अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

दुर्गा पूजेची सुरवात

बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. बंगाली समाजात देवी दुग्रेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. नवरात्रीच्या दिवसात दुर्गा पूजा करण्याची बंगाली समाजाची विशेष परंपरा आहे. साधारण महाराष्ट्रात नवरात्रीच्या पहिल्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटाची स्थापना करून मग नऊ दिवसाच्या नऊ […]

नवरात्रीचा साहवा दिवस

आज नवरात्रीचा रंग हिरवा आजचा विषय हिरव्या रंगाची ब्रोकोली ‘स्प्राऊटिंग ब्रोकोली’ हे जरी या भाजीचे नाव असलेतरी ‘ब्रोकोली’ या नावाने आपण ओळखतो. ब्रोकोली मुळातंच अनोळखी आणि विदेशी भाजी. ब्रोकोली ही भाजी हिरव्या फ्लॉवरसारखी दिसते. ही भाजी कुरकुरीत व चविष्ट आहे म्हणून या भाजीचा प्रामुख्याने सॅलडमध्ये वापर केला जातो. ब्रोकोलीच्या रॉयल ग्रीन, एव्हरग्रीन, युनिव्हर्सल, डॅन्यूब, अव्हेला, युग्रीन, […]

नवरात्रीचा पाचवा दिवस

आज नवरात्रीचा रंग पिवळा आजचा विषय पिवळ्या रंगाची हळद आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळत असे. त्या काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली […]

नवरात्रीचा रंग – गहन निळा

आज नवरात्रीचा रंग – गहन निळा आजचा विषय निळ्या रंगाचे ब्ल्यूबेरी आवळा, जांभूळ, स्ट्रॉबेरी, तुती, करवंद या बरोबरच ‘ब्ल्यूबेरी’ हे बेरीवर्गीय फळा मध्ये येते. भारतात हे फळ जास्ती वापरले जात नाही. ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ आहे. ब्ल्यूबेरीची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन […]

महाकाली … जगदंबा …. ‘रेणुका’

देवीचं अतिशय शांत आणि सात्विक दर्शन झालं … देवस्थानचे ट्रस्टी भेटले … त्यांनी कल्पना करता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था केली … निवांत आणि सुंदर दर्शन घडवलं … मनोभावे फोटो काढता आला …प्रसादाचा त्रयोशगुणी विडा दिला …. […]

योगरूपी जगदंबा …… योगेश्वरी…

आंबेजोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या ‘जयंती’ नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीच देऊळ पुराणकाळापासून अस्तित्वात आहे. मंदिराची रचना हेमाड़पंथी स्वरूपाची असून ते उत्तराभिमुख आहे व मंदिराला मोठा दगड़ी कोट आहे. मंदिराला एक मुख्य शिखर असून चार लहान शिखरं आहेत. मंदिराच्या सभागृहात मोठमोठे दगड़ी खांब असून त्यावर बारीक खोदीव काम केलेले आहे. आत तसा फारसा नैसर्गिक उजेड नसल्याने गाभाऱ्यातल्या समईच्या मंद प्रकाशात देवीचं दर्शन होतं. देवीचं मुख काहीसं उग्र भासतं. […]

श्रीसूक्त – मराठी अर्थासह

श्रीसूक्त हे ऋग्वेदात समाविष्ट असले तरी ते ‘खिलसूक्त’ या प्रकारात मोडते. एखाद्या प्रकरणाला अथवा मुख्य साहित्य प्रकाराला परिशिष्ट म्हणून जोडलेल्या साहित्याला खिल असे म्हणतात. वेदव्यासांनी संपादित केलेल्या ऋग्वेदाच्या मूळ संहितेत नसलेली परंतु नंतर त्यात समाविष्ट केली गेलेली अशी ही सूक्ते ‘खिलसूक्त, परिशिष्टसूक्त वा पदशिष्टसूक्त’ या नावांनीही ओळखली जातात. […]

श्रीबुद्धी नवरात्रोत्सव

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळास गाणपत्य संप्रदायात बुद्धी नवरात्र असे संबोधले जाते.
भगवान गणेशांच्या दोन्ही हाताला असणाऱ्या देवीं पैकी श्री गणेशांचा उजव्या हाताला असणाऱ्या देवीला भगवती बुद्धी असे म्हणतात. […]

जनसेवा

आता दुनियेत| होती खूप हाल| सुकलेत गाल| शोषितांचे||१|| पाहिले अनेक|दु:खी जीव येथे| चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२|| करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान| नाही मला भान|देवा आता||३|| थोडी जनसेवा| हातून घडावी| साथ रे मिळावी| देवराया||४|| भाव पामराचा| समजून घ्यावा| आशिष असावा| देवा तुझा||५|| पुसू देत डोळे| भरवू दे घास| जगण्याची आस| वाढो त्यांची||६|| अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता| बनुनी त्यांचा […]

निरंजन – गाभार्‍यातले ध्यानस्थ चिंतन

आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्‍याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”! […]

1 2 3 4 50