नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

प्लास्टिकला घटकद्रव्यांमुळे मजबुती

ॲक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली यामध्ये असलेल्या लागला. अॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची शक्ती व उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती हे गुणधर्म प्राप्त झाले. यामध्ये आलेल्या ब्युटाडाइन या रबरामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्ती व मजबुती वाढली व स्टायरिन या घटकद्रव्यामुळे प्लास्टिक अधिक चकचकीत दिसते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे झाले. […]

आबेल पारितोषिक २०२२

प्रसिद्ध परंतु अल्पायुषी नॉर्वेजिअन गणितज्ञ नील्स हेन्रिक आबेल (१८०२-२९) यांच्या नावाने एक पारितोषिक, २००३ सालापासून दरवर्षी आहे. एका अर्थाने हे पारितोषिक गणिती जीवनगौरव या स्वरूपाचे असून त्या विजेत्याचे एकूण कार्य विचारात घेते, न की एखादे प्रमेय, सिद्धांत किंवा प्रश्न सोडवण्याची पद्धत. पदक आणि ७५ लक्ष नॉर्वेजिअन क्रोनर्स (सुमारे भारतीय रुपये ६,४८,००,०००) असे या पारितोषिकाचे स्वरूप असून, नॉर्वे सरकारच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाते. […]

टेफ्लॉन

पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरातील तवा किंवा कढया एकतर लोखंडी, पितळी वगैरे धातूंच्या असायच्या पण आता हे जुने तवे किंवा कढयांची जागा अतिशय आधुनिक अशा नॉनस्टिक तवे व फ्राइंग पॅन्सनी घेतली आहे. […]

प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ

प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ किंवा औषधे ठेवली तर ती शरीराला अपायकारक ठरतात का? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. असे डबे पॉलिथिलिनपासून बनवले जातात. पॉलिथिलिन दोन प्रकारे बनवले जाते. हे दोन्ही प्रकार मुळात बिनविषारी प्रकारात मोडतात. पॉलिथिलिनचा मानवी शरीरावर अजिबात परिणाम होत नाही हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पॉलिथिलिन हे एकमेव प्लास्टिक असे आहे की, ज्यावर कोणत्याही द्रावकाचा (सॉल्व्हंट) परिणाम होत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर पॉलिथिलिन कोणत्याही द्रावात विरघळत नाही. […]

सनग्लासेस

सनग्लासेस म्हणजे गॉगल हे सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करणारे एक साधन आहे. प्रदूषणापासूनही त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. सनग्लासेसमुळे स्त्री-पुरूषांचे व्यक्तिमत्त्वही खुलून दिसते. […]

आणखी काही प्लास्टिक

इथिलीन ऑक्साइड व हायड्रोजन साइनाइड यांपासून अॅक्रिलोनायट्रिल बनते. त्यात स्टायरिन मिसळून स्टायनि अॅक्रिलोनायट्रिल बनवता येते. हे मिश्र प्लास्टिक पिवळसर असते. हे पूर्णपणे पारदर्शक असते. […]

विजेवर चालणारी जहाजे

जागतिक तापमानवाढीचा महाराक्षस समोर उभा ठाकल्यावर माणसाला जाग आली आणि जगभर हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हल्ली बाजारात आलेली विद्युत ऊर्जेवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने हा त्या प्रयत्नांचाच एक भाग होय. पण, हे आता जमिनीवरील वाहनांपुरते मर्यादित राहिले नाहीये, तर जहाजे आणि विमानेसुद्धा विद्युत ऊर्जेवर चालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जहाजांच्या बाबतीतील या प्रयत्नांचा आढावा घेणारा हा लेख… […]

सीएफएल बल्ब

वीज वाचवणे हे वीज निर्माण करण्याइतके महत्त्वाचे आहे यात शंका नाही. आपल्याला प्रकाश देतात ते बल्ब किंवा ट्यूब यांना जास्त वीज लागते, त्यामुळे कमी विजेवर चालणारे सीएफएल बल्ब तयार करण्यात आले. […]

नैसर्गिक आणि कृत्रिम प्लास्टिक

डांबर ऊर्फ बिटुमीन जुन्या काळापासून इजिप्शियन लोकांना माहीत होते. त्यांच्या लाकडी जहाजांची पाण्यामुळे नासधूस होऊ नये म्हणून ते डांबराचा थर जहाजांवर देत. लाख हे एक प्रकारचे प्लास्टिकच. ही लाख मानवाला फार पूर्वीपासून माहीत आहे. […]

ट्यूबलेस टायर

मोटरसायकल किंवा चारचाकी वाहन नको त्या वेळी पंक्चर झाले तर काय डोकेदुखी होते हे सर्वांना माहिती आहे. त्यासाठीच अलिकडे ट्यूबलेस टायर वापरले जातात. यात नावातच सांगितल्याप्रमाणे फक्त टायर असतो व ट्यूब मात्र नसते. […]

1 6 7 8 9 10 62
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..