नवीन लेखन...

सालं माणसाचं असंच असतं

लहान असताना लहानपण नको असतं मज्जा असते पण शिस्त नको असतं म्हणून पटापट मोठ्ठं व्हायचं असतं सालं…..माणसाचं असंच असतं आजोळी गावाला जायचं नसतं चुलीतल्या निखार्‍यांवर काजू भाजत कोपरापर्यंत रस गळणारा रायवळ बदाक् कन परसात पडलेला फणस त्यातले पिवळेजर्द गोडूस गरे दुपारी खळात वाळवलेली आंबापोळी कच्च्या फणसाचे तळलेले गरे हे सगळं हवं पण गाव नको असतं सालं…..माणसाचं […]

लोकशाहीचे ओझे ?

पुरातन काळापासून खांद्यावर ओझे वाहणे हाच एककलमी कार्यक्रम समाजातील सामान्यांसाठी ! त्यावेळी पालखीत बसलेले मंदिरातील देव होते, सरदार होते , दरकदार होते ! संत होते , महंत होते, पंडित होते ! आज सजलेल्या पालखीत खासदार आहेत, आमदार आहेत , मंत्री आहेत , संत्री आहेत त्यांचे काटेचमचेपळ्या आहेत ! ओझे वाहणारे भोई मात्र तेच आहेत, समाजातील सामान्य […]

दुर्लभ जीव मानवी

अंगवळणी पडल्या दुःखवेदनां सभोती निर्विकार सुख संवेदना सारेच आपुले सख्ये सखेसोयरे परी दुर्मिळ झाल्या प्रीतभावनां…. भास शुष्कतेचे, संपली मृदुलता गोठले प्रेम, प्रीती कवटाळतानां हरविला प्रीतवात्सल्य जिव्हाळा हाच शाप कां? जन्म भोगतानां…. अंमल हाच कलियुगाचाच सारा वाटते, भोग प्रारब्धाचे भोगतानां युगायुगांचा हा दुर्लभ जन्म मानवी तिथे कुठली सुखदा वात्सल्याविना…. रचना क्र. ९९ ८/८/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908

स्वैराचारी स्वातंत्र्य

स्वातंत्र्यदिनी मातृभूचे आक्रंदन घामेजले शरीर, भडका दिशांत झाला दूषित भूमी झाली, वारा विषारी झाला तोडुनी वृक्षराई, डोंगर उजाड केला निसर्ग कोपूनिया दुष्काळ माथी आला स्वातंत्र्यतेज आमुचे, सारे दूषित झाले आम्हीच हे स्वहस्ते, ऐसे अघोर केले ऐशा कुकर्मी आज,जनताच त्रस्त सारी स्वातंत्र्य हे कशाचे? ना संपली गुलामी सारे विषारी अन्न,भाजीत विष मिळते पाणी नदीतले ही, सारे अशुद्ध […]

आला पंचमीचा सनं……

आला पंचमीचा सन,घेऊन माहेरचा सांगावा बैलं जोडुनं डमनीलं,आला घ्याया भाउराया. वाट माहेराची सये,कटता कटेनं लवकर, मन व्हतया पाखरू,धुंडे माहेरचं आंगणं. डमनी भाऊरायाचीबाई,नाद घुंगराचा छुनछुनं, मन होई कासाविस,पाह्या माहेरचं गणगोतं. माहेरात सखीबाई,दारी मिजाज उंबराची, आठवे लहानपणचा झोका,मन लहानुनं जाई. आला पंचमीचा सनं,झोका झाडालं बांधला, वरसाची नवलाई,खेळं हौशीचा मांडला सासुरवाशीन मी गं सये,सुखं माहेरचा झोका, झोका खेळी वार्‍यासंग,ईसरे […]

कृपाळु कनवाळू

मोहरलेल्या सृष्टी गर्दी पर्णफुलांची झुळझुळतो वारा मस्ती भावनांची… निसर्गाची जादुई प्रचिती प्रसन्नतेची ठेवा चैतन्याचा उधळण आनंदाची… कवटाळीता सुखा साक्ष स्वर्गसुखाची स्पर्श मांगल्यमयी अनुभूती देवत्वाची… जीवन व्हावे पावन ही भावनां अंतरीची तो कृपाळु कनवाळू आंस त्याच्या कृपेची… रचना क्र.९४ ३/८/२०२३ वि.ग सातपुते (भावकवी) 9766544908

श्रावणसरी

बरसता श्रावणसरी,मन पाखरून जाई, ओली ओली हिरवळ,मन हारकुन जाई. आला श्रावण घेऊन,सखे घन काळेभोरं, त्यांनी बरसुन गेले,देले सुखाचे आंधनं. आंधनात तिलं आलं,नच पाणी ते जिवनं, धरू घटाघटा पिई,मिटे व्याकुळ तहानं. पशु-पक्षी,झाडं वेली,डौल डौलती डौलातं, नक्षी शोभे फुलं वेलं,शोभे कोंदनं गोंदनं. लेणं आहेव हिरवं,काळी करे हिरवा तालं तिचा आहेव शृंगार,भाळी शोभे फुल लालं. आहेव काळी धरूमायं,तिनं लेला […]

पुण्यस्रोत

निसर्ग हा हिरवळलेला पुण्यस्रोत शुभ्र जलाचा…. दरीदरीतुनी झेपावतो उंच धबधबा डोंगरीचा…. निळ्यानिळ्या अंबरी धुसर पांघर धुक्याचा…. रंग कोवळे सप्तरंगले धुंद सुगंध मृदगंधाचा…. सांजाळल्या सांजवेळी पापणीत भास तृप्तीचा…. समोर वाहते कृष्णामाई साक्षात्कार जणू गंगौघाचा…. रचना क्र. ९२ ३१/७/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908

येरझारा

जगता, जगता जगती अनामिका शोधीत राहिलो.. हितगुज अव्यक्त मनाशी नित्य मीच करित राहिलो… वळणा वळणावरुनी अज्ञाना उलगडीत राहिलो… नेत्री केवळ ध्यास तुझा येरझारा घालीत राहिलो… कधीतरी भेटशील एकदा भक्तीभावनां जपत राहीलो… वेडी आशा वेडी आसक्ती नकळे तुझ्यात मग्न राहिलो रचना क्र. ९० २९/७/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908

तृप्ती

मी तुझ्यात रे गुंतले विसरले सारे काही… तूच रे या मनमंदिरी तुलाच भुलले नाही… हा दैवयोग भाळीचा कुठलाच संदेह नाही… श्वासात गंधाळ तुझा दरवळणे संपले नाही… ही तृप्ती ओंजळीतली आता कधी संपु नाही… रचना क्र. ८९ २८/७/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908

1 2 3 4 5 6 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..