नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

अंतरंग – भगवद्गीता – अर्जुनविषादयोग

दृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. […]

निरंजन – भाग ४५ – स्पर्श परिसाचा!

संत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव… ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत. […]

श्रीरामभुजंगस्तोत्र – मराठी अर्थासह

श्रीरामभुजंगस्तोत्र हे श्रीरामाचे आदि शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र समजण्यास खूप सोपे व त्यामुळे भाविकांच्या मनाला भिडणारे आहे. समर्थ रामदासांच्या वाङ्मयामुळे व रामदासी संप्रदायामुळे महाराष्ट्रात रामभक्तांचे प्रमाण मोठे आहे. त्यांना हे स्तोत्राचे मराठी रूपांतर आवडेल अशी खात्री आहे. या स्तोत्राची रचना ‘ भुजंगप्रयात ’ (यमाचा यमाचा यमाचा यमाचा) या वृत्तात केली असल्याने त्याला    ‘ रामभुजंगम् ’ असे नाव दिले आहे. अपवाद श्लोक २२ चा. तो रथोद्धता वृत्तात (राधिका नमन राधिका लगा) आहे.   […]

निरंजन – भाग ४४ – दंगले देऊळ संतध्यानात

“जय जय राम कृष्ण हरी” जपत-जपत श्री संत नामदेवांची संत मंडळी खूप मोठ्या उत्साहाने एकदा जंगल पार करीत होती. हा प्रवास सुरू असतानाच वाटेमध्ये त्यांना महादेवांचे एक भव्य मंदिर दिसते. सर्वांची उत्कट इच्छा होते की, आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे दर्शन घ्यावे. […]

परब्रह्मप्रातःस्मरणस्तोत्रम् सार्थम् – मराठी अर्थासह

श्री आदिशंकराचार्यांनी रचलेल्या या स्तोत्रात केवळ तीनच श्लोक आहेत. पाठकाचे कायावाचामने अत्युच्च तत्त्वाचे चरणी समर्पण करण्याचा त्याचा उद्देश आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या मनात येणा-या विचारांचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होत असतो. जर आपण ते विचार पवित्र व स्वर्गीय करू शकलो तर आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने आपली नक्कीच वाटचाल होईल. या दृष्टीने ही पहाटेस करावयाची प्रार्थना निश्चितच महत्त्वाची आहे. […]

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् – मराठी अर्थासह – भाग २

पं. रामकृष्ण कवी यांनी रचलेले प्रस्तुत महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे ‘देवी माहात्म्य’ वर आधारित असून त्यात मधु,कैटभ,महिषासुर तसेच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेल्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या रूपांचा उल्लेख आहे. दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) या वृत्तात रचलेल्या व अनुप्रास अलंकाराने नटलेल्या या स्तोत्रात शब्दांची अत्यंत आकर्षक रचना असून एकच शब्द पुनःपुनः वेगवेगळ्या अर्थांनी उपयोजल्याने कवीची संस्कृत भाषेवरील विलक्षण पकड जाणवते. […]

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् – मराठी अर्थासह – भाग १

पं. रामकृष्ण कवी यांनी रचलेले प्रस्तुत महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे ‘देवी माहात्म्य’ वर आधारित असून त्यात मधु,कैटभ,महिषासुर तसेच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेल्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या रूपांचा उल्लेख आहे. दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) या वृत्तात रचलेल्या व अनुप्रास अलंकाराने नटलेल्या या स्तोत्रात शब्दांची अत्यंत आकर्षक रचना असून एकच शब्द पुनःपुनः वेगवेगळ्या अर्थांनी उपयोजल्याने कवीची संस्कृत भाषेवरील विलक्षण पकड जाणवते. […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ५१

भगवान श्रीहरीच्या दिव्यरूपाचे आणि निर्गुण निराकार स्वरूपाचे वर्णन केल्यानंतर आचार्य श्री या श्लोकात भगवंताच्या भक्तांना वंदन करीत आहेत. सोबतच अशा भक्तांची जीवनयात्रा कशी असते त्याचेही अद्वितीय निरूपण करीत आहेत. […]

1 43 44 45 46 47 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..