नवीन लेखन...

तुझ्यासाठी काही ही

तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी माझ्या विचारांशी तडजोड तुझ्यासाठी करणार नाही मी तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी तुझ्यासाठी माझा जीव कधीच देणार नाही मी तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी तुझ्यासाठी माझ्या नात्यांचा बळी देणार नाही मी तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी पण तुझ्या प्रेमाला कधीच नकार देणार नाही मी तुझ्यासाठी काही ही […]

निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी…१, बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे…२, नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे…३, जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी…४, प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची….५, मृत्यूच्या दाढे मधूनी,  एक […]

कळते मला

तुझे रुसने कळते मला रागावनेही कळते तुझे टाळणे कळते मला प्रेमही कळते तुझे झुरणे कळते मला दुःखही कळते तुझी व्यथा कळते मला वेदनाही कळते तुझी अगतिकता कळते मला समर्पणही कळते तुझ्यातील तू कळते मला माझ्यातीलही कळते तुझी इच्छा कळते मला मनही कळते तू माझी कळते मला तुलाही कळते मी तुझा कळते मला जगलाही कळते आता सारेच […]

वाटत राहत…

वाटत राहत तुझ्याशी खूप बोलावं भरभरून जगातील अकल्पित गूढ आणि चमत्कारी विषयांवर पण ओठातून शब्दच बाहेर पडत नाही तुझा अबोला कधी विनाकारण तुटत नाही मला ज्ञान असताना भूत भविष्य वर्तमानाचे तुझ्याशी बोलावे असे काही घडत नाही आज ना उद्या जगाला उत्तरे हवी तुझ्या माझ्या नात्याची त्या नात्यातील गुढतेची कारण आपले नाते खरचं साधे नाही © निलेश […]

मयुरा तूं आहेस गुरु

मयुरा तूं आहेस गुरु,  तुला आम्हीं वंदन करु   ।।धृ।। नदी कांठच्या वनीं थुई थुई नाचूनी पिसारा फुलवुनी तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु   ।।१।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु मोरपिसे सुंदर रंग बहारदार दिसे चमकदार बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं   ।।२।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु रुप डौलदार […]

मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी,मर्यादेतचि जगती सारे  । अनंत असता ईश्वर,मर्यादा घाली त्यास बिचारे  ।। जाण जगाची होई इंद्रियांनी,त्याला असती मर्यादा  । विचार सारे झेपावती,ज्ञान शक्ती बधूनी सदा  ।। अथांग वाटे विश्वमंडळ,दाही दिशांचा भव्य पसारा  । ईश्वर आहे थोर त्याहूनी,मोजमापाच्या उठती नजरा  ।। कशास करीतो तुलना सारी,भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी  । अज्ञानाने पडती मर्यादा,अनंत तत्वास त्याच क्षणी  ।। […]

बाळाची निद्रा

चिंव चिंव करुं नकोस चिमणे,  बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग,   देईन मी सगळे कपाट सारे उघडून ठेवले,   समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे,   डाळ दाणे पोटभरी घरटी बांध तूं माळ्यावरती,   काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही,   ही घे माझी वाणी नाचून बागडून खेळ येथे,    निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं […]

वेळेचे मूल्य

मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे, गमावून टाकी, जाणूनी फुकाचे ।।१।। लागत नसते, दाम वेळेसाठीं, म्हणून दवडे, अकारणा पोटीं ।।२।। वस्तूचे मूल्य ते, पैशांनीच ठरते, परी वेळेची किंमत, कुणा न समजते ।।३।। वेडे आहोत सारे, कसे होई मूल्य वेळ जातां मग, आयुष्य जाईल ।।४।। आयुष्य खर्चणे, हेच वेळेचे मुल्य ठरते, जीवनांतील यश, त्यावरुन कळते ।।५।। डॉ. […]

अपूर्ण जीवन

सोडून दे अहंकार तुझा लाचार आहेस आपल्या परि पूर्ण जीवन तुला न मिळे न्यूनता राहते कांहीं तरी…१ धनराशि मोजत असतां वेळ तुजला मिळत नसे शरीर संपदा हाती नसूनी मन सदा विचलित असे…२ शांत झोपला कामगार तो दगडावरी ठेवूनी डोके देह सुदृढ असूनी त्याचा पैशासाठी झुरतां देखे…३ उणीवतेचा कांटा सलूनी बाधा येत असे आनंदी म्हणून खरे समाधान […]

उपयोगीता हेच मूल्य

चष्मा लावूनी करित होतां,  ज्ञानेश्वरीतील पारायण दृष्टीमधले दोष काढले,  चाळशीचा आधार घेवून….१, फूटूनी गेला एके दिवशीं,  चष्मा त्याच्या हातामधूनी पारायणे ती बंद पडली,  दृष्टीस त्याच्या बाध येवूनी…२, चालत असता सरळपणे,  दैनंदिनीचे कार्यक्रम खीळ पाडूनी बंद पाडी,  क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम…३, वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती तोलण्यास ते धन न लागे,  मूल्य मापन जेंव्हां होती….४ […]

1 307 308 309 310 311 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..