नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्री शिवनामावल्यष्टकम् – १

हे चन्द्रचूड मदनान्तक शूलपाणे स्थाणो गिरीश गिरिजेश महेश शंभो । भूतेश भीतभयसूदन मामनाथं संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ १ ॥ भारतीय संस्कृतीमध्ये, उपासनेचा क्षेत्रामध्ये नामा ला प्रचंड महत्त्व आहे. सर्वच देवतांच्या सर्व पंथात, संप्रदायात नामस्मरण ही समान गोष्ट आहे. भगवंताच्या विविध नामांमधून त्याच्या विविध गुणांचे वर्णन केलेले असते. स्वरूपाचे निर्देशन केलेले असते. याच कारणाने नामस्मरणाचे हे महत्त्व लक्षात […]

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १६

स्तोत्राच्या शेवटी मी जे काही करतो, अर्थात या देह मन बुद्धी च्या द्वारे जे जे काही घडते, त्या सगळ्यांच्या मध्ये माझ्या अज्ञानामुळे ज्या ज्या चुका होतात, त्या सगळ्यां करिता आचार्यश्री एकत्र क्षमायाचना करीत आहेत. ते म्हणतात, […]

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १५

आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः । लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥ या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात, आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं – पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे […]

निरंजन – भाग १९ – गुणधर्म

गुणधर्म म्हणजे आपल्यातलीच एक विशेषता…….मानवाचा खरा गुणधर्म म्हणजे मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, ही मानवियता … जसे जलाचा धर्म आहे तहान भागवणे व्याकुळता दुर करणे, सुर्याचा धर्म आहे सुष्टीला प्रकाश देणे. सजीवांकरीता जीवनसत्त्व निर्माण करणे. वायुचा धर्म आहे प्राण़वायु देणे, अग्निचा धर्म आहे उष्णता देणे. […]

श्री शिवापराधक्षमापण स्तोत्रम् – १४

जगणे आणि जिवंत असणे या दोन मध्ये फरक आहे. केवळ श्वास घेणे म्हणजे जगणे नव्हे. उदरभरण तर पशु पक्षांचे देखील चालतेच. मात्र त्यासाठी खालील गोष्टी करण्याची माझ्यावर वेळ येऊ नये. ही आचार्यश्रींची मागणी अनेक अर्थाने चिंतनीय आहे. […]

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १३

किं यानेन धनेन वाजिकरिभिः प्राप्तेन राज्येन किं किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभिर्देहेन गेहेन किम् । ज्ञात्वैतत्क्षणभंगुरं सपदि रे त्याज्यं मनो दूरतः स्वात्मार्थ गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वतीवल्लभम् ॥१२॥ आयुष्यामध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींपेक्षा भगवान श्री शंकराची कृपा हीच खरी प्राप्ती आहे हे सांगण्यासाठी आचार्यश्री म्हणतात, किं यानेन – प्रवासाची सुखकारक साधने असून काय? धनेन – प्रचुर स्वरूपात धन असून काय? […]

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १२

चन्द्रोदभासितशेखरे स्मरहरे गड्गाधरे शंकरे सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे । दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः ॥१२॥ भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाला आपल्या समोर ठेवताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात, चन्द्रोदभासितशेखरे – मस्तकावरील चंद्रामुळे ज्यांचा शिरोप्रदेश उजळून निघाला आहे असे. मस्तकावरील चंद्र हे वेगळ्या अर्थाने मस्तकाच्या उज्ज्वलतेचे, शांततेचे, प्रसन्नतेचे, शीतलतेचे प्रतीक. स्मरहरे – स्मर म्हणजे भगवान […]

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – ११

हृद्यं वेदांतवेद्यं हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशम् ! सत्यं शांतस्वरूपं सकलमुनिमन:पद्मषण्डैकवेद्यम् !! जाग्रत्स्वप्नेसुषुप्तौ त्रिगुणविरहितं शङ्करं न स्मरामि ! क्षन्तव्यो मेऽपराध: शिव शिव शिव भो श्री महादेव शंभो !! ११!! या स्तोत्राच्या अनेक आवृत्तीमध्ये प्रस्तुत श्लोक उपलब्ध नाही. मात्र कांची कामकोटि पीठाद्वारे प्रकाशित स्तोत्रावली मध्ये समाविष्ट असलेला हा अत्यंत सुंदर श्लोक. जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, हृद्यं – अत्यंत […]

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – १०

स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमयमरुत्कुण्डले सूक्ष्ममार्गे शान्ते स्वान्ते प्रलीने प्रकटितविभवे ज्योतिरूपे पराख्ये । लिड्गज्ञे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१०॥ येथे भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज ध्यान मार्गाच्या अंतिम अवस्थेचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, स्थित्वा स्थाने सरोजे – ब्रह्मरंध्रामध्ये असणाऱ्या सहस्त्रदल कमला मध्ये स्थिर होऊन, प्रणवमय […]

श्री शिवापराधक्षमापणस्तोत्रम् – ९

नग्नो निःसड्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् । उन्मन्यावस्थया त्वां विगतकलिमलं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥९॥ भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना आचार्य श्री येथे त्यांच्या काही विशेषणांचा उल्लेख करीत आहेत. ते म्हणतात, नग्नो- ज्यांचे मायारूपी वस्त्र गळून गेले आहे, ज्यांच्यावर कशाचेच आवरण पडूच शकत नाही, त्यांना […]

1 65 66 67 68 69 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..