नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

रक्षाबंधन

श्रावण महिन्यांत पौर्णिमेचे दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता. पूर्वी तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधून रक्षा अर्थात राखी तयार करीत. ती राखी मंत्र्याने राजाला बांधावी असे सांगितले आहे. असाच विधी भविष्य पुराणातही सांगितला आहे. इतिहास कालापासून याची नूतन प्रथा सुरु झाली. या काळात बहीण भावाला राखी बांधू […]

नरसोबावाडीला श्रीगुरुंचे वरप्रदान

श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज राजाधिराज असल्याने त्याचे आगमन व काही काळ वास्तव्य येथे होणार या कल्पनेनेच इ.स. १०३४ मध्ये प.प. श्रीरामचंद्र योगी हे या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज वास्तव्य करण्याआधी ४०० वर्षे येऊन वास्तव्य करु लागले. ज्यांच्या आगमनाच्या वार्तेनेच भूमी शेकडो वर्षे पावन झाली आहे. […]

सीतला सप्तमी

श्रावण शुद्ध सप्तमीला सीतला सप्तमी हे व्रत केले जाते. कलशावर सीतला देवीची स्थापना करून पूजन करतात. बाकी सर्व विधी इतर व्रतांप्रमाणे आहे. -श्री करंदीकर गुरुजी

श्री क्षेत्र नरसोबावाडी महात्म्य

नरसोबावाडी ही साधु-संतांची तपोभूमि आहे. श्रीराम चंद्रयोगी तेथे राहिले होते. नंतर नारायणस्वामी आले. काशीकर स्वामी, गोपाळस्वामी तेथेच राहिले. येथे प्रसिद्ध मौनीस्वामी सिद्धपुरुष होऊन गेले. ब्रह्मानंद स्वामी, गोविंदस्वामी येथे रहात असत प.पू. श्रीटेंबेमहाराज येथे वरचेवर येत होते. योगी वामनराव गुळवणी महाराज दर गुरुद्वादशी वारी करीत असत. […]

कल्की जयंती

भगवान विष्णूंचा दहावा अवतार. काहींचे मते तो होऊन गेला तर पुराणांच्या मते तो होणार आहे. कल्की पुराणात कलीयुगाचे शेवटी हा अवतार होईल असे सांगितले आहे. […]

वर्णषष्ठी

श्रावण शुद्ध षष्ठी रोजी हे व्रत केले जाते. या व्रताचा कालावधी ५ वर्षे आहे. भगवान शिवांची मंदिरात घरी पूजा करावी. वरण भाताचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यात खारवलेल्या आंब्याचा समावेश असावा. उद्यापनाचे वेळी आंब्याच्या पानांच्या आहुती देतात. या दिवसाला सूपोदन वर्णषष्ठी असेही म्हणतात -श्री करंदीकर गुरुजी

श्री गणेशमूर्तीचे २१ प्रकार व नावे

प्राचीन काळातही श्रीगणेशाच्या अनेक मूर्ती होत्या असे आढळते. प्राचीन वाङ्मयात या मूर्ती कशा तयार कराव्यात, त्यांच्या हातात काय काय वस्तू असाव्यात, त्यांना कोणता रंग असावा, किती हात असावेत इत्यादी तपशील आढळतो. तद्नुसार श्रीगणेशाची निरनिराळी नांवेही ठेवलेली आढळतात. […]

ऋण सद्गुरूचे

संत कसे बोलतात, कसे चालतात, निरनिराळ्या परिस्थितीत कसे वागतात, कसे निर्भय असतात, कसे निःस्पृह असतात, किती निरिच्छ, किती मृदू, परंतु किती निश्चयी, कसे निरहंकारी, कसे सेवासागर, किती निरलस, किती क्षमी, कसे त्यांचे वैराग्य, कशी निर्मळ दृष्टी, कसा विवेक, कसा अनासक्त व्यवहार, – हे सारे त्यांच्या सहवासात नित्य राहिल्यानेच समजत असते. […]

गोकुळ म्हणजे काय?

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र व दुसरा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले, पण या दोन राजांचे स्थान अटळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणताही सत्ताधीश बसू शकणार नाही. भारतीय संस्कृती म्हणजे राम-कृष्ण. […]

श्रवणभक्ती

विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या सर्वसत्ताधीश परमात्म्याविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होणे याचे नाव भक्ती. ही सारी सृष्टी त्या ईश्वराचीच विविध रूपे आहेत असे वाटू लागणे, त्याअनुरूप आपला व्यवहार होणे ही भक्तीची परिसीमा […]

1 6 7 8 9 10 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..