तराखंडचे बर्फाच्छादीत सौंदर्य- पश्चिमेस समुद्रात बुडालेली द्वारका व ईशान्य भारताच्या सात भगिनी ! चारी बाजूंनी विखुरलेल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्याबरोबरच येथे असलेल्या हजारो धार्मिक स्थळांचेही गारुड भारतीय मनावर पसरले आहे. हे सर्व अनुभवायचे असेल. […]

अमेरिकेतील नगररचना

अमेरिकेसारख्या राष्ट्राचा इतिहास तर गेल्या तीनचारशे वर्षांचा. शिवाय ते प्रगत राष्ट्र. इथल्या नगररचना, रस्ते, वाहतुकी यांचा पूर्णपणे विचार आधीच केला गेलेला. याचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे सॅन फ्रान्सिस्को देता येईल. हे शहर तसे डोंगराचा एक भाग समुद्राला मिळतो अशा ठिकाणी वसवलेले. […]

अमेरिकन जीवनशैली : २

आरवाईन जवळ लेकफॉरेस्ट भागात अनुपने-माझ्या मुलाने सुमारे दोन वर्षांपूर्वी घर विकत घेतले. त्याच्या दोन्ही बाजूंना अमेरिकन कुटुंबं होती. त्यापैकी उजवीकडे एक म्हातारे जोडपे. या भागात अनेक बंगल्यांमधून म्हातारी माणसंच राहातात. […]

अमेरिकन जीवनशैली : १

तिथे पहाटे पाचपासून शहराला जाग येते.. दूधवाले, पेपरवाले, गाड्या पुसणारे, चाकरमानी, विद्यार्थी, जॉगिंग करणारे – साऱ्यांची लगबग सुरू होते. झाडझुडपांमधील पक्षी मंजुळ सूरात गाऊ लागतात, दूरवर कोंबड्याने दिलेली बांग ऐकू येत असते. […]

दूतवारी देवत्व व सात्विकता फुलविणारी

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! असा नुसता उद्घोष जरी ऐकू आला तरी भगवान श्री दत्तात्रेयांची मनमोहक मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. भारतात परमेश्वराची आराधना करणारे अनेक संप्रदाय आहेत. त्यात दत्तसंप्रदाय हा फार मोठा संप्रदाय आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही महान विभूती होऊन गेली. पवित्र, सात्विक आणि धर्मवान अशी ख्याती असलेले अत्रि ऋषी व पतिव्रता सुस्वरूप आणि कोणतीही असूया नसलेल्या अनुसूया यांच्या पोटी साक्षात त्रिदेव परब्रह्म म्हणून ते जन्मास आले. […]

अमेरिकन घरं

इथे साधारण तीनेक प्रकारची घर दिसतात. पहिला प्रकार अपार्टमेंट स्वरूपाचा. ती एक किंवा दोन मजली असतात. आपल्याकडे इमारती असतात तशी. त्यामध्येदेखील ऐसपैस जागा असते: […]

अमेरिकेतील आकाशदर्शन..

अमेरिकेत पाऊल टाकले की तिथला विलक्षण निसर्ग मनाला भावतो. आपला भरतखंडही यादृष्टीने संपन्न आहेच. त्याला स्वतंत्र परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. […]

1 3 4 5 6 7 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..