दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १   चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २   वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३   मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला […]

बाह्य अडथळे

एकाच दिशेने जातां, प्रभू मिळेल सत्वरी, रेंगाळत बसाल तर, गमवाल तो श्री हरी ।।१।।   तुम्ही चालत असतां, अडथळे येती फार, चालण्यातील तुमचे, लक्ष ते विचलणार ।।२।।   ऐष आरामी चमक, शरिराला सुखावते, प्रेम, लोभ, मोह, माया, मनाला ती आनंदते ।।३।।   शरिराचा दाह करी, राग द्वेष अहंकार मन करण्या क्षीण, षड् रिपू हे विकार ।।४।। […]

जीवनाची उपयोगिता

अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची  । मना वाटते आगळे करावे,  उरली वर्षे जीवनाची….१, वृधत्वाचा काळ गांजता,  साथ न देयी शरीर कुणाला  । मना मारूनी बसावे लागे,  एक जागी सर्वाला….२, निसर्गरम्य स्थळ निवडूनी,  मर्यादेत जगावे जीवन  । दुजास कांहीं येईल देता   हेच ठरवावे आजमावून…३, बरेच केले स्वत:साठीं,  समाधान परि नाहीं लाभले  । दुजास मिळतां आनंद येई,  खरे […]

दोन मनें दे प्रभू

इच्छा आहे प्रभू , तुझ्या नामस्मरणाची ऐकून घे कहाणी,  अडचणीची   ।।   नाम घ्यावे मुखी, एकचित्ताने सार्थक होईल तेव्हा तप:साधने   ।।   संसार पाठी, लावलास तू गुरफटून त्यात,  साध्य न होई हेतू  ।।   मला पाहिजे दोन्ही, संसार नि ईश्वर एकात गुंतता मन, दुसरे न होई साकार  ।।   दे प्रभू ,मनाची एक जोडी संसारात राहून […]

जनटीका

घोड्यावरती बसू देईना,  चालू देईना पायी जगाची ही रीत ,  कशी समजत नाही ..१, सज्जनतेची वस्त्रे लेवूनी,  निर्मळ जीवन आले आपण बरे नि काम बरे,  तत्व अंगीकारले…२, मोठा झाला शिष्ठ समजोनी,  वाळीत टाकीले मला दुष्कृत्यामध्ये साथ हवी,  त्यातील कांहीं व्यक्तीला…३, जीवन जगणे कठीण होता,  मार्ग तो बदलला आगळी धडपड करूनी,  यश मिळाले मला….४, मिसळत होतो सर्वामध्ये, […]

दुःख

दुःख असे मानव निर्मित  जाणती हे सगळे  । परि दुःखात शोक करिती  हे कुणा न कळे  ।।१ आपण कर्म केलेले  आपणचि भोगतो । फळ कर्माचे आलेले  तेच आपण चाखतो  ।।२ आहे तुजसी हे ज्ञान  माहीत सर्वाना । खंत द्यावी सोडून  नको दाखवूं भावना  ।।३ इतरांसाठीं आहे  ती भावना  उदरीं  । सहानुभूती पाहे  इतर जनांचे पदरी ।।४ […]

दिलासा

ज्योतिष्याची चढूनी पायरी,   जन्म कुंडली दाखवी त्याला  । अडले घोडे नशिबाचे,   कोणते अनिष्ट ग्रह राशीला  ।।   नशिबाची चौकट जाणूनी,    आशा त्याची द्विगुणित झाली  । मनांत येतां खात्रीं यशाची,   जीव तोडूनी प्रयत्ने केली  ।।   प्रयत्नांती असतो ईश्वर,    म्हणूनी मिळाले यश त्याला  । आत्मविश्वास जागृत करण्या,   ‘भविष्य’ शब्द  कामी आला  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

थांबव, विज्ञाना तुझे शोध

थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद   / धृ /   उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद     १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू,  निसर्गातील सुगंध     २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   […]

सर्व वेळ प्रभूसाठी

लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे, मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे ।।१।।   ‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून, जन्मताच तो प्रश्न विचारी, “मी आहे कोण?” ।।२।।   मार्ग हा तर सुख दु:खाने, भरला आहे सारा, राग लोभ मोह अंहकार, याचा येथे पसारा ।।३।।   वाटचाल करिता यातून, कठीण होवून जाते, जीवन सारे […]

नाशाची वृत्ती

जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता,  खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी,  देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी,  तोड मोड करिते लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते लय पावणे प्रतिक शिवाचे,  ईश्वरी असतो गुण ‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव,  हे घ्या तुम्ही जाणून. डॉ. […]

1 2 3 4 5 288
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....