नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व निगर्वी, सत्याचे पाईक असा त्यांचा स्वभाव होता.  पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची रहावयाची इमारत होती.
[…]

धारावीचा काळा किल्ला

धारावी मधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी अगदी जगप्रसिद्ध झालेली आहे. धारावीच्या या लहानशा किल्ल्याला काळा किल्ला म्हणतात. स्थानिक लोकांमधे तो काळा किल्ला अथवा ब्लॅक फोर्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे. […]

महाराष्ट्रातील हेमांडपंती देवालये

हेमांडपंती देवालय म्हटले की ते अगदी साधे, लहानसे, आणि ओबडधोबड बांधणीचे असते. असा सर्वसाधारणपणे समज आहे. परंतु सिन्नर किंवा अंबरनाथचे भरीव मंदिर पाहिल्यावर भ्रमनिवास व्हायला वेळ लागणार नाही.
[…]

किल्ले अंकाई टंकाई

अंकाई-टंकाई चा उल्लेख काही ठिकाणी अणकाई – टणकाई असाही केला जातो. हे जोडकिल्ले अजिंठा-सातमाळ रांगेत वसलेले आहेत. अंकाई जवळ ही रांग काहीशी तुटलेली आहे. या तुटलेल्या भागामधूनच गाडीरस्ता आणि रेल्वे मार्ग जातो. […]

चिपळूणचा गेवळकोट

चिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे.
[…]

नाशिकचे मोदकेश्वर गणेश मंदिर

नाशिक जिल्हा हा धार्मिक पर्ययटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा जिल्हा मानला जातो. नाशिक शहरात असंख्य मंदिर आहेत. त्यापैकीच एक प्रसिध्द मंदिर म्हणजे मोदकेश्वर गणेश मंदिर. मोदकाच्या आकारातील हे मंदिर नाशिकरांचे श्रध्दास्थान आहे. […]

रत्नागिरीचा ऐतिहासिक ठेवा

रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच असते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधून हिंडतांना इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळतात…छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आठवतो…त्याचबरोबर अनेक गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट देतांना स्थापत्यकलेचे अद्भूत नमुने न्याहाळता येतात. दापोली परिसरात फिरतांना कोकणचे अस्सल सौंदर्यही डोळ्यास पडते. म्हणूनच पर्यटकांचा या परिसराकडे जास्त ओढा असतो. […]

तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

कार्तिक महिन्याच्या त्रिपुरारी पोर्णिमेला कनकेश्वराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे यात्रा भरते. आवास येथील नागेश्वराच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे कनकेश्वराची यात्रा. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेतून विजय चिन्ह म्हणून ज्या पोर्तुगीज घंटा गावोगावी गेल्या, त्यातील एक घंटा या मंदिरात आली. प्रतिष्ठित अशा मारियांना डिमेलो या स्त्रीने इ.स. १६६६ मध्ये ही घंटा अर्पण केली, असा उल्लेख आहे. कनकेश्वर […]

कोकणचा मेवा – भाग १

आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे… कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.
[…]

माझी पहिली वारी

जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात श्री. करंदिकरांनी मला वारीला येण्यासंबंधी विचारले. मी अजून पर्यंत वारीला गेलेलो नसल्याने मला तर जाण्याची इच्छा होती. करंदिकरांना तसे कळवताच ते त्या तयारीस लागले. त्यांनी आपल्या पुण्यातील मित्राशी संपर्क साधला व पुणे सासवड या प्रवासाची तयारी केली. सासवडला राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून हॉटेल बुकिंग संबंधी कळवले, व मला तसे कळवले. माझ्या परिचयातील सौ. भोसेकर यांचे कोणी नातेवाईक तेथे राहात असल्याचे माझ्या ऐकिवात होते म्हणून मी त्यांना आमच्या सासवडला जाण्याच्या कार्यक्रमाविषयी बोललो. त्यांनी सासवडला त्यांच्याच घरी राहाण्याचा आग्रह केला व तसे श्री. करंदिकरांनाही कळविण्याबद्दल त्यांनी मला सांगितले. त्यांच्या घरचा पत्ता व तेथे राहण्यासाठी संपर्क म्हणून त्यांच्या भावाचा फोन नंबरही कळवला. […]

1 20 21 22 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..