सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

भालचंद्र नेमाडे : हिंदू जगण्याच्या समृद्ध अडगळीचे समर्पक उदाहरण

ह्या कथेला आपण रूपककथा म्हणून पाहू : सल्डया = भालचंद्र नेमाडे. शेपटीला मोडलेला काटा = ‘कोसला’चे लक्षणीय यश. नाइभाऊ = नेमाड्यांची लेखणी (किंवा दौत-बोरू).

तीन-चतुर्थांशावर वाचूनही हिंदू या तथाकथित कादंबरीला काय सांगावयाचे आहे हे ते उमजत नाही. उमजते ते एवढेच की नेमाडेभूंकडे सांगण्यासारखे भरपूर आहे पण वादी आणि चर्‍हाटात फरक असतोच हेच खरे! […]

सुरेश सरैया : सुरेल समालोचनाचे शतक

२० नोव्हेंबर २०१० रोजी नागपुरात सुरू झालेल्या भारत वि. न्यूझीलंड या कसोटी सामन्याचे समालोचन ऑल इंडिया रेडिओसाठी इंग्रजीतून सुरेश सरैया यांनी केले तेव्हा त्यांचे कसोटी समालोचनाचे शतक पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी दीडशेहून अधिक एदिसांचे (एकदिवसीय सामन्यांचे) समालोचन केलेले आहे, यात चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी समालोचन करण्यास प्रारंभ केला त्याला आता ४० वर्षे उलटून गेली आहेत.
[…]

आणखी किती लाज सोडायची?

राष्ट्रकूल स्पर्धेच्या तयारीतूनच भारताच्या प्रतिष्ठेला धक्क्यावर धक्के बसू लागल्याने क्रीडा क्षेत्रात भारताची प्रचंड घसरण होवून बसलीय हे कटू सत्य पचविणं आता भाग पडलं आहे.
[…]

सप्टेंबर १५ – कोल्हा कादिर आणि स्फोटक नॅथन असल

१५ सप्टेंबर १९५५ रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात अब्दुल कादिर खानचा जन्म झाला. पदार्पणावेळी दाखविलेल्या धडाक्यातच बराच काळ खेळत राहिलेला एक श्रेष्ठ लेगस्पिनर म्हणून कादिरची सार्थ ओळख क्रिकेटविश्वाला आहे. १५ सप्टेंबर १९७१ रोजी न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्चमध्ये जन्माला आलेल्या एका बालकाच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान द्विशतक आहे. नॅथन जॉन असल त्याचं नाव. […]

हम तेरे शहर में…

मानवी आयुष्यालाही नेहमी प्रवासाची उपमा दिली जाते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा प्रवास लक्षात ठेवून दातृत्व दाखविण्याऐवजी; क्षणिक नुकसान किंवा जीवितहानीच्या वेळी या दुनियेत सारेच घडीभराचे प्रवासी आहेत, असे ज्ञान पाजळून पुन्हा सर्वजण डोळ्यांवर कातडे ओढून बसतात, हा भाग अलहिदा. प्रस्तुत नग्मा या प्रवासातील एका मुक्कामाच्या वेळी मुसाफिराच्या मनाची झालेली ओढाताण आणि सुखदुःखे प्रत्ययकारकरीत्या चित्रित करणारा आहे […]

अर्जुनने घडवला इतिहास

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राला सुवर्णयश अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत देशाची मान उंचावली. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन जागतिक बॅडमिटन स्पर्धेत उतरली आहे. यापाठोपाठ अर्जुन अटवाल या गोल्फपटूने भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने विडहॅम चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकत विक्रम केला. […]

एकाला 10 बळी आणि पाचही दिवस फलंदाजी

…सरेच्या गोलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला. 29-11-43-10. 7 झेलबाद आणि 3 यष्टीचित. अर्धा डझन फलंदाज शून्यावरच बाद. […]

पाकिस्तान, पैसा आणि पचका – दौरा आता आवरा !

पाकिस्तानमधील परिस्थिती पाहुण्या खेळाडूंनी जिवंतपणे परत घरी पोहचण्यासारखी नसल्याने पाकिस्तानमध्ये खेळायला आजकाल कोणताही आंतरराष्ट्रीय संघ तयार नसतो. त्रयस्थ भूमीवर सामने खेळविणे हा त्यावरील एक उपाय होता पण त्रयस्थ ठिकाणे ही निकाल-निश्चितीची निश्चित सुविधा असलेली ठिकाणे बनलेली आहेत. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला शारजामधील कोणत्याही सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे ती या कारणामुळेच. (ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. आठवा. शारजात आपण शेवटचे कधी खेळलो?) […]

1 4 5 6 7